|
|
विदर्भ वृत्तांत
* २७ तलाव फुटले * १८१ गावांना फटका * गोसीखूर्दचे ३३, इरईचे ६ दरवाजे उघडले* गावांना सतर्कतेचा इशारा, मार्ग बंद * विदर्भात कुठे रिमझिम तर कुठे जोरदार पाऊस चंद्रपूर, ८ सप्टेंबर/प्रतिनिधी
जिल्ह्य़ात सर्वदूर मुसळधार पावसाची झड सुरू असून आज तिघे वाहून गेले. या पावसाचा फटका १८१ गावांना बसल्याने ३० हजार हेक्टरमधील पिकाचे तर, छोटे मोठे २७ तलाव फुटल्याने सिंचन विभागाचे कोटय़वधीचे नुकसान झाले आहे.
|
लाखो भाविक येणार, स्वागतासाठी संतनगरी सज्ज शेगाव, ८ सप्टेंबर / वार्ताहर
श्रीसंत गजानन महाराजांच्या संजीवन समाधी शताब्दी सोहोळ्यास उद्या ९ सप्टेंबरपासून प्रारंभ होत आहे. ४ दिवस चालणाऱ्या या भव्य सोहोळ्याची जय्यत तयारी प्रशासन व संस्थानकडून करण्यात आली असून लाखोंच्या संख्येने दाखल होणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी संतनगरी सज्ज झाली आहे. राज्यभरातून या शताब्दी सोहोळ्यानिमित्त भक्त शेगावात दाखल होण्यास प्रारंभ झाला आहे.
|
सहाव्या वेतन अयोगातून वगळले! यवतमाळ, ८ सप्टेंबर / वार्ताहर राज्य शासनाने अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक, ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालकांना सहावा वेतन आयोग लागू केला आहे. मात्र, २० ऑगस्ट १० च्या शासन निर्णयानुसार शासकीय आणि शासन अनुदानित खाजगी महाविद्यालयांनाच हा आयोग लागू असल्याचे म्हटले आहे. विना अनुदानित खाजगी महाविद्यालयांना या ‘जी.आर.’ने वगळले आहे.
|
‘क्रिएटीव्ह आयची’ डिजिटल फोटोग्राफी कार्यशाळा बुलढाणा, ७ सप्टेंबर/ प्रतिनिधी ज्या फोटोग्राफीने मला समाजात मान-सन्मान-प्रतिष्ठा दिली त्या व्यवसायाला न्याय दिला पाहिजे, हा माझा प्रयत्न आहे. आपला व्यवसाय बदनाम होणार नाही, अशी वर्तणूक फोटोग्राफरची असली पाहिजे. तुमच्या सोबत इतरांनाही या प्रवाहात सामील करून घेण्याचा प्रयत्न सगळ्यांनी केला पाहिजे, असे प्रभावी विचार अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रा. राघवेंद्र कट्टी यांनी व्यक्त केले.
|
शेंदुरजनाघाट, ८ सप्टेंबर / वार्ताहर दरवर्षी प्रमाणे गोकुळाष्टमीच्या महापर्वाचे औचित्य साधून राज्यस्तरीय श्रीमद्भगवद्गीता ज्ञान स्पर्धा परीक्षेचे आयोजन अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन मंडळाच्या वतीने येथील जनता हायस्कूल व एन.जी. मोघे कनिष्ठ महाविद्यालय, एम.सी.व्ही.सी. येथे करण्यात आले.
|
अकोला, ८ सप्टेंबर / वार्ताहर जिल्हा क्रीडा अधिकारी व अकोला महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १४ वर्षे वयोगटातील शालेय टेबल टेनिस स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेमध्ये एकूण १० शाळांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत डी.ए.व्ही. स्कूलच्या १४ वर्षीय वयोगटातील मुलींचा पहिला सामना घोषित करण्यात आला.
|
गोंदिया, ८ सप्टेंबर/वार्ताहर योग्य मार्गदर्शन तसेच, नियोजनाच्या अभावामुळे यंदादेखील गोंदिया जिल्ह्य़ातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या होतकरू स्पर्धकांची नुकत्याच घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पूर्व स्पर्धा परीक्षेत पिछेहाट झालेली आहे.
|
शिक्षक मतदारसंघ गोंदिया, ८ सप्टेंबर/वार्ताहर मागील अनेक वर्षांपासून राज्याच्या शिक्षण क्षेत्रात अनेक नवीन प्रयोग व निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे राज्यातील शिक्षण व्यवस्था भरकटली असून गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून विद्यार्थ्यांना वंचित रहावे लागत आहे.
|
मायक्रोबायोलॉजी व बायोटेक्नॉलॉजीवर प्रात्यक्षिक कार्यशाळा चंद्रपूर, ८ सप्टेंबर/प्रतिनिधी सरदार पटेल महाविद्यालयात मायक्रोबायोलॉजी व बायोटेक्नॉलॉजी विभागातर्फे विद्यापीठस्तरीय अत्यंत विकसित पॅ्रक्टीकल पद्धती या विषयावर चंद्रपूर व गडचिरोली या अतिदुर्गम जिल्हय़ांच्या विद्यार्थ्यांकरिता दोन दिवसीय प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
|
वाशीम, ८ सप्टेंबर / वार्ताहर ‘रॅगिंग’चे वाढते प्रमाण पाहता शासनाने महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायदा १९९९ अमलात आणला आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास शिक्षा होऊन विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते.
|
शेतकऱ्यांच्या लढाईत महिलांना सहभागी करण्याचे आवाहन वर्धा, ८ सप्टेंबर / प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या लढाईत महिलांना आवर्जून सहभागी क रून घेतले पाहिजे, असे मत महाराष्ट्र सवरेदय मंडळाचे अध्यक्ष शंकरराव बगाडे यांनी सेवाग्राम येथे किसान अधिकार अभियानातर्फे आयोजित संघटन शिबिरात बोलताना व्यक्त केले.
|
शेंदुरजनाघाट, ८ सप्टेंबर / वार्ताहर मृग नक्षत्राच्या शेवटच्या चरणात यावर्षीच्या पावसाने खऱ्या अर्थाने सुरुवात केली. पेरणीला सुरुवात झाली. प्रत्येक नक्षत्रात पडणाऱ्या पावसाने सुरुवातीला आनंदी दिसणारा शेतकरी नंतर मात्र सततच्या पावसाने चिंताग्रस्त झाला कारण, अति पावसाने पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला.
|
लाखांदूर, ८ सप्टेंबर/ वार्ताहर दोन दिवसांपासून पडलेल्या संततधार पावसाने मोठी हानी झाली असून चुलबंद नदीला आलेल्या महापुरात तालुक्यातील ३ हजार हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे. संपूर्ण धान शेती पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
|
ऐन पोळ्याच्याच दिवशी पावसाची रिपरिप यवतमाळ, ८ सप्टेंबर / वार्ताहर भरपूर पाऊस, उत्तम पिके हिरवीगार शेती आणि प्रसन्न वातावरण यामुळे यंदा पोळा मोठय़ा उत्साहात साजरा करण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली होती. पण, ऐन पोळ्याच्याच दिवशी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या अत्यंत प्रिय असलेल्या पोळ्याचा सण साजरा करण्याच्या उत्साहावर पावसानेच विरजण टाकले.
|
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा अंजनगावसुर्जी, ८ सप्टेंबर / वार्ताहर गेल्या दोन दिवसांपासून शहानूर नदीच्या उगम परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे शहानूर धरणाचे चारही दरवाजे आज उघडण्यात आले. नदीकाठाच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आल्याचे तहसीलदार बळवंत अरखराव यांनी सांगितले.
|
वर्धा, ८ सप्टेंबर / प्रतिनिधी जिल्ह्य़ातील पावसाचा जोर अद्याप ओसरला नसून पाऊस व धरणातील पाण्याने नदी नाले ओसंडून वाहू लागले आहे. यातच दोघांचा बळी गेला. सतत १५ दिवसांपासून सुरू पावसाने शहरी व ग्रामीण जनजीवन चांगलेच त्रस्त झाले आहे. पीक हातून गेल्याची सर्व भागातून असलेली भावना शेतकऱ्यांना रडवेली करणारी ठरत आहे.
|
चिखली, ८ सप्टेंबर/ वार्ताहर पैनगंगा नदीवरील मेहकर जवळील पूल आता जुना व धोकादायक झाला असल्याने त्वरित त्या ठिकाणी उंच पूल बांधणे गरजेचे आहे. यावर्षी वेळोवेळी झालेल्या पावसामुळे या पुलावरून पाणी वाहू लागल्याने अनेक वेळा वाहतूक विस्कळीत झाली आहे.
|
खा. भावना गवळींसह अनेकांचा सवाल यवतमाळ, ८ सप्टेंबर / वार्ताहर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ‘पालकत्व’ सोडले की काय? असा प्रश्न सेना खासदार भावना गवळी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी उपस्थित करून पालकमंत्री नियुक्त करण्याच्या पद्धतीतच बदल करण्याची आवश्यकता प्रतिपादन केल्याने राज्यभर हा प्रश्न आता चर्चेत येणार अशी चिन्हे आहेत.
|
मानोरा, ८ सप्टेंबर / वार्ताहर ग्रामीण रुग्णालय येथे रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकारी तसेच इतर पदे त्वरित भरण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे तालुका प्रमुख रवी पवार यांनी आरोग्य उपसंचालक व जिल्हा राज्य चिकित्सक यांना निवेदनाद्वारे दिला होता.
|
अंजनगावसुर्जी, ८ सप्टेंबर / वार्ताहर श्री देवनाथ महाराजांच्या सुर्जीत उद्या ९सप्टेंबरला शंभर वर्षांची परंपरा असलेली नंदीबैलाची द्वारकायात्रा भरणार आहे. प्रशासकीय नोंदीनुसार संवेदनशील असलेल्या शहरात रमजानईदच्या पूर्वसंध्येला ही यात्रा भरत असल्यामुळे शांतता व सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी संपूर्ण शहरात अतिरिक्त सुरक्षा रक्षक तैनात केले आहे.
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
|
Page 1 of 38 |
|
लोकरंग
‘चिनी ज्यादा’ !
अनिकेत साठे - रविवार, ५ सप्टेंबर २०१० ( sathe.aniket@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चिनी लष्कराच्या मुक्त संचारामुळे भारताची चिंता वाढली असून त्यामागे ‘ड्रॅगन’ची नेमकी काय चाल आहे, असा प्रश्न होतो. त्याचे उत्तर शोधताना हा विषय केवळ गिलगिटपुरताच मर्यादित नाही, तर त्याला विविध स्वरूपाचे कंगोरे असल्याचे लक्षात येते. अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून संरक्षण क्षेत्रात अफाट गुंतवणूक करणारा चीन सध्या जी पावले टाकतो आहे, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाही गर्भित इशारा देण्याचा भाग आहे. |
दिनदर्शिका
गुरुवार, ९ सप्टेंबर २०१०. मिती भाद्रपद शुद्ध प्रतिपदा १२ क. ०८ मि.पर्यंत. उत्तरा नक्षत्र २० क. ५१ मि.पर्यंत. कन्या चंद्र. सूर्योदय- ६।२६ सूर्यास्त- ६।४६ मेष - शत्रूंवर लक्ष ठेवा, वृषभ - मुलांचे प्रश्न सुटतील, मिथुन - घरात शांतता ठेवा, कर्क - छोटे-मोठे प्रवास होतील, सिंह - अचानक दडपण वाढतील, कन्या - महत्त्वाचे निर्णय घ्याल, तूळ - देवघेवीत चुका करू नका, वृश्चिक - पैसा हाती येईल, धनू - सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, मकर - प्रयत्न कारणी लागतील, कुंभ - अडचणींचा दिवस, मीन - शासकीय कामे होतील. शुभराशी : वृश्चिक / धनू / मकर
|