|
|
लोकसत्ता वृत्तांत
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन राजेंद्र जोशी, कोल्हापूर, ८ सप्टेंबर
माहिती आणि तंत्रज्ञानाचा यथायोग्य वापर करून प्रसारमाध्यमे, शासकीय कार्यालय आणि लोकप्रतिनिधी यांच्या दरम्यान जनसंपर्काचे एक नवे दालन उघडणाऱ्या कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाने माहिती व तंत्रज्ञानाच्या महामार्गावर आणखी एक नवे दमदार पाऊल टाकले आहे. या विभागाने जनसंपर्कासाठी ‘एसएमएस’ आणि ‘ई-मेल’द्वारे वर्षभरात लक्षावधी संपर्काचे अभियान पूर्ण केल्यानंतर आता ‘एम मीडिया’ हा नवा उपक्रम सज्ज झाला असून, उद्या राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ होत आहे.
|
सांगली, ८ सप्टेंबर/ प्रतिनिधी सांगली जिल्हय़ातील पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या प्राथमिक शाळेतील तीन लाख ५० हजार विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणारा शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचा आढळल्याने बीडच्या मधुसूदन एजन्सीचा शालेय पोषण आहार वितरणाचा ठेका रद्द करण्यात आला.
|
सोलापूर, ८ सप्टेंबर/प्रतिनिधी दागिन्यांच्या हव्यासापायी चुलतीचा निर्घृण खून केल्याबद्दल सोलापूरच्या सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेल्या कमलाकर तानाजी शिंदे (वय २५, रा. बाभळगाव, ता. बार्शी) यास मुंबई उच्च न्यायालयाने अभय देत त्याची फाशी रद्द करून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
|
सातारा, ८ सप्टेंबर/प्रतिनिधी मी फेरीवाल्यांच्या विरोधात नाही. शहरातील बिकट झालेली वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी सामंजस्य दाखवून सहकार्य करा, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
|
पंढरपूर, ८ सप्टेंबर/वार्ताहर सोलापूर जिल्ह्य़ाची वरदायिनी म्हणून ओळख असलेले उजनी धरण १०० टक्के भरले आहे. आज सायंकाळी साडेचार वाजता धरणाची टक्केवारी १००.०५ झाल्याने धरणातून कालव्याद्वारे ९०० क्युसेक, तर बोगद्यातून २८० क्युसेक पाणी सोडून धरणातील पाणीपातळीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे, असे पंढरपूर पूरनियंत्रण कक्ष व भीमानगर (उजनी धरण) कक्षातून सांगण्यात आले.
|
कोल्हापूर, ८ सप्टेंबर / विशेष प्रतिनिधी एकोणिसाव्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या क्वीन्स बॅटन रिलेचे आज सायंकाळी ५ वाजता कोल्हापुरात आगमन झाले. उत्साही वातावरणात कोल्हापूरवासीयांनी बॅटन रिलेचे जल्लोषी स्वागत केले.
|
१८ डॉक्टरांवर गुन्हे -डॉ. विलास यादव सातारा, ८ सप्टेंबर/प्रतिनिधी मुलींचे घटते प्रमाण रोखण्यासाठी गर्भजल परीक्षा निदानविरोधी कार्यक्रमांची अंमलबजावणी व अधिक जागरुकता बाळगण्याची गरज आहे. कोल्हापूर विभागात ८३१ अधिकृत सोनोग्राफी केंद्रे आहेत.
|
इस्लामपूर, ८ सप्टेंबर/ वार्ताहर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी आपल्या सर्व आंदोलनाचा बोलविता धनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ग्रामीण विकासमंत्री जयंत पाटील हेच असल्याचे वक्तव्य करून राजकीय क्षेत्रात नव्हे, तर शेतकरी संघटनेतही खळबळ उडवून दिली आहे.
|
इचलकरंजी, ८ सप्टेंबर/वार्ताहर नगराध्यक्ष व विविध विषय समित्यांच्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पक्षादेश डावलून विरोधी मतदान केले. त्यामुळे प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष खासदार जयवंतराव आवळे यांचे सुपुत्र माजी नगराध्यक्ष संजय आवळे यांच्यासह सात नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी सुरू आहे.
|
कोल्हापूर, ८ सप्टेंबर/प्रतिनिधी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उद्या (गुरुवारी) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पाच्या कामाचे उद्घाटन, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जन्मशताब्दी समारंभ, राजर्षी शाहू जन्मस्थळाच्या सुशोभीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ, तसेच राजर्षी शाहू स्मारक नूतनीकरण कामाचे उद्घाटन आदी कार्यक्रम होणार आहेत.
|
माळशिरस, ८ सप्टेंबर/वार्ताहर कधी मायेनं गोंजारीत तर कधी हासडात फोडून घेणारे सज्र्या- राज्या, वकिल्या- पाखऱ्या, मुरल्या- गलाशा आज त्याच शेतकऱ्याचं दैवत बनले होते. सजवलेल्या बैलांचे पूजन करून गोडधोड खायला घालून शेतकऱ्यांनी आपल्या जोडीदाराच्या मानाप्रमाणे समाधानानं वाजतगाजत मिरवणुका काढल्या.
|
उज्ज्वल निकम, फडणिसांची हजेरी सोलापूर, ८ सप्टेंबर/प्रतिनिधी शेडय़ुल्ड बँकेचा दर्जा लाभलेल्या सोलापूर जनता सहकारी बँकेच्या कर्मचारी सांस्कृतिक मंडळाच्या ३५ व्या गणेशोत्सव बौध्दिक व्याख्यानमालेत यंदा विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यासह चित्रपट समीक्षक राजीव मसंद, आमदार देवेंद्र फडणीस, अभिनेते शरद पोंक्षे, गीतकार स्वानंद किरकिरे आदी वक्ते सहभागी होऊन विचारपुष्प गुंफणार आहेत.
|
पेठवडगाव, ८ सप्टेंबर/वार्ताहर रुग्णांना सर्वस्व माना, त्यांची काळजी घ्या, ग्रामीण भागात काम करण्यास प्राधान्य द्या तसेच पर्यावरणाचीही काळजी घ्या, असे आवाहन गुंटूर येथील सायबर डेंटल कॉलेजचे डॉ. व्ही. पी. जायदे यांनी केले.
|
सातारा, ८ सप्टेंबर/प्रतिनिधी महागाई व कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदला जिल्ह्य़ात मोठा प्रतिसाद मिळाला. नगरपालिका वगळता सर्व शासकीय व्यवहार बंद होते. कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
|
सांगली, ८ सप्टेंबर/ प्रतिनिधी सांगली-मिरजेत जे घडले तो इतिहास लोकांनी विसरावा, जातीय सलोखा राखण्यासाठी सर्वानीच आपला धर्म घरात जपला पाहिजे, रस्त्यावर आपण सर्व एक आहोत ही भावना जपली पाहिजे, तसेच वातावरण गढूळ करणाऱ्यांची गचांडी धरून पोलिसांना सहकार्य करा, असे आवाहन अभिनेते नाना पाटेकर यांनी केले.
|
मिरज, ८ सप्टेंबर/ वार्ताहर गणेशोत्सवासाठी मिरज शहरात कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली असून, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी पोलीस ठाण्यात स्वतंत्र परवाना कक्ष उघडण्यात आला आहे. यंदापासून श्रींच्या मूर्तीचे संरक्षण करण्यासाठी कार्यकर्त्यांना हमीसमवेतच संबंधितांची नावेही द्यावी लागणार असून, केवळ सज्ञान पदाधिकाऱ्यांनाच परवाना मिळणार आहे.
|
कोल्हापूर, ८ सप्टेंबर / विशेष प्रतिनिधी पुणे-बेंगलोर एक्स्प्रेस मार्गावरील कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील उद्योगांमध्ये दहशत निर्माण करण्याविषयी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर दोन नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला असतानाच कोल्हापूरचे खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी दुचाकीच्या निर्मितीत भारतात आघाडीवर असलेल्या हीरो होंडा कंपनीला कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत प्रकल्प उभारण्यासाठी खास निमंत्रण दिले आहे.
|
सांगली, ८ सप्टेंबर/ प्रतिनिधी सांगली जिल्हय़ाच्या परंपरेला साजेल, अशा पद्धतीने गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात व शांततेने साजरा करावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी मंगळवारी केले.
|
माळशिरस, ८ सप्टेंबर/वार्ताहर स्वातंत्र्यपूर्व व मोगलाईच्या काळात आपल्या शाहिरीने नवचैतन्य निर्माण करीत अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्यास चिथावणी देणाऱ्या शाहिरांच्या शाहिरीचे काळानुरुप रुप बदलण्यासाठी सोलापुरात येत्या २५ व २६ रोजी विश्व शाहीर परिषदेचे आयोजन केले असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव मानेशेंडगेंनी दिली.
|
सांगली, ८ सप्टेंबर / प्रतिनिधी शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा काळ संपला असून आताच्या शिक्षण क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात माफियांचा शिरकाव झाला आहे. त्यांचा शिरकाव रोखण्यासाठी आता शिक्षकांसह सर्वानीच पुढाकार घेणे गरजेचे बनले आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. बाबूराव गुरव यांनी केले.
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 Next > End >>
|
|
Page 1 of 9 |
|
लोकरंग
‘चिनी ज्यादा’ !
अनिकेत साठे - रविवार, ५ सप्टेंबर २०१० ( sathe.aniket@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चिनी लष्कराच्या मुक्त संचारामुळे भारताची चिंता वाढली असून त्यामागे ‘ड्रॅगन’ची नेमकी काय चाल आहे, असा प्रश्न होतो. त्याचे उत्तर शोधताना हा विषय केवळ गिलगिटपुरताच मर्यादित नाही, तर त्याला विविध स्वरूपाचे कंगोरे असल्याचे लक्षात येते. अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून संरक्षण क्षेत्रात अफाट गुंतवणूक करणारा चीन सध्या जी पावले टाकतो आहे, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाही गर्भित इशारा देण्याचा भाग आहे. |
दिनदर्शिका
गुरुवार, ९ सप्टेंबर २०१०. मिती भाद्रपद शुद्ध प्रतिपदा १२ क. ०८ मि.पर्यंत. उत्तरा नक्षत्र २० क. ५१ मि.पर्यंत. कन्या चंद्र. सूर्योदय- ६।२६ सूर्यास्त- ६।४६ मेष - शत्रूंवर लक्ष ठेवा, वृषभ - मुलांचे प्रश्न सुटतील, मिथुन - घरात शांतता ठेवा, कर्क - छोटे-मोठे प्रवास होतील, सिंह - अचानक दडपण वाढतील, कन्या - महत्त्वाचे निर्णय घ्याल, तूळ - देवघेवीत चुका करू नका, वृश्चिक - पैसा हाती येईल, धनू - सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, मकर - प्रयत्न कारणी लागतील, कुंभ - अडचणींचा दिवस, मीन - शासकीय कामे होतील. शुभराशी : वृश्चिक / धनू / मकर
|