मुखपृष्ठ >> मराठवाडा वृत्तान्त
 


स्पर्धेचे नियम व अटी




मराठवाडा वृत्तांत
दोन अपघातांत सहा तरुण ठार Print E-mail
गेवराई, ६ सप्टेंबर/वार्ताहर
मोटरसायकलीला एस. टी. बसची जोराची धडक बसून तीन महाविद्यालयीन विद्यार्थी ठार झाले. वडगाव ढोक डोंगराच्या पायथ्याशी आज दुपारी १ वाजता हा अपघात झाला.
शिवाजीनगर (गढी) येथील जयभवानी महाविद्यालयात शिकत असलेले प्रदीप रूपा पवार (वय १९), प्रकाश बाबू पवार (वय २३), राजेंद्र अर्जुन राठोड (वय १९) अशी मृतांची नावे आहेत.
 
‘लवासाबाबत सीबीआय चौकशीची गरज नाही’ Print E-mail
नांदेड, ६ सप्टेंबर/वार्ताहर
‘लवासा’ प्रकरणात महसूल यंत्रणेमार्फत चौकशी सुरू आहे. त्यामुळे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याची सध्या तरी गरज वाटत नाही, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज सांगितले.
 
राहुल गांधी आज औरंगाबादमध्ये Print E-mail
पोलीस सज्ज; महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार
औरंगाबाद, ६ सप्टेंबर/प्रतिनिधी

काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी उद्या (मंगळवारी) शहरात येत असून त्यांच्या दौऱ्यामुळे पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. राष्ट्रीय सुरक्षा पथकाचे (एन. एस. जी.) अधिकारी शुक्रवारीच येथे दाखल झाले आहेत. सिडको नाटय़गृहात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी राहुल संवाद साधणार आहेत.
 
सहाव्या वेतन आयोगापासून बीड पालिका कर्मचारी वंचित Print E-mail
बीड, ६ सप्टेंबर/वार्ताहर
राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी गेल्या वर्षीच सहाव्या वेतन आयोगावर दिवाळी साजरी केली. बीड नगरपालिकेच्या ८५३ कर्मचाऱ्यांना मात्र अजूनही या वेतन आयोगाची प्रतीक्षा आहे. कधी पाचव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीच्या नावावर तर कधी आणखी काही कारण दाखवून या नगरपालिकेचा प्रस्ताव या कक्षातून त्या कक्षात फिरत असल्याने या कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग आपल्याला कधी लागू होणार, याची चिंता आहे. राज्यातील सुमारे ३० नगरपालिकांची परिस्थिती अशीच आहे.
 
जालना जिल्हा परिषदेच्या सभेत खतावरून गदारोळ Print E-mail
जालना, ६ सप्टेंबर/वार्ताहर
रासायनिक खतांच्या उपलब्धतेवरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आज गदारोळ झाला. शिवसेना, भारतीय जनता पक्ष युतीच्या सदस्यांसह सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही सदस्यांनीही खतपुरवठय़ासंदर्भात प्रश्न उपस्थित केले. सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष कीर्ती उढाण होत्या.
 
बैलपोळ्याच्या उत्साहावर यंदा अतिवृष्टीचे विरजण! Print E-mail
लातूर, ६ सप्टेंबर/वार्ताहर
बैलपोळा दोन दिवसांवर आला असला, तरी अजून त्याचा उत्साह दिसत नाही. अतिवृष्टीमुळे यंदा उत्साहावर विरजण पडले आहे.गेल्या काही वर्षांत पोळ्याच्या सणाला बैल धुण्यासाठी पाणी कुठून आणायचे, हा प्रश्न भेडसावत होता. एखाद्याच्या विहिरीवर अख्ख्या गावाचे बैल धुण्यासाठी न्यावे लागले.
 
सरकारच्या योजनांसाठी जनतेने सहकार्य करावे - चव्हाण Print E-mail
नांदेड, ६ सप्टेंबर/वार्ताहर
ग्रामीण भागाच्या सर्वागीण विकासासाठी सरकारच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता जनतेने सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज केले.
 
लोहा व कंधार तालुक्यांतील ग्रामपंचायतींवर आमदार चिखलीकर मित्रमंडळाची सरशी Print E-mail
लोहा, ६ सप्टेंबर/वार्ताहर
लोहा व कंधार तालुक्यांतील बहुतांश ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर मित्रमंडळाची सरशी झाली. आदर्श गाव झरीमध्ये मुख्यमंत्रीसमर्थक माधवराव पाटील यांचा चिखलीकर मित्रमंडळाने दणदणीत पराभव केला.
 
महावितरण व नगरपालिकेत तडजोडीमुळे सिल्लोडचा वीजपुरवठा सुरळीत Print E-mail
सिल्लोड, ६ सप्टेंबर/वार्ताहर
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासमोर झुकून महावितरणने सिल्लोड नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचा खंडित केलेला वीजपुरवठा जोडून दिला. नगरपालिकेने सहा लाख रुपये महावितरणकडे भरले. थकीत वसुलीसाठी केलेल्या कारवाईचा बार फुसका निघाला. नागरिक मात्र यामध्ये भरडले गेले. श्रावणी सोमवारनिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रम करणाऱ्यांना वीज आणि पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले.
 
‘एकही अर्ज आला नाही म्हणून यंदा आदर्श शिक्षक पुरस्कार नाही’ Print E-mail
औरंगाबाद, ६ सप्टेंबर/प्रतिनिधी
शिक्षकदिनी ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देण्याचा औरंगाबाद महानगरपालिकेचा शिरस्ता यंदा बंद पडला. यामागील कारण जाणून घेतले असता, यंदा शिक्षकांनी या पुरस्कारासाठी अर्जच केले नाही. दोनच अर्ज आले होते. त्यामुळे कोणालाही पुरस्कार देण्यात आले नाहीत, असे उत्तर प्रशसानाकडून देण्यात आले.
 
विभागीय क्रीडा संकुलाचे उद्घाटन १७ सप्टेंबरला Print E-mail
औरंगाबाद, ६ सप्टेंबर/खास प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या विभागीय क्रीडा संकुलाचे काम आता पूर्णत्वास गेले आहे. या संकुलाचे उद्घाटन येत्या १७ सप्टेंबरला (हैदराबाद मुक्तिसंग्रामदिनी) मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते होणार आहे. या संकुलाच्या दुसऱ्या टप्प्यात अ‍ॅथलेटिक ट्रॅक आणि अ‍ॅस्ट्रोटर्फ हॉकी मैदान तयार केले जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी कुणालकुमार यांनी क्रीडा संघटनांच्या बैठकीत दिले.
 
कुलगुरुपदाची निवड रखडली; कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश Print E-mail
कुलपतींना अंतिम यादी सोपविण्याची मनाई कायम
औरंगाबाद, ६ सप्टेंबर/खास प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या निवड प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. कुलगुरु निवड समितीने अंतिम उमेदवारांची यादी कुलपतींकडे सोपविण्यास न्यायालयाने २९ जुलैला मनाई केली होती. ही मनाई येत्या १५ सप्टेंबरपर्यंत कायम आहे.
 
गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविणार Print E-mail
औरंगाबाद, ६ सप्टेंबर/प्रतिनिधी
‘महानगरपालिकेने किमान रस्त्यांवरील खड्डे तरी बुजवावेत’ अशा शब्दात पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी रविवारी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत महापौर अनिता घोडेले आणि स्थायी समितीचे सभापती राजू शिंदे यांच्या उपस्थितीत कानपिचक्या दिल्या. त्यानंतर आता प्रशासन कामाला लागले असून गणेशोत्सवापूर्वी शहरांच्या सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे आदेश सभापती शिंदे यांनी दिले आहेत.
 
माजी नगरसेविका मेहरुनिस्सा बेगमला कैद Print E-mail
औरंगाबाद, ६ सप्टेंबर/खास प्रतिनिधी
सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेत्या व माजी नगरसेविका मेहरुनिस्सा बेगम खान उर्फ मोटीभाभी हिला दोषी ठरविण्यात आले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी नीता एस. आणेकर यांनी त्याबद्दल एक महिना साधी कैद, एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १० दिवसांची साधी कैद अशी शिक्षा आज  ठोठावली.
 
आज देशव्यापी संप Print E-mail
औरंगाबाद, ६ सप्टेंबर/खास प्रतिनिधी
कामगार, कर्मचारी संघटना संयुक्त कृतिसमितीच्या वतीने मंगळवारी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. महागाई कमी करा, पेट्रोल, डिझेल, गॅस आणि रॉकेलच्या दरावर सरकारचे नियंत्रण हटवू नका, सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संरक्षण करा, वायदे बाजार बंद करा या मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
 
विकासात आघाडीवरील सिल्लोड तालुका कुपोषणात मागासलेला Print E-mail
सिल्लोड, ६ सप्टेंबर/वार्ताहर
तालुक्यात कुपोषित बालकांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. नुकत्याच केलेल्या पाहणीत दोन हजारपेक्षा अधिक बालके तीव्र कुपोषित श्रेणीत असल्याचे आढळून आले.विकासाच्या सर्व आघाडय़ांवर अग्रेसर असणारा हा तालुका कुपोषणाच्या बाबतीत मात्र मागासलेला आहे. विशेष म्हणजे ही बाब शासकीय पातळीवर फारशी कुणी गांभीर्याने घेताना दिसत नाही.
 
वैजापूर महसूल कार्यालयाचा परिसर झाला हिरवागार Print E-mail
उपजिल्हाधिकाऱ्यांचे प्रयत्न सफल
वैजापूर, ६ सप्टेंबर/वार्ताहर

वैजापूर महसूल उपविभाग कार्यालय परिसर उपजिल्हाधिकारी एस. टी. टाकसाळे यांच्या पुढाकारातून हिरवागार झाला आहे. परिसरात छोटे व पूर्णपणे वाढ झालेल्या वृक्षांची संख्या २०० आहे.
 
माजलगाव कारखान्याची गाळपक्षमता वाढविण्याचा विचार - प्रकाश सोळंके Print E-mail
धारूर, ६ सप्टेंबर/वार्ताहर
भविष्यात गाळपाअभावी शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहू नये, यासाठी माजलगाव कारखान्याच्या वतीने अतिरिक्त गाळपाचा विचार करून येत्या वर्षभरात एक अब्ज ५० कोटी रुपयांचा सहवीजनिर्मिती आणि विस्तारीकरणाचा प्रकल्प राबविणार असल्याची माहिती महसूल खात्याचे राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांनी दिली.
 
काँग्रेस, शिवसेना यांचे दावे-प्रतिदावे Print E-mail
मुखेड, ६ सप्टेंबर/वार्ताहर
तालुक्यातील १७ ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. त्यांपैकी आपल्या ताब्यात १३ ग्रामपंचायती असल्याचा दावा काँग्रेसचे दिलीप पाटील बेटमोगरेकर यांनी केला आहे, तर शिवसेनेने ८ ग्रामपंचायतीवर भगवा फडकवल्याचा दावा केला आहे.
एकूण २६ ग्रामपंचायतींपैकी ९ ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्या गेल्या.
 
संक्षिप्त : अतिपावसाने धान्योत्पादन ४० टक्के घटण्याची भीती Print E-mail
उस्मानाबाद, ६ सप्टेंबर/वार्ताहर
पावसाळ्यातील नव्वदपैकी ७७ दिवस पाऊस बरसत राहिल्याने मूग, उडीद, सोयाबीन, बाजरी आणि ज्वारी यांच्या उत्पादनांमध्ये २५ ते ४० टक्के घट होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. सुमारे चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. खरिपात आवश्यक असणारे युरिया खत संपल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 1 of 10

ताज्या बातम्या



लोकरंग

‘चिनी ज्यादा’ !

अनिकेत साठे - रविवार, ५ सप्टेंबर २०१०
( sathe.aniket@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चिनी लष्कराच्या मुक्त संचारामुळे भारताची चिंता वाढली असून त्यामागे ‘ड्रॅगन’ची नेमकी काय चाल आहे, असा प्रश्न होतो. त्याचे उत्तर शोधताना हा विषय केवळ गिलगिटपुरताच मर्यादित नाही, तर त्याला विविध स्वरूपाचे कंगोरे असल्याचे लक्षात येते. अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून संरक्षण क्षेत्रात अफाट गुंतवणूक करणारा चीन सध्या जी पावले टाकतो आहे, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाही गर्भित इशारा देण्याचा भाग आहे.

दिनदर्शिका

दिनांक ८ सप्टेंबर २०१० बुधवार मिती श्रावण वद्य अमावस्या १६ क. ०० मि. पूर्वा नक्षत्र २३ क. ५० मि. सिंह चंद्र २९ क. ५ मि.पर्यंत. सूर्योदय- ६।२६ सूर्यास्त- ६।४७. दर्श अमावस्या पोळा.
मेष -
योजना वेग घेतील, वृषभ - घरगुती प्रश्नांवर लक्ष ठेवा, मिथुन - महत्त्वाची कामे होतील, कर्क - जबाबदाऱ्या पूर्ण कराल, सिंह - नवे तंत्र यशस्वी ठरेल, कन्या - विचाराने पावले उचला, तुला - अनेकांचे सहकार्य मिळेल, वृश्चिक - प्रिय व्यक्तींच्या भेटी, धनु - मोठी उलाढाल होईल, मकर - थांबा बघा पुढे चला, कुंभ - वेळ वाया घालवू नका, मीन - मार्ग सापडतील, यश मिळेल.
शुभराशी- मिथुन, सिंह, तुला.