मुखपृष्ठ >> शेतीवाडी
 


स्पर्धेचे नियम व अटी




शेतीवाडी
परदेशी शेतकरी बाजार Print E-mail
मंदार गडगे - सोमवार, ३० ऑगस्ट २०१०
जागतिकीकरणामुळे अनेक देशांमध्ये शेतमाल विक्रीबाबत अधिक खुलेपणाचे प्रयोग केले जात आहेत. आपल्याकडे शेतकरी बाजार संकल्पना राबविली जात आहे. तिकडे ब्रिटनमध्येही शेतकरी बाजार भरवले जात आहेत. एका अभ्यासक्रमाच्या निमित्ताने तेथे या बाजारांचे निरीक्षण व अभ्यास करणाऱ्या प्रस्तुत लेखकाची ही लेखमाला ..
युरोप व अमेरिकेत शेतमाल खरेदीचा एक नवा प्रकार उदयाला येत असून, सुपरमार्केटबरोबरच या पारंपरिक, परंतु आधुनिकतेचा साज लाभलेल्या मार्केटला मोठी मागणी आहे. दिवसेंदिवस या बाजाराची लोकप्रियता वाढत चालली आहे.
 
पैक्याचं तागडं Print E-mail
पांडुरंग गायकवाड - सोमवार, ३० ऑगस्ट २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आपल्याकडे शेतकरी हा काबाडकष्ट करणारा, फाटके-तुटके कपडे असलेला अशी एक प्रतिमा आहे. त्यात तथ्य नाही असे नाही. बहुतांश शेतकरी याच स्तरावरचा आहे यात वाद नाही. पण शेतकऱ्यांमध्येही काही आळसावलेला शेतकरी तयार झालेला आहे. त्याला खरे तर नक्की काय म्हणायचे का इथपासून शंका उपस्थित करता येऊ शकतात.  कारण तो शेती करवून घेतो. स्वत: त्यात राबायला पुढे होत नाही. कारण आपल्या देशातील एकूण जमीनधारणेचे क्षेत्र कमीकमी होत चालले आहे.
 
अस्सल नैसर्गिक औषधी मध Print E-mail
सुधीर जन्नू - सोमवार, ३० ऑगस्ट २०१०
आपल्या देशामध्ये जन्मलेल्या मुलांना सर्वात आधी मधच चाटायला दिला जातो. कारण मध औषधी आणि गुणकारी आहे. मधाला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे. आजही आयुर्वेद औषधे ही मधामधूनच घेण्याचा सल्ला वैद्य आणि डॉक्टर्स देतात.
महाराष्ट्रात अस्सल मध सातपुडा आणि महाबळेश्वर या भागात मिळतो. मध हे एक नैसर्गिक औषध आहे. निसर्गाने दिलेली एक भेट आहे.
 
नवसंजीवनी : करडांची काळजी Print E-mail
डॉ. अविनाश देव - सोमवार, ३० ऑगस्ट २०१०
शेळ्या अंदाजे ७० टक्के पावसाळ्यात, १० टक्के हिवाळ्यात आणि १० टक्के उन्हाळ्यात माजावर येतात. शेळी गाभण गेल्याचे सर्वात सोपे लक्षण म्हणजे शेळी माजावर येण्याचे थांबते. शेळी स्वभावाने जरा शांत होते. आणि १५-२० दिवसांनी दूध कमी होते. शेळीची भूक वाढते, वजन वाढते शेळी बोकडा सोबत जवळीक करीत नाही किंवा बोकडाला जवळ येऊ देत नाही, शरीरावर चकाकी येते. डोळे तेजदार/ पाणीदार दिसतात.
 
सेंद्रिय शेतीचे ब्रँडिंग Print E-mail
मंदार गडगे, सोमवार, २ ऑगस्ट २०१०
शाश्वत शेतीपद्धती ज्यामध्ये शेतीची रचना व व्यवस्थापनापासून अशी निसर्गप्रणाली निर्माण करणे की, ज्यामुळे शेतीची शाश्वत उत्पादकता, रासायनिक खते व कीडनाशके औषधांच्या वापराशिवाय टिकवता येईल अशी सेंद्रिय शेतीची व्याख्या प्रमाणित केली जाते.
 
मुरमाड जमिनीचं झालं सोनं Print E-mail
गो. धों. जगधने, सोमवार, २ ऑगस्ट २०१०
शेतीवर जीवापाड प्रेम, जिद्दीबरोबरच कष्ट करण्याची, राबण्याची तयारी आणि शेतीत नवनवीन प्रयोग करण्याची कल्पकता यामुळे उजाड माळरानातील मुरमाड जमिनीतही सोनं पिकविण्याची किमया बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुकचे प्रयोगशील शेतकरी अशोक पाटील तावरे यांनी साध्य केली आहे. त्यांच्या अविरत  प्रयोगाने त्यांना नवी ओळख मिळाली. यामुळे त्यांना इस्राएल, इजिप्त आणि चीन देशाची सफर करण्याची, तेथील शेती व आधुनिक तंत्रज्ञान अभ्यासण्याची संधी मिळाली.
 
नवसंजीवनी : पावसाळ्यातील शेळी व्यवस्थापन Print E-mail
डॉ. अविनाश देव, सोमवार, २ ऑगस्ट २०१०
महाराष्ट्रामध्ये सन २००८ च्या पशुगणनेनुसार १०२.८८ लाख शेळ्या आहेत. राज्यातील मुंबई आणि उपनगरे जिल्हे वगळता शेळीपालन व्यवसाय सर्व जिल्ह्य़ांमध्ये केला जातो. परंतु कोरडे हवामान असलेल्या जिल्ह्य़ांमध्ये हा व्यवसाय मोठय़ा प्रमाणावर केला जातो. कोरडे हवामान असलेले हे जिल्हे बहुतांशी दुष्काळ प्रवण जिल्हे आहेत.
 
ब ब बळीचा : शेतमजुरांची वानवा Print E-mail
पांडुरंग गायकवाड, सोमवार, २ ऑगस्ट २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आपल्याकडचा सामान्य शेतकरी म्हणजे खऱ्या अर्थाने आजवर पाहिलेल्या गरीब शेतकऱ्याच्या चित्राशी साजेसा! दोन दशकांपूर्वीचा शेतकरी आज राहिलेला नाही ही खरी गोष्ट! दाढीची वाढलेली खुटाडं, डोक्याला अस्ताव्यस्त गुंडाळलेलं मुंडासं, गुंडय़ांचा सदरा आणि विरलेला व काही ठिकाणी अधिक फाडू नये म्हणून गाठी मारलेलं धोतर!
 
राष्ट्रीय स्तरावर पाण्याबद्दलची अनास्था Print E-mail
डॉ. दि. मा. मोरे, सोमवार, १९ जुलै  २०१०
संपर्क- मो. ९४२२७७६६७०
राष्ट्रीय परिषदेवर अन्न, कृषी, रोजगार, जातीय हिंसाचार, ग्रामीण विकास, सामाजिक सुरक्षा व विकास, महिला, उद्योग, शिक्षण, पर्यावरण, दलित इ. प्रमुख विषयांचा पाठपुरावा करण्यासाठी वेगवेगळय़ा तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आलेली आहे, पण या सर्व व्यवस्थेचा जो प्राणवायू आहे तो म्हणजे पाणी, या विषयाचा पाठपुरावा करणारा तज्ज्ञ राष्ट्रीय सल्लागार परिषेदला मिळाला नाही का?
नुकतेच राष्ट्रीय सल्लागार परिषदेवर देशातील १३ तज्ज्ञांची नियुक्ती झाल्याची बातमी वर्तमानपत्रांतून वाचण्यात आली.
 
ब ब बळीचा : बलुत्याचा गावगाडा Print E-mail
पांडुरंग गायकवाड, सोमवार, १९ जुलै  २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
खरं तर आपल्या समाजात शहरी व ग्रामीण असा भेद शहरकेंद्रित  दृष्टिकोनामुळे वाढत गेला. शहरं ही रोजगार व उद्योगांची केंद्रं बनत गेली. गावांमधून शहरांकडे होणारे स्थलांतरही याच प्रक्रियेचा भाग आहे. गावागावांतले कुटिरोद्योग संपत गेले.
 
मूलस्थानी जलसंधारण Print E-mail
प्रा. मधुकर मोरे, सोमवार, १९ जुलै  २०१०
संपर्क- ९४२०९०७१६७
आज महाराष्ट्रातील सुमारे ८३ टक्के क्षेत्र कोरडवाहू असून, ते पूर्णत पावसावर अवलंबून आहे. कोरडवाहू क्षेत्रातून सद्यस्थितीत मिळणारे उत्पादन शाश्वत स्वरूपाचे नाही. पावसाचा लहरीपणा, पावसाचे अनियमित वितरण यामुळे कोरडवाहू शेतीच्या पिकोत्पादनात नेहमी अस्थिरता आढळून येत आहे.
 
नवसंजीवनी : बकरी मित्र Print E-mail
रा. कृ. माहुली, सोमवार, १९ जुलै  २०१०
संपर्क- ९८९०१९८४८९, ९८६०८३५४२६
पश्चिम बंगाल राज्य ब्लॅक बंगाल जातीच्या शेळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या शेळ्या आकाराने लहान असल्या तरी त्यांचे प्रजननाचे प्रमाण, उत्कृष्ट चवीचे मटण आणि त्याच्या कातडीला असलेली आंतरराष्ट्रीय मागणी फारच वैशिष्टय़पूर्ण आहे.
 


ताज्या बातम्या



लोकरंग

‘चिनी ज्यादा’ !

अनिकेत साठे - रविवार, ५ सप्टेंबर २०१०
( sathe.aniket@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चिनी लष्कराच्या मुक्त संचारामुळे भारताची चिंता वाढली असून त्यामागे ‘ड्रॅगन’ची नेमकी काय चाल आहे, असा प्रश्न होतो. त्याचे उत्तर शोधताना हा विषय केवळ गिलगिटपुरताच मर्यादित नाही, तर त्याला विविध स्वरूपाचे कंगोरे असल्याचे लक्षात येते. अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून संरक्षण क्षेत्रात अफाट गुंतवणूक करणारा चीन सध्या जी पावले टाकतो आहे, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाही गर्भित इशारा देण्याचा भाग आहे.

दिनदर्शिका

दिनांक ८ सप्टेंबर २०१० बुधवार मिती श्रावण वद्य अमावस्या १६ क. ०० मि. पूर्वा नक्षत्र २३ क. ५० मि. सिंह चंद्र २९ क. ५ मि.पर्यंत. सूर्योदय- ६।२६ सूर्यास्त- ६।४७. दर्श अमावस्या पोळा.
मेष -
योजना वेग घेतील, वृषभ - घरगुती प्रश्नांवर लक्ष ठेवा, मिथुन - महत्त्वाची कामे होतील, कर्क - जबाबदाऱ्या पूर्ण कराल, सिंह - नवे तंत्र यशस्वी ठरेल, कन्या - विचाराने पावले उचला, तुला - अनेकांचे सहकार्य मिळेल, वृश्चिक - प्रिय व्यक्तींच्या भेटी, धनु - मोठी उलाढाल होईल, मकर - थांबा बघा पुढे चला, कुंभ - वेळ वाया घालवू नका, मीन - मार्ग सापडतील, यश मिळेल.
शुभराशी- मिथुन, सिंह, तुला.