|
|
विदर्भरंग
भक्ती सोमण, रविवार, ५ सप्टेंबर २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
 इच्छाशक्ती माणसाला आयुष्यभर साथ देत असते. त्याच जोरावर तर तो जगत असतो. हे जगणं कोणतीही कटकट न होता, आजारपणाशिवाय सुखकारक व्हावं यासाठी लोकांची धडपड चाललेली असते. अगदी शंभरी गाठली तरी याच इच्छाशक्तीच्या जोरावर अजून जगावं, असं वाटणारी फार नाही पण, काही लोकं आहेत. त्यापैकी लक्ष्मणराव ऊर्फ बाबुराव चिमोटे हे असचं एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व. या १ सप्टेंबरला त्यांनी शंभराव्या वर्षांत पदार्पण केलं.
|
प्रा. अजय देशपांडे, रविवार, ५ सप्टेंबर २०१० संपर्क : ९८५०५९३०३०
महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत मराठी भाषेतील विज्ञान विषयक लेखन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन देणारे, माणूस आणि विज्ञान यांच्यातील नात्याचा शोध घेणारे मराठीतील ललित साहित्य या दोहोंचीही स्थिती समाधानकारक आहे, असे म्हणता येत नाही.
|
सुप्रिया अय्यर, रविवार, ५ सप्टेंबर २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
प्रत्येकाला एक गाव असावं. त्या गावात एक घर असावं. त्या घरात वाट पाहणारी एक म्हातारी आजी असावी. जशी ती तिला होती. तिच्या बालपणी आजीनं तिला सांभाळलं होतं. तिच्या वडिलाच्या अकाली निधनानंतर तिचा भार अकस्मातपणे तिच्या आजी-आजोबांवर पडला. काय वाटलं असेल तेव्हा त्यांना? स्वत:चा भार दुसऱ्यावर टाकावा अशा वयात पोहोचल्यावर एखाद्याच्या जबाबदाऱ्या दुपटीनं वाढल्यावर त्याची काय अवस्था होत असेल?
|
गौरी शास्त्री-देशपांडे, रविवार, ५ सप्टेंबर २०१० संपर्क : ९९६०४२८१८६
आपल्या सख्यासोयऱ्यांसोबत मुक्त क्षण घालवण्याचा आनंद देणाऱ्या ठिकाणांच्या शोधात नवी पिढी असते. कधी विकएंडच्या नावाने तर कधी गेट टू गेदरच्या नावाने. निवांत क्षण पदरात पाडून घेणे ही नव्या काऴात मानसिक- शारीरिक गरज बनली आहे. दर दिवशी स्वत:ला सिद्ध करत जगताना एखादा दिवस तणावविरहित मानसिक समाधान देणारा ठरावा असे कोणाला वाटत नाही.
|
|
पक्षीयात्रा : पावशा : Common Hawk Cuckoo |
|
|
- छायाचित्र आणि माहिती - कौस्तुभ पांढरीपांडे, रविवार, ५ सप्टेंबर २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
/ ९८८१४२२६५०
मागच्या आठवडय़ात आपण चातक पक्षाची ओळख करून घेतली. त्याचाच भाऊ असणारा हा पावशा पक्षी चातकाच्या पाठोपाठ स्थलांतर करून विदर्भात सर्वत्र दिसू लागतो. ‘पेरतेव्हा -पेरतेव्हा’ असा जोरदार आवाज काढून शेतकऱ्यांना शेतात पेरणीची वेळ झाल्याची आठवण करून देतो. ग्रामीण भागात पावशा चांगलाच परिचित पक्षी आहे. डोळ्यांभोवती असलेल्या सुंदर पिवळ्या वर्तुळामुळे ओळख पटवण्यास मदत होते. पावशासुद्धा कोकिळेच्या प्रजातीतला असल्याने दुसऱ्या पक्षांच्या घरटय़ात प्रत्येकी एक याप्रमाणे पालक पक्षाच्या निळ्या रंगाच्या अंडय़ाप्रमाणेच निळ्या रंगाचे अंडे घालतात. चातक प्रमाणेच पावशापक्षाचे निरीक्षण करणेही मनोरंजक ठरते. |
डॉ. तारा भवाळकर, रविवार, ५ सप्टेंबर २०१०
‘एका व्यक्तीचे कुटुंब’ किंवा ‘एकसदस्यीय कुटुंब’ हाच मुळी एक वदतोव्याघात आहे. पती-पत्नी आणि त्यांची अपत्ये ही सर्वसामान्यपणे ‘कुटुंब’ शब्दात अभिप्रेत असलेली व्याप्ती आहे. मग त्यात पतीचे सर्व नातेवाईक, प्रसंगपरत्वे पत्नीचे नातेवाईकही येतात. त्यामुळे कुटुंब शब्द व्याकरणदृष्टय़ा एकवचनी असला तरी त्यातील सदस्यसंख्या एकाधिक गृहीतच असते. पती आणि पत्नी अशा दोन व्यक्ती! त्यातही किमान एक पुरुष आणि एक स्त्री हे रूढीचे गणित आहे.
|
सुहास खानझोडे, रविवार, ५ सप्टेंबर २०१० संपर्क : ९४२३६८६५८३
तू विझत असताना तुझ्या भोवती मी ओंजळ धरली तू तेवत राहिलास आणि प्रकाशाने माझी ओंजळ भरली. चंद्रशेखर गोखले यांच्या या ओळी सुलभा वर्देसाठी किती समर्पक आहेत याचं प्रत्यंतर हे पुस्तक वाचताना येतं.
|
ज्योती तिरपुडे, रविवार, ५ सप्टेंबर २०१० संपर्क : ९४२१८०१८७८
नाटक हा साहित्यप्रकारापेक्षा तो दृक्श्राव्य कलाप्रकार म्हणून जास्त जवळचा वाटतो. कौटुंबिक, सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक, चरित्रात्मक, राजकीय, स्वभावचित्रण, रहस्यमय अशी वेगवेगळ्या धाटणीच्या नाटकांची निर्मिती झाली आहे. समाज प्रबोधन, इतिहासाची माहिती, निखळ मनोरंजन, विचारांना चालना देणारा, क्वचित भावनांचा प्रक्षोभ निर्माण करणारी नाटके निर्माण होतात. नाटक हा विषय आचार्य अ.द. वेलणकर यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. नागपुरातील आचार्य अरुण दत्तात्रय वेलणकर हे अध्यापन क्षेत्रातील एक अग्रणी नाव. एक चांगले रंगभूमी कलाकार, समीक्षक, अध्यापक, वक्ता आणि पीएच.डी. मागदर्शन म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.
|
अॅड. अंजली ठाकूर, रविवार, ५ सप्टेंबर २०१० संक्पर्क : ९३७३१०३९४०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
भारतभूमीवरचा स्वर्ग समजल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये जाण्याचा नुकताच योग आला. ‘योग आला’ असं मुद्दाम म्हणते. कारण काश्मीरमध्ये सध्या सुरू असणाऱ्या अशांत, अस्थिर परिस्थितीत तेथे कोणता पर्यटक जायचा विचार करेल?
|
भक्ती सोमण - रविवार, २९ ऑगस्ट २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
 जन्मत वेगळेपण बहाल केलेली मुलं ‘स्पेशल’ मुलं म्हणून ओळखली जातात. या स्पेशल मुलांमधे अंध, अपंग, मुकबधीर, कर्णबधीर, मतिमंद अशा वेगवेगळ्या देणग्या मिळालेली मुलं येतात. त्यांच्यात श्रीमंत- गरीब असा भेद अजिबात नसतो. काहीवेळा परिस्थितीमुळे ही विशेष देणगी एखाद्या कुटुंबाला मिळते. त्यामुळे या मुलांच्या पालकांना हतबलताही वाटय़ाला येते.
|
सुनीती देव - रविवार, २९ ऑगस्ट २०१० ९८२२५७७५६५
१९७२ साली मी विदर्भ महाविद्यालयात तत्त्वज्ञान विषयाची शिक्षिका म्हणून रुजू झाले. तेव्हा ताई डॉ. सुशीला पाटील मराठी विभागात एक ज्येष्ठ प्राध्यापिका म्हणून कार्यरत होती. माझी तिची पहिली भेट कधी झाली, कोणी तिची ओळख करून दिली हा सर्व तपशील आज अजिबात स्मरणात नाही. परंतु, मी देशपांडे कुटुंबाचा घटक झाल्यावर मात्र ताई ठळकपणे स्मरणात राहिली.मला आठवतंय आमचा विवाह झाल्यावर ताईने बाळसाठी सुंदर कोरीव नक्षीकाम असलेली लाकडी बुकरॅक भेट म्हणून आणली होती व माझ्यासाठी भरतकामाचे डिझाईन्स असलेली दोन पुस्तके!
|
प्रा. नवनीत देशमुख - रविवार, २९ ऑगस्ट २०१० ०७१५२-२४२१७४
तुम्ही कार चालवायला आता शिकला आहात. कार उभी असताना ती न्यूट्रलमध्ये उभी आहे की गिअरमध्ये, हे तुम्ही चांगलं ओळखू शकता. पहिल्यांदा क्लच पूर्णपणे दाबून पहिला, दुसरा, तिसरा आणि चवथाही गिअर तुम्ही टाकू शकता. गर्दीतूनही कार चालवू शकता, लाँग ड्राईव्हला जाऊ शकता. कार रिव्हर्समध्ये घेता येते. हळूहळू कार पुढे चालवता येते, तशीच मागेही नेता येते. पाहिजे तेथे थांबवता येते. अधूनमधून ओव्हरटेक करण्याची हिंमतही दाखवून आता अधिक सरावाने ओव्हरटेकही करता येते.
|
|
|
<< Start < Prev 1 2 Next > End >>
|
|
Page 1 of 2 |
|
लोकरंग
‘चिनी ज्यादा’ !
अनिकेत साठे - रविवार, ५ सप्टेंबर २०१० ( sathe.aniket@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चिनी लष्कराच्या मुक्त संचारामुळे भारताची चिंता वाढली असून त्यामागे ‘ड्रॅगन’ची नेमकी काय चाल आहे, असा प्रश्न होतो. त्याचे उत्तर शोधताना हा विषय केवळ गिलगिटपुरताच मर्यादित नाही, तर त्याला विविध स्वरूपाचे कंगोरे असल्याचे लक्षात येते. अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून संरक्षण क्षेत्रात अफाट गुंतवणूक करणारा चीन सध्या जी पावले टाकतो आहे, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाही गर्भित इशारा देण्याचा भाग आहे. |
दिनदर्शिका
गुरुवार, ९ सप्टेंबर २०१०. मिती भाद्रपद शुद्ध प्रतिपदा १२ क. ०८ मि.पर्यंत. उत्तरा नक्षत्र २० क. ५१ मि.पर्यंत. कन्या चंद्र. सूर्योदय- ६।२६ सूर्यास्त- ६।४६ मेष - शत्रूंवर लक्ष ठेवा, वृषभ - मुलांचे प्रश्न सुटतील, मिथुन - घरात शांतता ठेवा, कर्क - छोटे-मोठे प्रवास होतील, सिंह - अचानक दडपण वाढतील, कन्या - महत्त्वाचे निर्णय घ्याल, तूळ - देवघेवीत चुका करू नका, वृश्चिक - पैसा हाती येईल, धनू - सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, मकर - प्रयत्न कारणी लागतील, कुंभ - अडचणींचा दिवस, मीन - शासकीय कामे होतील. शुभराशी : वृश्चिक / धनू / मकर
|