|
|
के.जी.टू.पी.जी.
आम्ही भोगतो आता शुल्कनियमन कायदा न केल्याची फळे! आशिष पेंडसे - सोमवार, ६ सप्टेंबर २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
खासगी, विनाअनुदानित शाळांमधील शुल्काचे नियमन करण्यासाठी गरज पडल्यास कायदा करू मुख्यमंत्री अशोक चव्हाण .. व्वा रे मुख्यमंत्री! अजूनही तुम्हाला खासगी शाळांमधील शुल्काच्या नियंत्रणाचा कायदा करण्याची गरज आहे की नाही, हेसुद्धा ठाऊक नाही! राज्यातील बिल्डरलॉबीला संरक्षण देण्याकडेच तुमचे सारे लक्ष! तेच तुमचे सारे प्राधान्यक्रम! प्रत्येक नागरिकाशी संबंधित शिक्षणासारख्या मूलभूत विषयाबाबत तुम्ही इतके बेफिकीर! शिक्षणमंत्र्यांबाबतही, सॉरी!
|
सोमवार, ६ सप्टेंबर २०१०
शिक्षकदिनानिमित्त यंदा आम्ही एक अभिनव प्रयोग म्हणून राज्याच्या वेगवेगळ्या भागातील काही शाळांतील विद्यार्थ्यांना लिहिते करून शिक्षक, शाळा, शिक्षणपद्धती याबद्दल मुलांना काय वाटते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मुंबई, शहापूर, नाशिक, नांदेड, जळगाव येथील मुलांच्या प्रातिनिधिक अभिव्यक्ती आम्ही चतुरंग पुरवणीत प्रसिद्ध केल्या आहेत.त्याचवेळी जाहीर केल्याप्रमाणे आज येथे पुण्यातील काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेले विचार मांडत आहोत.
|
विशाखा देशपांडे, सोमवार, २३ ऑगस्ट २०१०
महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या संशोधन व विकास केंद्राने तयार केलेल्या ‘बाल शाळेचा विकासात्मक शिक्षणक्रम’ हा अभ्यासक्रम ऑक्टोबर २००५ साली प्रकाशित झाला.
|
प्रसाद य. ताम्हनकर, सोमवार, २३ ऑगस्ट २०१०
भाषा! एक संपर्क माध्यम! नक्की केव्हा निर्माण झाली? हे सांगणं खचितच कठीण आहे; परंतु माणसाला जेव्हा आपल्या भावनांची देवाणघेवाण कराविशी वाटली तेव्हाच भाषा उदय पावली. प्रथम सांकेतिक भाषा, मग विविध उच्चार, शब्द, वाक्य असा प्रवास करीत भाषा समृद्ध झाली.
|
नीरज पंडित, सोमवार, १६ ऑगस्ट २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
भारतात आयटी क्षेत्राने मुबलक पैसा आणला परंतु त्याचबरोबर शिक्षणाचे वारेही उलटय़ा दिशेने फिरवले. पदवी मिळविली की तरूण गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीकडे धावू लागले आहेत. परिणामी आजही देशात मुलभूत विज्ञान आणि गणितात काम करणाऱ्यांची संख्या फार कमी आहे.
|
सोमवार, १६ ऑगस्ट २०१०
मराठी शाळांवर शासनादेशाचा वरवंटा फिरू लागल्यानंतर का होईना, पण या शाळा वाचविण्यासाठी राज्यभर रान उठविण्यात येत आहे. मात्र अजूनही शालेय शिक्षण खात्याचा प्रभारी कार्यभार असलेले कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह साऱ्याच ज्येष्ठ-श्रेष्ठ मंत्रिमहोदयांच्या गेंडय़ाच्या कातडीपर्यंत शिक्षणविश्वातील संवेदना पोहोचलेल्या नाहीत.
|
सोमवार, १६ ऑगस्ट २०१० शासनाने १९ जूनला जारी केलेल्या परिपत्रकाचा बळी विद्येच्या माहेरघरातील ग. रा. पालकर प्रशालेच्या माध्यमातून पडला आहे. राज्यातील इतरही भागांमधील मराठी विनाअनुदानित शाळांचे आठवीनंतरचे वर्ग यापुढील काळात बंद केले जाण्याचा धोका आहे.
|
आशिष पेंडसे ,सोमवार, ९ ऑगस्ट २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आज क्रांतिदिन! पुढच्या रविवारी स्वातंत्र्यदिन! मात्र, अजूनही आपण पारतंत्र्यातच नाही का? शिक्षणाचा प्रसार करण्याच्या नावाखाली सुरू असलेली खासगी संस्थाचालकांची मनमानी, पाच हजारांच्या वेतनचिठ्ठीवर स्वाक्षरी घेत हाती टिकविण्यात येणारे पंधराशे रुपये! शिक्षकांना सहावा वेतन आयोग लागू केल्याची बतावणी करून शुल्कामध्ये दुपटीने केली जाणारी वाढ नि फक्त कागदोपत्रीच दिल्या जाणाऱ्या साधनसुविधा! अर्थात, आपल्याला त्याचे काय! १५ ऑगस्ट रविवारी आला;
|
क्लास मॉनिटर
ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यांवरून जगभर काहूर माजले. ते हल्ले वर्णभेदी होते की नाही, हा वादाचा विषय ठरू शकेल. त्याविषयी दावे-प्रतिदावे केले जाऊ शकतील, पण भारतीय ‘घुसखोरी’च्या विरोधात कांगारू नक्कीच आक्रमक झाले आहेत.व्हिसा धोरणामध्ये ऑस्ट्रेलियाने केलेल्या बदलांवर नजर टाकली, तर त्याचाच प्रत्यय येतो.
|
दीनानाथ द. गोरे ‘लोकसत्ता’मध्ये २५ जुलै २००९ रोजी ‘नववी, दहावीतील या महत्त्वाच्या गोष्टींकडे कोणी लक्ष देईल?’ या शीर्षकाखाली बातमी दिली होती. त्यात असे म्हटले होते की, ज्या विद्यार्थ्यांना दहावी बोर्डाच्या बीजगणित-भूमिती पेपरात १२० पैकी २५ गुणही मिळालेले नाहीत, असे विद्यार्थी अंतर्गत गुण व ग्रेस मार्काच्या सवलतीमुळे गणितात पास झाले आहेत,
|
विजया चौहान, सोमवार, २ ऑगस्ट २०१०
सर्वप्रथम ‘लोकसत्ता’चे अभिनंदन! ‘केजी टू पीजी’च्या माध्यमातून मराठी शाळांच्या प्रश्नाला आपण जे महत्त्व दिले आहे नि मराठी शाळांचा कळीचा मुद्दा सातत्याने उचलून धरला आहे, त्याबद्दल अभिनंदन! शिक्षणामध्ये काम करीत असलेल्या विविध गट-शाळा एकत्रित येऊन मान्यतेच्या प्रश्नावर काम करीत आहेत.
|
रीसर्च फेलो, सोमवार, २ ऑगस्ट २०१०
वर्गामध्ये ‘ऑफ पिरियड’ मिळाला, की काय होते..? केवळ दंगा! तसाच काहीसा प्रकार पुणे विद्यापीठ शिक्षक संघ, म्हणजेच ‘पुटा’ या प्राध्यापकांच्या संघटनेमध्ये काही महिन्यांपासून सुरू होता. तशी ही संघटना शिस्तप्रिय. पुणे विद्यापीठातील विविध अधिकार मंडळांना शैक्षणिक-वैचारिक नेतृत्व देणारी; परंतु गेल्या वर्षी विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ केंद्रातील गैरव्यवहारांच्या आरोपाचे निमित्त झाले नि संघटनेचा वर्ग उधळला गेला.
|
|
|
<< Start < Prev 1 2 Next > End >>
|
|
लोकरंग
‘चिनी ज्यादा’ !
अनिकेत साठे - रविवार, ५ सप्टेंबर २०१० ( sathe.aniket@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चिनी लष्कराच्या मुक्त संचारामुळे भारताची चिंता वाढली असून त्यामागे ‘ड्रॅगन’ची नेमकी काय चाल आहे, असा प्रश्न होतो. त्याचे उत्तर शोधताना हा विषय केवळ गिलगिटपुरताच मर्यादित नाही, तर त्याला विविध स्वरूपाचे कंगोरे असल्याचे लक्षात येते. अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून संरक्षण क्षेत्रात अफाट गुंतवणूक करणारा चीन सध्या जी पावले टाकतो आहे, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाही गर्भित इशारा देण्याचा भाग आहे. |
दिनदर्शिका
गुरुवार, ९ सप्टेंबर २०१०. मिती भाद्रपद शुद्ध प्रतिपदा १२ क. ०८ मि.पर्यंत. उत्तरा नक्षत्र २० क. ५१ मि.पर्यंत. कन्या चंद्र. सूर्योदय- ६।२६ सूर्यास्त- ६।४६ मेष - शत्रूंवर लक्ष ठेवा, वृषभ - मुलांचे प्रश्न सुटतील, मिथुन - घरात शांतता ठेवा, कर्क - छोटे-मोठे प्रवास होतील, सिंह - अचानक दडपण वाढतील, कन्या - महत्त्वाचे निर्णय घ्याल, तूळ - देवघेवीत चुका करू नका, वृश्चिक - पैसा हाती येईल, धनू - सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, मकर - प्रयत्न कारणी लागतील, कुंभ - अडचणींचा दिवस, मीन - शासकीय कामे होतील. शुभराशी : वृश्चिक / धनू / मकर
|