|
|
महत्वाच्या बातम्या
* अन्य एक नाशिकमध्ये गजाआड * जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ात उदगीरमध्ये शिजला कट * रियाज-इक्बाल भटकळच्या इशाऱ्यावरून घडविला स्फोट मुंबई, ८ सप्टेंबर प्रतिनिधी
पुणे येथील जर्मन बेकरीमध्ये सात महिन्यांपूर्वी घडविलेल्या बॉम्बस्फोटामागील मुख्य सूत्रधार मिर्जा हिमायत ऊर्फ युसुफ बेग (२९) याला अखेर राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने पुणे येथूनच अटक केली. ‘लष्कर-ए-तोयबा’चा महाराष्ट्रातील प्रमुख असलेल्या बेगने इंडियन मुजाहिदीनचे म्होरके रियाज आणि इक्बाल भटकळ यांच्या इशाऱ्यावरून जर्मन बेकरीमधील स्फोट घडवून आणल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
|
मुंबई, ८ सप्टेंबर / प्रतिनिधी विरोधकांचा विरोध डावलून ‘बेस्ट’ समितीच्या बैठकीमध्ये अलिकडेच मंजूर करण्यात आलेल्या बस भाडेवाढीच्या प्रस्तावावर आज मुंबई महापालिका सभागृहात शिक्कामोर्तब करण्यात आले. तत्पूर्वी पालिका सभागृहात रंगलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या कलगीतुऱ्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला आणि अखेर सत्ताधारी पक्षाने हा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे आज मध्यरात्रीपासूनच मुंबईकरांना भाडेवाढीला सामोरे जावे लागणार आहे.
|
मुंबई, ८ सप्टेंबर/प्रतिनिधी
गेली काही वर्षे अकरावी प्रवेशाचा घोळ हा जणू नियमच झाला आहे. दहावीतून अकरावीतील स्थित्यंतर हे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि पर्यायाने संपूर्ण समाजाच्याच चिंतेचा विषय बनले आहे. दुर्दैवाने या निमित्ताने निष्कारण राज्याचे एसएससी बोर्ड आणि अन्य केंद्रीय बोर्ड अशी विभागणी ‘आपले आणि परके’ या धर्तीवर झाली आहे.परंतु या गोंधळातून काही उपाय निघण्याऐवजी हा प्रश्न अधिकाधिक गुंतागुंतीचा होत चालला आहे.
|
मुंबई, ८ सप्टेंबर / खास प्रतिनिधी
जादा चटईक्षेत्रासाठी शुल्क आकारणी (प्रिमीयम) करणे बेकायदेशीर असल्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिल्याच्या पाश्र्वभूमीवर शुल्क आकारणीकरिता कायदेशीर त्रूटी दूर करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना कायद्यात बदल करून त्यात जादा चटईक्षेत्र निर्देशांकासाठी शुल्क आकारणी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
|
श्रीकांत बोजेवार ,मुंबई, ८ सप्टेंबर
कलेचा वारसा अनेकदा अनुकरणाच्या मोहात पाडतो आणि पूर्वसंचीतावरच गुजराण करतो. सुधीर फडके ऊर्फ बाबुजी यांच्या स्वरवैभवाचा जन्मजात वारसा लाभलेले त्यांचे पुत्र श्रीधर फडके यांनी मात्र जाणीवपूर्वक स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आणि मराठी भावगीत- चित्रपटगीतांच्या क्षेत्रात ‘श्रीधर फडके’ या नावाला स्वतंत्र वलय मिळवून दिलं. त्यांच्या सुरेल संगीताचा ‘ऋतू’ गेली तीन दशके सतत आपला ‘हिरवेपणा’ टिकवून आहे.
|
नीरज पंडित/तुषार खरात मुंबई, ८ सप्टेंबर
गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणवासियांसाठी दादर-सावंतवाडी एक्स्प्रेस ही नवी गाडी बुधवारी पहाटेपासून सुरू करण्यात आली. पहाटे १२.४५ वाजता ही गाडी प्रथम दादरहून रवाना झाली. परंतु नव्या गाडीचे श्रेय लाटण्यासाठी शिवसेना आणि राणेसमर्थकांमध्ये झालेल्या राडय़ामुळे अनेक चाकरमान्यांची गाडी चुकली. राजकीय नेत्यांच्या ‘मतलबी राडय़ा’मुळे गौरीगणपतीसाठी गावी निघालेले कोकणवासीय मात्र कमालीचे संतापले आहेत. या पाश्र्वभूमीवर काल रात्रीपासून पोलिसांनी हुशारीने हाताळलेल्या डावपेचांमुळे मोठा अनर्थ मात्र टळला.
|
मुंबई, ८ सप्टेंबर / खास प्रतिनिधी पर्यावरणाचा कमीत कमी ऱ्हास होईल अशा पद्धतीने नवी मुंबई विमानतळाचे आराखडे तयार करावेत, असा आदेश केंद्र सरकारने दिल्यावर राज्य शासनाने प्रस्तावित आराखडय़ात बदल केले आहेत.
|
लखनौ, ८ सप्टेंबर/पीटीआय अयोध्या येथील रामजन्मभूमी-बाबरी मशिद वादंगप्रकरणी तब्बल साठ वर्षांपूर्वी दाखल केलेल्या याचिकेवर अलाबाहाद उच्च न्यायालयाचे लखनौ खंडपीठ २४ सप्टेंबर रोजी निकाल देणार असून त्यामुळे मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
|
ठाणे, ७ सप्टेंबर / प्रतिनिधी
पुणे येथील साहित्य संमेलनाच्या खर्चामुळे झालेले वाद वर्षभराने संपले असताना ठाणे येथील नियोजित अखिल भारतीय साहित्य संमेलनात अंतर्गत वादातून संमेलनाचे कोषाध्यक्ष चिंतामणी कारखानीस यांनी कोषाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. कारखानीस हे ठाणे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष असून मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या ठाणे विभागाच्या कार्यकारिणीवर आहेत. मराठी ग्रंथसंग्रहालयाला मिळालेल्या ६० मतांच्या यादीत त्यांचेदेखील नाव होते. पुणे येथील संमेलनाच्या पैशावरून झालेल्या वादामुळे ठाण्यातील संमेलनाचा कारभार पारदर्शक असावा,
|
दादर-सावंतवाडी गणपती स्पेशल मुंबई, ७ सप्टेंबर / प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्फत आजपासून (रात्री १२.४५ वा.) सोडण्यात येणाऱ्या दादर-सावंतवाडी या विशेष रेल्वे गाडीचे श्रेय लाटण्यावरून शिवसेना व राणे समर्थकांमध्ये दादर स्थानकाबाहेर आज रात्री उशिरा जोरदार हाणामारी व दगडफेक झाली. हातातील लाठय़ाकाठय़ांनी दोन्ही बाजूच्या ‘कार्यकर्त्यां’नी एकमेकांना बदडून काढले.
|
मुंबई, ७ सप्टेंबर / प्रतिनिधी ‘मी बाटग्यांना भेटत नाही’ अशा ठाकरी शैलीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार बाळा नांदगावकर यांना टोला हाणला आहे. शिवसेना पुरस्कृत साहेब प्रतिष्ठानची दहीहंडी नांदगावकर यांच्या माझगाव ताडवाडी दहीहंडी पथकाने फोडली होती.
|
सुनील माळी ,पुणे, ७ सप्टेंबर
देशाच्या सर्वच प्राणिसंग्रहालयात असलेले हत्ती वनखात्याच्या स्वाधीन करण्याच्या आदेशावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने त्याचा पुनर्विचार करणे केंद्र सरकारला भाग पडले असून हत्तींच्या व्यवस्थेत सुधारणा करणाऱ्या प्राणिसंग्रहालयांना हत्ती ठेवण्यास परवानगी देण्यात येणार आहे. त्यासाठी प्राणिसंग्रहालयांची पाहणी करण्यास समिती नेमण्यात आली असून ती आपला अहवाल लवकरच सादर करणार आहे. राज्यातील पुणे, मुंबई, औरंगाबादसह देशातील वीस प्राणिसंग्रहालयांमध्ये ऐंशी हत्ती सध्या आहेत.
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 Next > End >>
|
|
लोकरंग
‘चिनी ज्यादा’ !
अनिकेत साठे - रविवार, ५ सप्टेंबर २०१० ( sathe.aniket@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चिनी लष्कराच्या मुक्त संचारामुळे भारताची चिंता वाढली असून त्यामागे ‘ड्रॅगन’ची नेमकी काय चाल आहे, असा प्रश्न होतो. त्याचे उत्तर शोधताना हा विषय केवळ गिलगिटपुरताच मर्यादित नाही, तर त्याला विविध स्वरूपाचे कंगोरे असल्याचे लक्षात येते. अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून संरक्षण क्षेत्रात अफाट गुंतवणूक करणारा चीन सध्या जी पावले टाकतो आहे, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाही गर्भित इशारा देण्याचा भाग आहे. |
दिनदर्शिका
गुरुवार, ९ सप्टेंबर २०१०. मिती भाद्रपद शुद्ध प्रतिपदा १२ क. ०८ मि.पर्यंत. उत्तरा नक्षत्र २० क. ५१ मि.पर्यंत. कन्या चंद्र. सूर्योदय- ६।२६ सूर्यास्त- ६।४६ मेष - शत्रूंवर लक्ष ठेवा, वृषभ - मुलांचे प्रश्न सुटतील, मिथुन - घरात शांतता ठेवा, कर्क - छोटे-मोठे प्रवास होतील, सिंह - अचानक दडपण वाढतील, कन्या - महत्त्वाचे निर्णय घ्याल, तूळ - देवघेवीत चुका करू नका, वृश्चिक - पैसा हाती येईल, धनू - सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, मकर - प्रयत्न कारणी लागतील, कुंभ - अडचणींचा दिवस, मीन - शासकीय कामे होतील. शुभराशी : वृश्चिक / धनू / मकर
|