मुखपृष्ठ >> नागपूर वृत्तान्त
 


स्पर्धेचे नियम व अटी




नागपूर वृत्तान्त
श्रावणसरींची रिमझिम Print E-mail
नागपूर, ८ सप्टेंबर/प्रतिनिधी
मंगळवार सकाळपासून सुरू झालेल्या श्रावणसरींची रिमझिम बुधवारी दिवसभर सुरूच होती. श्रावणाच्या शेवटच्या दिवशी झालेल्या पावसाने वातावरण आल्हाददायक झाले होते. दोन ठिकाणी झाडे पडली, तर बाळाभाऊ पेठ येथील नाला भरल्याने घरांमध्ये पाणी शिरले होते. येत्या चोवीस तासात विदर्भात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
 
गजानन महाराजांच्या नागपूर भेटीला उजाळा Print E-mail
नागपूर, ८ सप्टेंबर/प्रतिनिधी
संत गजानन महाराज समाधी सोहोळ्याच्या शताब्दीनिमित्ताने नागपुरातील त्यांच्या सहा महिन्याच्या मुक्कामाच्या आठवणीत भक्त सध्या रममाण झाले आहेत. समाधी घेण्यापूर्वी म्हणजे सुमारे १०२ वर्षांपूर्वी भक्तांना दर्शन देण्यासाठी महाराज येथे गोपाळराव बुटी यांच्याकडे आले होते.
 
संजीवनी समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम Print E-mail
नागपूर, ८ सप्टेंबर / प्रतिनिधी
संत गजानन महाराजांच्या संजीवनी समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त शहरातील विविध भागातील गजानन महाराजांच्या मंदिरात सामूहिक पारायण व धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या शिवाय संजीवन शताब्दी सोहोळा ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी हजारो भाविक शनिवारी शेगावला जाणार आहेत.
 
चाकरमान्यांना चार सुट्टय़ांचा ‘बोनांझा’ Print E-mail
नागपूर, ८ सप्टेंबर / प्रतिनिधी
सणासुदीमध्ये चाकरमान्यांना सुट्टय़ांचा भरघोस मेवा चाखायला मिळणार असून लागोपाठ चार सुट्टय़ा आल्याने अनेकांनी सणासुदीच्या दिवसात घरी राहणे पसंत केले. पोळा, गणेशोत्सव, महालक्ष्मीचा सण असल्यामुळे या सणांच्या तयारीसाठी पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांना सुटय़ांमुळे दिलासा मिळाला आहे. 
 
थर्माकोलची आकर्षक मखर व मंदिरे बाजारात Print E-mail
नागपूर, ८ सप्टेंबर/  प्रतिनिधी
गणेशोत्सव तीन दिवसांवर आला असून थर्माकोलची आकर्षक मंदिरे व आजुबाजूला सजावट करण्यासाठी बाजारात आकर्षक मखर विक्रीसाठी आले आहे. साधारणत गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन महिने आधी मखर तयार करण्यासाठी कारागीर कामाला लागतात. गणेशोत्सवाला तीन दिवस असून बाजार विविध प्रकारच्या मखरांनी फुलून गेलेला आहे.
 
‘दबंग’चा फटका अधिकाऱ्यांना! Print E-mail
नागपूर, ८ सप्टेंबर / प्रतिनिधी
‘दबंग’ कुश्ती मेगा शोचा फटका शहरातील दोन विभागांसह अन्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बसल्याची खमंग चर्चा सध्या सुरू आहे. शोच्या नावाखाली काँग्रेसच्या एका नेत्याने सिंचन आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना वेठीस धरल्याची सूरस कथा शहरात रंगली आहे.
 
संती सार्वजनिक गणेश मंडळ कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराची प्रतिकृती उभारणार Print E-mail
नागपूर, ८ सप्टेंबर / प्रतिनिधी
संती सार्वजानिक गणेश मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराची हुबेहुब प्रतिकृती उभारणार असल्याची माहिती मंडळाचे संयोजक संजय चिंचोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
कृष्ण नगरातील खून, तीन आरोपींना अटक Print E-mail
नागपूर, ८ सप्टेंबर / प्रतिनिधी
उत्तर नागपुरातील कृष्ण नगरात राहणाऱ्या शैलेश केशव पाटील याचा खून त्याच्या भाच्याने दोन आरोपींसह केल्याचे उघड झाले असून तीनही आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी अटक केली.
 
माहिती तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास स्पर्धा करणे शक्य -श्रीवास्तव Print E-mail
नागपूर, ८ सप्टेंबर/प्रतिनिधी
माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा योग्य प्रकारे वापर केल्यास सध्या विविध क्षेत्रात सुरू असलेल्या जीवघेण्या स्पर्धेत टिकता येईल, असे प्रतिपादन नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरचे तरुण श्रीवास्तव यांनी केले.
 
‘क्लासरूम टिचिंग मोडय़ूल’ उपक्रमाचे उद्घाटन Print E-mail
नागपूर, ८ सप्टेंबर/प्रतिनिधी
न्यू नंदनवनमधील इ.पी. कॉन्व्हेंटच्या इयत्ता ५ ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी ‘क्लासरुम टिचिंग मोडय़ूल’ या आगळ्या वेगळ्या शैक्षणिक उपक्रमाचे उद्घाटन आमदार दीनानाथ पडोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुधार प्रन्यासचे अनंत घारड, तिरुपती बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद दरणे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत घोगरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
 
प्रतिसाद : केंद्राच्या अध्यादेशाने सामान्य हलबांना काय मिळाले? Print E-mail
वसंता निनावे
नागपूर

केंद्र शासनातील हलबा, कोष्टी कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याचा अध्यादेश भाजप नेते अरुण जेटली, नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांनी निघाला व त्यामुळे या समाजाला मोठा दिलासा मिळाल्याच्या बातम्या वृत्तपत्रात प्रकाशित झाल्या. अध्यादेशानुसार सन २००० च्या आधी नोकरीत असलेल्यांना नोकरीतून घालवता येणार नाही.
 
शिक्षकांच्या कामकाजाच्या वेळेतील Print E-mail
बदलाचा निर्णय रद्द न केल्यास आंदोलन
नागपूर, ८ सप्टेंबर/ प्रतिनिधी

शिक्षकांच्या कामकाजाच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय त्वरित रद्द करावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नागपूर शाखेने दिला आहे.
 
इको फ्रेंडली गणेशमूर्ती कला स्पर्धेत कटांगे प्रथम Print E-mail
नागपूर, ८ सप्टेंबर / प्रतिनिधी
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री असोसिएशनतर्फे देवलापारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या इको फ्रेंडली गणेशमूर्ती कला स्पर्धेत पवनीच्या जयसेवा विद्यालयाच्या गजानन कटांगे या विद्यार्थ्यांला आणि सावंरामधील शिक्षकांमध्ये जिल्हा परिषद शाळेतील एस.एस. अंबाडकर यांना प्रथम क्रमांक देण्यात आला.
 
उत्तर सादर न केल्याने केंद्र सरकारला दंड Print E-mail
पोलीस दलाच्या कामकाजातील सुधारणेबाबतची याचिका
नागपूर, ८ सप्टेंबर/ प्रतिनिधी

पोलीस दलाच्या कामकाजात सुधारणा व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करणाऱ्या जनहित याचिकेवर अखेरची संधी देऊनही उत्तर सादर न केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केंद्र सरकारला ५ हजार रुपये दंड ठोठावला आहे.
 
सुवर्णकन्या तेजस्विनी सावंतला शनिवारी गौरवणार Print E-mail
नागपूर, ८ सप्टेंबर/प्रतिनिधी
जागतिक नेमबाजी स्पर्धेत विश्वविक्रमाची बरोबरी साधत भारताचे नाव सुवर्णाक्षरात नोंदवणारी सुवर्णकन्या तेजस्विनी सावंतला शनिवारी, ११ सप्टेंबरला नागपुरात गौरवण्यात येणार आहे.
 
खाजगी अभियांत्रिकी प्राध्यापकांना धक्का.. Print E-mail
सहाव्या वेतन आयोगातून वगळले!
नागपूर, ८ सप्टेंबर / प्रतिनिधी

राज्य शासनाने अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक, ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालकांना सहावा वेतन आयोग लागू केला आहे. मात्र, २० ऑगस्ट १० च्या शासन निर्णयानुसार शासकीय आणि शासन अनुदानित खाजगी महाविद्यालयांनाच हा आयोग लागू असल्याचे म्हटले आहे. विना अनुदानित खाजगी महाविद्यालयांना या ‘जी.आर.’ने वगळले आहे.
 
स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ Print E-mail
एनआयव्हीचा दहाच नमुने तपासण्याचा निर्णय
नागपूर, ८ सप्टेंबर / प्रतिनिधी

शासकीय वैद्यकीय रुग्णालयासह इतरही खाजगी रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूने ३९ नागरिकांचे बळी आणि संशयित रुग्ण संख्येत वाढ होत असताना पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेने (एनआयव्ही) शहरातील फक्त रोज दहाच नमूने तपासण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आरोग्य विभागात खळबळ निर्माण झाली आहे.
 
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गांधीगिरी; ‘स्टारबस’ केल्या स्वच्छ Print E-mail
नागपूर, ८ सप्टेंबर/ प्रतिनिधी
शहरातील ‘स्टारबस’मध्ये दररोज शेकडो लोक प्रवास करतात मात्र, त्यांची स्वच्छता केली जात नाही. कंत्राटदाराचे याकडे दुर्लक्ष असून त्याने या बसेसची नियमित साफसफाई करावी म्हणून शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘स्टारबस’ स्वच्छ केल्या.
 
संक्षिप्त Print E-mail
टॅक्स ऑडिटवर चर्चासत्र
नागपूर, ८ सप्टेंबर/प्रतिनिधी

इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊन्टटस ऑफ इंडियाच्या नागपूर शाखेतर्फे टॅक्स ऑडिटवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी चार्टर्ड अकाऊन्टट एस.बी. हजारे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. यावेळी हजारे यांनी सुमारे १०० विद्यार्थ्यांना टॅक्स ऑडिट सनदी लेखापाल व्यवसायाचा कणा आहे.
 
वंदेमातरम्ने जागवले देशभक्तीचे स्फुल्लिंग Print E-mail
नागपूर,७ सप्टेंबर / प्रतिनिधी
राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त आणि वंदेमातरम् या प्रेरणादायी व देशभक्तीपर गीताला १०५ वर्ष पूर्ण झाल्याने यशवंत स्टेडियममध्ये विविध शाळेतील हजारो विद्यार्थ्यांनी एका सुरात वंदेमातरम् आणि महाराष्ट्राची यशोगाथा सांगणाऱ्या महाराष्ट्र गीताने वातावरण देशभक्तीमय झाले होते.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 1 of 10

ताज्या बातम्या



लोकरंग

‘चिनी ज्यादा’ !

अनिकेत साठे - रविवार, ५ सप्टेंबर २०१०
( sathe.aniket@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चिनी लष्कराच्या मुक्त संचारामुळे भारताची चिंता वाढली असून त्यामागे ‘ड्रॅगन’ची नेमकी काय चाल आहे, असा प्रश्न होतो. त्याचे उत्तर शोधताना हा विषय केवळ गिलगिटपुरताच मर्यादित नाही, तर त्याला विविध स्वरूपाचे कंगोरे असल्याचे लक्षात येते. अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून संरक्षण क्षेत्रात अफाट गुंतवणूक करणारा चीन सध्या जी पावले टाकतो आहे, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाही गर्भित इशारा देण्याचा भाग आहे.

दिनदर्शिका

गुरुवार, ९ सप्टेंबर २०१०. मिती भाद्रपद शुद्ध प्रतिपदा १२ क. ०८ मि.पर्यंत. उत्तरा  नक्षत्र २० क. ५१ मि.पर्यंत. कन्या चंद्र. सूर्योदय- ६।२६ सूर्यास्त- ६।४६
मेष
- शत्रूंवर लक्ष ठेवा, वृषभ - मुलांचे प्रश्न सुटतील, मिथुन - घरात शांतता ठेवा, कर्क - छोटे-मोठे प्रवास होतील, सिंह - अचानक दडपण वाढतील, कन्या - महत्त्वाचे निर्णय घ्याल, तूळ - देवघेवीत चुका करू नका, वृश्चिक - पैसा हाती येईल, धनू - सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, मकर - प्रयत्न कारणी लागतील, कुंभ - अडचणींचा दिवस, मीन - शासकीय कामे होतील.
शुभराशी : वृश्चिक / धनू / मकर