मुखपृष्ठ >> व्हिवा
 


स्पर्धेचे नियम व अटी




viva diva of the week Print E-mail
शुक्रवार , ३ सप्टेंबर २०१०
 
viva diva of the month (Aug-2010) Print E-mail
शुक्रवार , ३ सप्टेंबर २०१०
 
पर्सेसच्या जगात Print E-mail
प्रा. शैलजा सांगळे , शुक्रवार , ३ सप्टेंबर २०१०
पर्स हा प्रत्येक महिलेचा जिव्हाळ्याचा विषय. वेशभूषा, केशभूषा, पादत्राणे यांच्या इतकेच महत्त्व महिला पर्सला देतात. पूर्वीच्या काळी पर्स म्हणजे केवळ पैसे ठेवण्याची सोय असलेले पाकीट एवढाच अर्थ अभिप्रेत होता. कालांतराने पर्सची ही संकल्पना पूर्ण बदलून, पर्समध्ये एकवेळ पैसे असतील-नसतील पण इतर वस्तूंचा भरणा मात्र होऊ लागला. म्हणतात ना महिलांच्या पर्समध्ये काय नसेल ते सांगणे अवघड. जात्याच कलात्मक दृष्टी असलेल्या महिलांकडूनच मग वेगवेगळ्या आकारातील, वेगवेगळ्या डिझाईनच्या पर्सेसना मागणी वाढू लागली.
 
शहाण्यांचा सायकिअ‍ॅट्रिस्ट Print E-mail
शुक्रवार , ३ सप्टेंबर २०१०
समाजापर्यंत जाऊन भिडायची प्रक्रिया चालू तर झाली होती. तशी एकही संधी आम्ही वाया घालवत नव्हतो. परंतु खर्च वाढत होते. क्लायंटकडून जे शुल्क घेतलं जात असे, ते अतिशय माफक असे. कारण या सेवा नवीन होत्या. ‘बोलायच्या’ ट्रीटमेंटसाठी पैसे देणं अनेकांना जड जायचं. संस्थेवर पूर्ण वेळ अवलंबून असणारे कार्यकर्ते कर्मचारी आता चौदापर्यंत पोहोचले होते. त्यांचं मानधन दर महिन्याला तयार ठेवावं लागत होतं. या सगळ्या पाश्र्वभूमीवर माझी गाठ पडली ज्यो अल्वारिस नावाच्या एका व्यक्तीबरोबर. ज्यो अल्वारिस ठाण्यालाच राहणारा. पाश्चात्त्य संगीतातला दर्दी. स्वत: उत्तम गायक. ‘आपण तुझ्या संस्थेसाठी असा एक अफलातून शो करू या, जो आजवर कुणीही या शहरात केला नसेल,’ ज्यो म्हणाला.
 
गुंतता हृदय हे Print E-mail
प्रतिभा खानोलकर-जोशी , शुक्रवार , ३ सप्टेंबर २०१०
‘प्यार मे ऐसा है क्या जादू’
तुम जानो ना मै जानू!

खरंच प्रेमात अशी आहे तरी काय जादू की जी जात, धर्म, भाषा, परदेश संस्कृती, रीतिरिवाजांची बंधने, पालकांचा विरोध अशा अनेक गोष्टींच्या सीमारेषा एका झटक्यात अदृश्य करण्याची हिम्मत प्रेमीयुगुलांच्या मनामध्ये सळसळून येणाऱ्या प्रेमात निर्माण करू शकते.
अशाच एका ‘तू’ आणि फक्त ‘मी’ या दुनियेतील विवाहोत्सुक प्रेमीयुगुलांच्या व दिलदार मनाच्या पालकांच्या संमतीने झालेल्या भारतीय वर अमेय (बेलारे दाम्पत्यांचा मुलग व जपान देशाची जपानी वधू किओको (kyoko)  (Ryoko & Ma Sahiro Yamada दाम्पत्याची कन्या) यांच्या विवाह सोहळ्याला जाण्याचा योग आला होता.
 
यंग अचिव्हर : ‘पारख’ एका ध्यासाची.. (डॉ. ऋग्वेदिता पारख) Print E-mail
समीर परांजपे , शुक्रवार , ३ सप्टेंबर २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मुंबई प्रांतामध्ये एकोणिसाव्या शतकापासून तसेच नंतर १९६० साली निर्माण झालेल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महिला डॉक्टरांची उज्ज्वल परंपरा आहे. त्यामध्ये अगदी सुरुवातीच्या काळात डॉक्टर बनलेल्या मराठी महिलांमध्ये डॉ. आनंदीबाई जोशी, डॉ. रखमाबाई यांची नावे अग्रभागी आहेत. काळानुसार शिक्षणाचा प्रसार वाढत गेला तसतशा महिला मोठय़ा प्रमाणावर साक्षर होऊ लागल्या. उच्च शिक्षणासाठी भारताची वेस ओलांडू लागल्या.
 
पाय माझे तालात (गीता कपूर) Print E-mail
शुक्रवार , ३ सप्टेंबर २०१०
गीता कपूर
गीता कपूर यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात फराह खान, जावेद जाफरी, गणेश हेगडे, लॉजिन्स फर्नाडिस अशा लोकप्रिय कोरिओग्राफर्सबरोबर वयाच्या पंधराव्या वर्षांपासून केली. १९९६ साली त्यांनी बॉलीवूडच्या नामवंत कोरिओग्राफर फराह खान यांच्याकडे असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून काम स्वीकारले. काही वर्षांतच त्यांना अनेक फिल्म्समध्ये तसेच म्युझिकल बॉम्बे ड्रीम्स (२००४) मध्ये सहकार्य करत गीता कपूर यांनी बॉलीवूडमध्ये उत्तम जम बसवला.
 
चलो असम आणि अरूणाचल Print E-mail
शुक्रवार , ३ सप्टेंबर २०१०
निसर्ग सौंदर्याचा वरदहस्त लाभलेलं असम आणि उगवत्या सूर्याचा प्रदेश असलेलं अरूणाचल.. अशी वेगळ्या वाटेवरची सहल अद्वैत ट्रॅव्हल्सने १२ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केली आहे.
 
viva diva of the week Print E-mail
शुक्रवार , २७ ऑगस्ट २०१०
 
गोविंदा रे गोपाळा Print E-mail
गौरव निमकर / प्रियांका पावसकर , शुक्रवार , २७ ऑगस्ट २०१०
‘ढाक्कुमाकुम ढाक्कुमाकुम’च्या गजरात ताल धरून संपूर्ण मुंबई दहीहंडी फोडत पालथी घालणारा गोविंदा मुंबईची शान मानला जातो. टपोरीपणाचा आव आणत टिंगलटवाळ्या करणारा हा ‘पडता गोविंदा’ सगळ्यांनाच हवाहवासा आणि आपला वाटणारा. पण हा गोविंदा आता आपला राहिलाय का? कृष्णाच्या लीलांची आठवण करून देणारा दहीहंडी हा सण सध्या या दिवशी होणाऱ्या भलत्याच लीलांमुळे गाजत असतो.श्रीकृष्णाचा जन्म गोकुळाष्टमीला रात्री १२ वाजण्याच्या सुमारास कंस राजाच्या कोठडीत झाला. पण श्रीकृष्ण वाढला मात्र गोकुळात. नंद आणि यशोदेच्या प्रेमात आणि गोपिकांच्या सहवासात. गोकुळात चोरून लोणी खाणे व गोपिकांची छेड काढणे अशा लीला त्याने केल्या. घराच्या छताला टांगलेली दह्याची हंडी श्रीकृष्ण फोडायचा तीच प्रथा आता दहीहंडीच्या रूपाने पाळली जाते. आता हा सण थेट मथुरेपासून उत्तर भारतातल्या अनेक शहरांत साजरा होतो.
 
आनंदाश्रूचा पाऊस - अनघा मालवणकर Print E-mail
संकलन: मृण्मयी परांजपे , शुक्रवार , २७ ऑगस्ट २०१०
पावसाच्या आठवणींचा संबंध नेहमीच मजा, धमाल, चिंब भिजणे, रोमँटिक आठवणींशी जोडला जातो. ते खरंही आहे. पहिल्या पावसात भिजायला कोणालाही आवडतं. ऑफिसला जाताना मध्येच पाऊस पडू लागला आणि ऑफिस ऐवजी त्या पावसात भिजायचा अनुभव घेतला असा हवाहवासा वेडेपणा करणारेही कमी नाहीत. अशा आठवणींचा खजिना आपल्याकडे असला तरी काही वेळा हा पाऊस हृदयद्रावक अनुभवही देऊन जातो. या रौद्र रुपाचा अनुभव घेताना आपल्याही नकळत आपण असामान्य माणुसकीचे दर्शन घडवतो. असेच अनुभव शेअर केले आहेत, मुंबई हायकोर्टातील वकील अनघा मालवणकर व ज्योतिषी संदीप अवचट यांनी ट्रेन चर्चगेटच्या दिशेने चालली होती.
 
पावसाचं ‘वेगळं’ रूप - संदीप अवचट Print E-mail
संकलन: मृण्मयी परांजपे, शुक्रवार , २७ ऑगस्ट २०१०
पावसाच्या आठवणींचा संबंध नेहमीच मजा, धमाल, चिंब भिजणे, रोमँटिक आठवणींशी जोडला जातो. ते खरंही आहे. पहिल्या पावसात भिजायला कोणालाही आवडतं. ऑफिसला जाताना मध्येच पाऊस पडू लागला आणि ऑफिस ऐवजी त्या पावसात भिजायचा अनुभव घेतला असा हवाहवासा वेडेपणा करणारेही कमी नाहीत. अशा आठवणींचा खजिना आपल्याकडे असला तरी काही वेळा हा पाऊस हृदयद्रावक अनुभवही देऊन जातो. या रौद्र रुपाचा अनुभव घेताना आपल्याही नकळत आपण असामान्य माणुसकीचे दर्शन घडवतो. असेच अनुभव शेअर केले आहेत, मुंबई हायकोर्टातील वकील अनघा मालवणकर व ज्योतिषी संदीप अवचट यांनी २० वर्षांपूर्वीचा प्रसंग, पण त्याचं ओलेचिंब प्रतिबिंब माझ्या मनात आजदेखील घर करून आहे.
 


ताज्या बातम्या



लोकरंग

‘चिनी ज्यादा’ !

अनिकेत साठे - रविवार, ५ सप्टेंबर २०१०
( sathe.aniket@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चिनी लष्कराच्या मुक्त संचारामुळे भारताची चिंता वाढली असून त्यामागे ‘ड्रॅगन’ची नेमकी काय चाल आहे, असा प्रश्न होतो. त्याचे उत्तर शोधताना हा विषय केवळ गिलगिटपुरताच मर्यादित नाही, तर त्याला विविध स्वरूपाचे कंगोरे असल्याचे लक्षात येते. अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून संरक्षण क्षेत्रात अफाट गुंतवणूक करणारा चीन सध्या जी पावले टाकतो आहे, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाही गर्भित इशारा देण्याचा भाग आहे.

दिनदर्शिका

गुरुवार, ९ सप्टेंबर २०१०. मिती भाद्रपद शुद्ध प्रतिपदा १२ क. ०८ मि.पर्यंत. उत्तरा  नक्षत्र २० क. ५१ मि.पर्यंत. कन्या चंद्र. सूर्योदय- ६।२६ सूर्यास्त- ६।४६
मेष
- शत्रूंवर लक्ष ठेवा, वृषभ - मुलांचे प्रश्न सुटतील, मिथुन - घरात शांतता ठेवा, कर्क - छोटे-मोठे प्रवास होतील, सिंह - अचानक दडपण वाढतील, कन्या - महत्त्वाचे निर्णय घ्याल, तूळ - देवघेवीत चुका करू नका, वृश्चिक - पैसा हाती येईल, धनू - सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, मकर - प्रयत्न कारणी लागतील, कुंभ - अडचणींचा दिवस, मीन - शासकीय कामे होतील.
शुभराशी : वृश्चिक / धनू / मकर