मुखपृष्ठ >> SPORTS ZONE
 


स्पर्धेचे नियम व अटी




सचिन.. नॉन स्टॉप! Print E-mail
विनायक दळवी - रविवार ८ ऑगस्ट २०१०
सचिन तेंडुलकरने आणखी एक विक्रम केला. तो सर्वाधिक कसोटी (१६९) सामने खेळला. सामन्यांच्या संख्येपेक्षाही दोन दशके सचिन इतरांपेक्षा वेगळे क्रिकेट खेळला ते महत्त्वाचे. सचिनच्या आगमनानंतरचे भारताचे क्रिकेटही बदलले. मैदानावरील भारताचा दबदबा वाढला. ऑस्ट्रेलियन संघाला बॅटने आणि कृतीने प्रत्युत्तर देण्याचा आवेश त्याने दिला. गावसकर, विश्वनाथ, वेंगसरकर यांच्या काळातील आत्मविश्वास सचिनच्या युगात मालिकांमागून मालिका विजयांमध्ये परावर्तित झाला. अखेपर्यंत झुंजण्याची जिद्द निर्माण झाली. पराभवाच्या खाईतून विजयापर्यंत पोहोचण्याची वृत्ती सचिनने जोपासली.
 
इट्स कॉमन! Print E-mail
महेश विचारे - रविवार ८ ऑगस्ट २०१०
पायाभूत सुविधाच आपल्यापाशी नाहीत तर आपण ऑलिम्पिक पदके, आशियाई पदके, राष्ट्रकुल पदके पटकाविण्याच्या गमजा कशा काय मारू शकतो? केवळ त्या मेहनत घेणाऱ्या खेळाडूंच्या जोरावर! एखादा खेळाडू चमकलाच तर त्याला भरभक्कम पुरस्कार, घर, जमीन देऊन आपण काय दाखवून देतो की आपल्याला खेळाडूंची चाड आहे? भारताची प्रतिष्ठा जिथे पणाला लागली आहे, ती राष्ट्रकुल स्पर्धा अगदी तोंडावर आलेली असताना या स्पर्धेशी संबंधित असलेल्यांना तोंडावर आपटण्याची वेळ आली आहे.
 
सायना नंबर वन, पण बॅडमिंटनचे काय? Print E-mail
मिलिंद ढमढेरे - रविवार ८ ऑगस्ट २०१०
खेळावर असलेली एकनिष्ठता आणि सकारात्मक वृत्ती याला सातत्यपूर्ण कामगिरीची जोड, यामुळेच भारताची ‘स्टार’ बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानाच्या दिशेने वाटचाल केली आहे. नजीकच्या काळात ती अव्वल स्थानावर पोहोचेल, मात्र तिच्या या यशाबरोबरच भारत बॅडमिंटनमध्ये जागतिक स्तरावर ‘नंबर वन’ होईल का हीच खरी उत्सुकता आहे.बीजिंग येथे झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सायना हिला उपान्त्यपूर्व फेरीत हातातोंडाशी आलेला विजय गमवावा लागला होता. हा विजय तिने मिळविला असता तर ती कांस्यपदकाजवळ पोहोचली असती.
 
मुरली मनोहर Print E-mail
विनायक दळवी - रविवार, २५ जुलै २०१०
मुथय्या मुरलीधरनच्या जवळपास कोण जाऊ शकतो. त्याने घेतलेल्या विक्रमी बळींची संख्या कोण गाठू शकतो. मुरलीने आपला उत्तराधिकारी म्हणून भले भारताच्या हरभजनसिंगचे नाव घेतले असेल; पण त्याच्या मैदानाबाहेरील लिला आणि गोलंदाजीचा फॉर्म पाहता तो मुरलीच्या जवळपासदेखील पोहोचणार नाही हे कटू सत्य आहे. अजून त्याने मुरलीच्या बळींच्या निम्मे बळीदेखील घेतलेले नाहीत. मुरलीने गाठलेला बळींचा एव्हरेस्ट कुणाला सर करता येईल, असेही वाटत नाही.
 
मुंबई जिंकली, पण... Print E-mail
महेश विचारे - रविवार, २५ जुलै २०१०
भोपाळ येथे झालेल्या ६३ व्या सीनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत मुंबईने तब्बल एका तपानंतर विजेतेपद पटकाविले. राष्ट्रीय हॉकीतील एका नावाजलेल्या संघटनेच्या संघाला आपली पत पुन्हा मिळविता आली हे कौतुकास्पदच. मुंबईच्या या संघाचे कौतुक करण्याचे कारण असे, की जयेश जाधव, कॉवरॉय रेमेडिओस, गुरसेवसिंग असे तीन-चार सीनिअर वगळता संपूर्ण संघ २१-२२ वर्षांच्या हॉकीपटूंनी तयार झालेला.
 
नवी खेळपट्टी, नवी इनिंग Print E-mail
विनायक दळवी - रविवार, ११ जुलै २०१०
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्षपद याआधी ग्लॅमरस नव्हते. भारतीयांनी या खुर्चीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त करून दिले. १९८७ ते २००० या कालावधीत जगमोहन दालमिया यांनी आपल्या अध्यक्षपदाचा कालखंड लक्षात राहण्याजोगा केला. क्रिकेट या खेळावरचा सूर्य कधीही मावळणार नाही ही त्यांची घोषणा होती. वर्षांचे ३६५ दिवस क्रिकेट त्यांनी सुरू ठेवले. त्याच वेळी क्रिकेट प्रक्षेपणाच्या पैशाचा प्रचंड ओघ त्यांनी आयसीसीकडे आणि पर्यायाने आयसीसी सदस्यांच्या तिजोरीकडे वळविला. दालमिया त्यामुळे क्रिकेट विश्वात लोकप्रिय झाले.
 
पेसफुल Print E-mail
प्रसाद लाड - रविवार, ११ जुलै २०१०
वयाला कसलेच बंधन नसते. तुमच्याकडे गुणवत्तेबरोबर जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनत घेण्याची तयारी असेल तर तुम्ही कोणत्याही वर्षी आकाशी झेप घेऊ शकता. विम्बल्डनच्या मिश्र दुहेरीच्या विजेतेपदला गवसणी घालत कारकीर्दीतले १२ वे ग्रॅण्डस्लॅम जिंकून भारताचा ३७ वर्षीय स्टार टेनिसपटू लिएण्डर पेसने हे दाखवून दिले आहे. या विजयासह त्याने भारतीय टेनिसमध्ये एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. रविवारी झालेल्या विम्बल्डनच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत झिम्बाब्वेची सहकारी कारा ब्लॅकच्या साथीने पेसने सहाव्यांदा मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकाविले आहे.
 
वाजवा रे वाजवा व्हुव्हुझेला Print E-mail
श्रीनिवास जोशी - रविवार, ११ जुलै २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आफ्रिकेतील सर्व नाच बहुधा दोन तालांत असतात. काही कसलेले नर्तक तर तीन तीन तालांवर नाचतात. एका तालावर खांदा आणि दुसऱ्या तालावर कंबर असे हलवत नाच केला जातो. येथे पु.ल. असले तर, ‘त्यात काय आम्हीसुद्धा बायको आणि साहेब अशा दोन तालांवर नाचतो’, असा विनोद त्यांनी केला असता.आवाजाशिवाय कुठलाही उत्सव, उत्सव असू शकत नाही. आवाजाशिवाय उत्सव फक्त मध्यमवर्गातच साजरा केला जातो.
 
फाय़द्यासाढी कायदे ! Print E-mail
रणजित दळवी - रविवार २७ जून २०१०
सर्वाधिक लोकप्रियता मिळवून विश्वव्यापी स्वरूप प्राप्त करणाऱ्या फुटबॉलला त्याच्या दीडशे वर्षांच्या संघटित इतिहासादरम्यान अनेकवेळा कोणत्या ना कोणत्या कारणास्तव घडलेल्या हिंसक किंवा निंद्य संबोधल्या जाणाऱ्या अप्रिय घटनांसह कैक स्थित्यंतरांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळेक काही वेळा खेळाचे नुकसान झाले तर काही वेळा प्रगती. साधारणपणे शंभरहून अधिक वर्षांपूर्वी, विसाव्या शतकाच्या सुरुवातीला इंग्लंड आणि स्कॉटलंड यांच्यातील सामन्यादरम्यान स्टेडियमचा भाग कोसळून २५ लोक मृत्युमुखी पडले ते गेल्या वर्षी आयव्हरी कोस्ट आणि मलावी या दोन आफ्रिकन देशांची विश्वचषक पात्रता फेरीतील लढत सुरू होण्याआधीच २२ लोक ठार झाले.
 
विश्वचषक सिंहावलोकन! Print E-mail
विजय बने - रविवार २७ जून २०१०
दर चार वर्षांनी होणारी फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा म्हणजे जगभरातील खेळाडू आणि क्रीडाप्रेमींसाठी एक प्रकारे महाकुंभमेळाच असतो. प्रत्येक जण या स्पर्धाची आतुरतेने वाट पाहत असतो आणि एकदा का या स्पर्धाना सुरुवात झाली, की विश्वचषक कोण जिंकणार, कुठले खेळाडू हीरो ठरणार याविषयी आडाखे बांधताना लहान-थोर मंडळींच्या मैफिलीवर-मैफिली रंगू लागतात. मैदानात हा खेळ पाहताना आपल्या आवडत्या संघाला व लाडक्या खेळाडूला पाठिंबा देताना प्रेक्षक बेभान होतात तर जगभरातील अन्य रसिक टी. व्ही.समोर रात्रभर जागून या सामन्यांचा आनंद लुटत असतात.
 
विश्वचषक कुणा हाती? Print E-mail
रणजीत दळवी - रविवार, ६ जून २०१०
विश्वामधील सर्वोत्तम, तेवढाच लोकप्रिय आणि सर्वार्थाने सुसंपन्न अशा फुटबॉल खेळाच्या विश्वचषक स्पर्धेच्या पूर्वसंध्येदरम्यान, या खेळावर असीम प्रेम करणाऱ्या अस्सल चाहत्यांना विचारा किंवा तेवढय़ाच अट्टल जुगारी किंवा सट्टेबाजाला नाहीतर या खेळातील जाणकारांना, विश्लेषकांना, इतिहासकारांना, की हा खेळ क्वचित पाहणाऱ्या, त्याच्याशी फारशी बांधीलकी नसणाऱ्या सर्वसामान्य प्रेक्षकाला, या वेळचा विजेता कोण? उत्तर नेहमीप्रमाणे तेच आणि तेच, अगदी एका सुरात मिळेल, तेही कानठळ्या बसण्याइतपत आवाजात- ब्राझील..! ब्राझील.!! ब्राझील!!!
 
गोल गोल राजा! Print E-mail
मिलिंद ढमढेरे - रविवार, ६ जून २०१०
एकाच वेळी नऊ खेळाडूंसह प्रतिस्पर्धी संघातील गोलरक्षकासही चकवित गोल करण्याची क्षमता सिद्ध करणारा हुकमी खेळाडू म्हणून पेले यांनी फुटबॉलच्या आंतरराष्ट्रीय क्षेत्रात स्वत:चे नाव अजरामर केले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामन्यांमध्ये एक हजारपेक्षा अधिक गोल करणाऱ्या या खेळाडूने फुटबॉलचा अनभिषिक्त सम्राट अशी ख्यातीही मिळविली.फुटबॉल क्षेत्रातील बलाढय़ संघ म्हणून मानला गेलेल्या ब्राझील संघास तिसऱ्यांदा विश्वचषक मिळवून देण्यात पेले यांचा सिंहाचा वाटा होता.
 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 1 of 2

ताज्या बातम्या



लोकरंग

‘चिनी ज्यादा’ !

अनिकेत साठे - रविवार, ५ सप्टेंबर २०१०
( sathe.aniket@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चिनी लष्कराच्या मुक्त संचारामुळे भारताची चिंता वाढली असून त्यामागे ‘ड्रॅगन’ची नेमकी काय चाल आहे, असा प्रश्न होतो. त्याचे उत्तर शोधताना हा विषय केवळ गिलगिटपुरताच मर्यादित नाही, तर त्याला विविध स्वरूपाचे कंगोरे असल्याचे लक्षात येते. अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून संरक्षण क्षेत्रात अफाट गुंतवणूक करणारा चीन सध्या जी पावले टाकतो आहे, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाही गर्भित इशारा देण्याचा भाग आहे.

दिनदर्शिका

गुरुवार, ९ सप्टेंबर २०१०. मिती भाद्रपद शुद्ध प्रतिपदा १२ क. ०८ मि.पर्यंत. उत्तरा  नक्षत्र २० क. ५१ मि.पर्यंत. कन्या चंद्र. सूर्योदय- ६।२६ सूर्यास्त- ६।४६
मेष
- शत्रूंवर लक्ष ठेवा, वृषभ - मुलांचे प्रश्न सुटतील, मिथुन - घरात शांतता ठेवा, कर्क - छोटे-मोठे प्रवास होतील, सिंह - अचानक दडपण वाढतील, कन्या - महत्त्वाचे निर्णय घ्याल, तूळ - देवघेवीत चुका करू नका, वृश्चिक - पैसा हाती येईल, धनू - सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, मकर - प्रयत्न कारणी लागतील, कुंभ - अडचणींचा दिवस, मीन - शासकीय कामे होतील.
शुभराशी : वृश्चिक / धनू / मकर