मुखपृष्ठ >> नगर वृत्तान्त
 


स्पर्धेचे नियम व अटी




नगर वृत्तांत
नागरी सुविधांसाठीच्या आंदोलनात अनेक प्रतिष्ठितांना अटक Print E-mail
नगर, ८ सप्टेंबर/प्रतिनिधी
नागरी सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ कधी नव्हे तो प्राध्यापक, शिक्षक, नोकरदार असा पांढरपेशा वर्ग आज रस्त्यावर उतरला व त्यांना थेट पोलीस ठाण्याची हवा खावी लागली. इतके झाल्यानंतरही मनपाच्या एकाही अधिकाऱ्याला त्यांची दया आली नाही. त्यामुळेच ‘निबर कातडीचे’ अशी बिनचूक संभावना त्यांची एका आंदोलकाने केली.
 
लिलावाची रक्कम सर्वोच्च न्यायालयात भरावी लागणार Print E-mail
‘जगदंबा’ विक्री प्रकरण
कर्जत, ८ सप्टेंबर/वार्ताहर

दिवाळखोरीत सापडलेल्या तालुक्याची एकमेव कामधेनू जगदंबा सहकारी साखर कारखाना विक्रीस काढणाऱ्या नगर जिल्हा सहकारी बँकेच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट सुरूच राहणार असल्याचे दिसते. सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा बँकेला हा कारखाना विकल्यावर मिळणारी सर्व रक्कम न्यायालयात भरण्याचे आदेश दिले आहेत.
 
चारजणांना अटक करून दीड लाखाचा ऐवज जप्त Print E-mail
कृत्रिम दूधनिर्मिती व भेसळ
श्रीरामपूर, ८ सप्टेंबर/प्रतिनिधी

कृत्रिम दूधनिर्मिती व भेसळप्रकरणी पोलिसांनी व्यापारी, दूध प्रकल्पाच्या चालकासह चारजणांना अटक केली असून, दीड लाखाचा ऐवज जप्त केला आहे. आत्तापर्यंत चौदाजणांना अटक झाली असून, दोघे फरार आहेत. चाळीसहून अधिक लोकांवर कारवाई केली जाणार आहे.
 
पायोनिअरच्या बाजरी वाणातही फसवणूक Print E-mail
राहाता, नेवाशात मोठे नुकसान
नगर, ८ सप्टेंबर/प्रतिनिधी

यंदाच्या खरीप हंगामात टोमॅटोपाठोपाठ बाजरीच्या वाणातही फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्हा तक्रार निवारण समितीने केलेल्या प्राथमिक चौकशीत पायोनिअर कंपनीच्या बाजरीच्या ८६ एम ३२ या संकरित वाणाबाबत राहाता व नेवासे तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले.
 
मारुतराव घुले पाटील स्मृती पुरस्कार Print E-mail
रावसाहेब शिंदे यांना जाहीर
नेवासे, ८ सप्टेंबर/वार्ताहर

ज्ञानेश्वर उद्योगसमूहाचे संस्थापक (कै.) मारुतराव घुले पाटील यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा (कै.) मारुतराव घुले पाटील स्मृती पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब शिंदे यांना जाहीर झाल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष देसाई देशमुख व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष अनिल शेवाळे यांनी दिली.
 
नेवाशाच्या दरोडय़ाचा तपास हे पोलिसांसमोरील आव्हान Print E-mail
नेवासे, ८ सप्टेंबर/वार्ताहर
एकाच कुटुंबातील तीनजणांच्या हत्येच्या तपासाचे प्रकरण पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे. प्रथमदर्शनी दरोडा वाटणाऱ्या या प्रकारामागे पूर्ववैमनस्य वा अन्य कोणती कारणे असू शकतात याचा तपास पोलीस घेत असले, तरी ते अद्यापि कोणत्याही ठोस निर्णयापर्यंत पोहोचलेले नाहीत.
 
कुकडी प्रकल्पातील धरणांत ५७ टक्के पाणीसाठा Print E-mail
श्रीगोंदे, ८ सप्टेंबर/वार्ताहर
तालुक्यास वरदान ठरणाऱ्या कुकडी प्रकल्पातील धरणांत १७ हजार ६०२ दशलक्ष घनफूट (५७.८२ टक्के) पाणीसाठा झाल्याने यंदाही धरणे लवकर भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घोड धरणातही सव्वातीन टीएमसी (६२ टक्के) पाणीसाठा झाला असून, दोन्ही प्रकल्पात गेल्या वर्षी आजच्याच दिवशीपेक्षा दोन टीएमसी पाणी अधिक आहे.
 
धरणांतून पाणी सोडल्याने गोदावरी दुथडी भरून वाहू लागली Print E-mail
कोपरगाव, ८ सप्टेंबर/वार्ताहर
नाशिक जिल्ह्य़ातील धरणांच्या पाणलोटक्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्याने बहुतांशी धरणे भरली आहेत. त्यामुळे गोदावरी नदीपात्रात २० हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले असून, गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. आज शहर व परिसरात मुसळधार पाऊस पडला.
 
नवलेवाडीची मुले घालणार पत्राद्वारे राष्ट्रपतींना साकडे Print E-mail
पुरस्कार प्रकरण न्यायालयात जाण्याची चिन्हे
अकोले, ८ सप्टेंबर/वार्ताहर

तालुक्यातील आदर्श शिक्षक पुरस्काराचे प्रकरण आता न्यायालयात जाण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे नवलेवाडी शाळेतील मुले या प्रकरणी थेट राष्ट्रपतींना पत्राद्वारे साकडे घालणार आहेत. माहितीच्या अधिकारानुसार योग्य ती कागदपत्रे उपलब्ध करून या प्रकरणी न्यायालयात जाण्याचा निर्णय नवलेवाडी गावकरी व शिक्षण समितीच्या बैठकीत आज घेण्यात आला.
 
‘लवासा’प्रकरणी पवारांची बदनामी - आदिक Print E-mail
श्रीरामपूर, ८ सप्टेंबर/प्रतिनिधी
‘लवासा’ प्रकरणाशी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा संबंध नाही. पूर्वी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी पवारांना एन्रॉनप्रकरणी बदनाम केले. आता ‘लवासा’शी संबंध जोडला जात आहे. महसूलमंत्री नारायण राणे चौकशी करायला निघाले, पण राणे माघारी फिरले.
 
‘मोस्ट वॉन्टेड नांगऱ्या’ ला श्रीगोंदे पोलिसांकडे देणार Print E-mail
श्रीगोंदे, ८ सप्टेंबर/वार्ताहर
तीन राज्यांतील १४ ठिकाणच्या पोलिसांना हवा असलेला अट्टल दरोडेखोर दीपक युनूस काळे ऊर्फ नांगऱ्या पुढील आठवडय़ात श्रीगोंदे पोलिसांच्या ताब्यात येणार आहे. येथील बोरा ज्वेलर्स या सराफी पेढीवर तीन वर्षांपूर्वी पडलेल्या दरोडय़ातील प्रमुख आरोपी असलेल्या नांगऱ्याला येथील पोलिसांकडे सोपविण्याची सर्व कार्यवाही पूर्ण झाली आहे.
 
दूधभेसळीचे साहित्य मुंबईहून आल्याचे उघड Print E-mail
श्रीरामपूर, ८ सप्टेंबर/प्रतिनिधी
शिलाई मशीन, फ्रीज, कपडे धुणे, अगरबत्ती बनविणे आदी कामांसाठी लूप ऑईल विकले जाते. अखाद्य असे हे ऑईल कृत्रिम दूधनिर्मिती व भेसळीसाठी वापरले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
 
गणेश मंडळांनी आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन Print E-mail
देवळाली प्रवरा, ८ सप्टेंबर/वार्ताहर
गणेश मंडळांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून उत्कृष्ट सामाजिक देखावे सादर करावेत. अशा देखाव्यांना तीन हजार, दोन हजार व १ हजाराची पहिली तीन बक्षिसे दिली जातील, असे प्रतिपादन राहुरीचे तहसीलदार अमित सानप यांनी केले.
 
लोकसेवेचा समृद्ध वारसा Print E-mail
विनायक देशमुख
राज्याचे आदिवासी विकासमंत्री व अहमदनगर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री बबनराव पाचपुते आज ९ सप्टेंबर रोजी वयाची ५६ वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यांचे एक सहकारी व व्हिजन २०२० चे जिल्हा समन्वयक विनायक देशमुख यांनी घेतलेला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आढावा..
 
‘मुळा-प्रवरा’च्या क्षेत्रात पूर्वीप्रमाणेच वीजकपात Print E-mail
ग्राहकांमध्ये नाराजी
राहुरी, ८ सप्टेंबर/वार्ताहर

मुळा-प्रवरा वीज संस्थेच्या कार्यक्षेत्रातील वीजकपात वीज कंपनीने १५ दिवसांनंतरही कमी न केल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कार्यक्षेत्रात सुमारे दीड लाख ग्राहक आहेत.
 
आले गणराय : छोटय़ा मंडळांकडून ढोल-लेझीमला चांगली मागणी Print E-mail
नगर, ८ सप्टेंबर/प्रतिनिधी
डीजेमुळे ढोल-लेझीमचे महत्त्व कमी झाले असले, तरी छोटय़ा गणेश मंडळांकडून ढोल-लेझीमला अजून चांगली मागणी आहे. नगरमधील वाद्यांच्या दुकानांत दोन दिवसांपासून खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. भर पावसात ढोलाचे आवाज घुमू लागले आहेत.
 
कचरा संकलनाच्या खासगीकरणाच्या Print E-mail
विरोधात मनपा कर्मचाऱ्यांचे धरणे
नगर, ८ सप्टेंबर/प्रतिनिधी

कचरा संकलनाचे खासगीकरण रद्द करावे व महिन्याच्या १ तारखेला वेतन मिळावे, या मागणीसाठी महापालिका कर्मचारी युनियनतर्फे आज सकाळी मनपा कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आयुक्त व उपायुक्तांशी झालेल्या चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
 
अपंगांच्या आशियाई स्पर्धेसाठी धनुर्विद्या निवडचाचणी नगरमध्ये सुरू Print E-mail
नगर, ८ सप्टेंबर/प्रतिनिधी
चीनमध्ये होणाऱ्या अपंगांच्या आशियाई स्पर्धातील धनुर्विद्या क्रीडा प्रकारातील भारतीय संघाच्या निवडचाचणीस आज येथील लष्कराच्या यांत्रिकी पायदळ विभागातील (एमआयआरसी) बॉईज स्पोर्टस् होस्टेलच्या आर्चरी रेंजवर सुरुवात झाली. पॅरालिम्पिक आर्चरी फेडरेशन ऑफ इंडियाने ही चाचणी आयोजित केली आहे.
 
शहर व परिसरात ‘पूर्वा’च्या दमदार सरी Print E-mail
नगर, ८ सप्टेंबर/प्रतिनिधी
तुरळक पावसाचा अपवाद वगळता आठवडाभराच्या विश्रांतीनंतर आज शहर व परिसरात पूर्वा नक्षत्राच्या दमदार सरी कोसळल्या. पाच तालुक्यांमध्ये अजूनही सरासरीपेक्षा कमी पाऊस असला, तरी उर्वरित ९ तालुक्यांसह जिल्ह्य़ाने आता पावसाची सरासरी ओलांडली आहे.
 
‘घरपोच धान्य’मुळे गैरप्रकार थांबतील - हजारे Print E-mail
नगर, ८ सप्टेंबर/प्रतिनिधी
‘घरपोच धान्य’ ही सरकारची योजना चांगली असून, त्यामुळे स्वस्त धान्य योजनेत होणारे सर्व गैरप्रकार बंद होतील, अशी खात्री ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 1 of 10

ताज्या बातम्या



लोकरंग

‘चिनी ज्यादा’ !

अनिकेत साठे - रविवार, ५ सप्टेंबर २०१०
( sathe.aniket@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चिनी लष्कराच्या मुक्त संचारामुळे भारताची चिंता वाढली असून त्यामागे ‘ड्रॅगन’ची नेमकी काय चाल आहे, असा प्रश्न होतो. त्याचे उत्तर शोधताना हा विषय केवळ गिलगिटपुरताच मर्यादित नाही, तर त्याला विविध स्वरूपाचे कंगोरे असल्याचे लक्षात येते. अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून संरक्षण क्षेत्रात अफाट गुंतवणूक करणारा चीन सध्या जी पावले टाकतो आहे, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाही गर्भित इशारा देण्याचा भाग आहे.

दिनदर्शिका

गुरुवार, ९ सप्टेंबर २०१०. मिती भाद्रपद शुद्ध प्रतिपदा १२ क. ०८ मि.पर्यंत. उत्तरा  नक्षत्र २० क. ५१ मि.पर्यंत. कन्या चंद्र. सूर्योदय- ६।२६ सूर्यास्त- ६।४६
मेष
- शत्रूंवर लक्ष ठेवा, वृषभ - मुलांचे प्रश्न सुटतील, मिथुन - घरात शांतता ठेवा, कर्क - छोटे-मोठे प्रवास होतील, सिंह - अचानक दडपण वाढतील, कन्या - महत्त्वाचे निर्णय घ्याल, तूळ - देवघेवीत चुका करू नका, वृश्चिक - पैसा हाती येईल, धनू - सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, मकर - प्रयत्न कारणी लागतील, कुंभ - अडचणींचा दिवस, मीन - शासकीय कामे होतील.
शुभराशी : वृश्चिक / धनू / मकर