मुखपृष्ठ >> पुणे वृत्तान्त
 

पुणे वृत्तान्त



स्पर्धेचे नियम व अटी




पुणे वृत्तान्त
आले गणराय : देवा तुझ्या दारी आलो.. Print E-mail
आनंद सराफ
गणेशोत्सवाशी निगडित अशा अनेकांच्या आठवणींचा संग्रह शब्दबद्ध केला तर त्याचे स्वतंत्र पुस्तक तयार होईल याची मला खात्री आहे. घरातील व्यक्तीचे उत्सव काळात निधन झाले तर आपल्या घरी गणपती धार्जिणा नाही, असा समज काहीजण करून घेतात तर काहीजण ऐपत असो वा नसो, वाडवडील ज्या पद्धतीने आणि दिमाखात उत्सव करीत होते, ती परंपरा मोठय़ा श्रद्धेने जपताना दिसतात. अशाचकाही कुटुंबांची ही ओळख.
 
तेरा वर्षे मान्यतेविनाच! Print E-mail
गणेश कला क्रीडा मंचाचा वाद
पुणे, ८ सप्टेंबर / विशेष प्रतिनिधी

महापालिकेने गणेश कला क्रीडा रंगमंचाची उभारणी १९९८ मध्ये पूर्ण केली, परंतु त्यानंतरच्या तब्बल तेरा वर्षांत खुद्द महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागानेच या रंगमंचाला मान्यता दिलेली नाही. ही खळबळजनक बाब माहितीच्या अधिकारानुसार नुकतीच उघडकीस आली. त्यामुळे अनेक केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आदींच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमांसाठीचा वापर हा बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
खडकवासला प्रकल्पात २५.५० टीएमसी पाणीसाठा Print E-mail
पुणे, ८ सप्टेंबर / प्रतिनिधी
पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे खडकवासला प्रकल्पात २५.५० अब्ज घनफूट पाणीसाठा झाला असून भीमा खोऱ्यातील बहुतांश धरणांच्या जलसाठय़ाची स्थिती चांगली सुधारली आहे. कुकडी प्रकल्पातील पिंपळगाजोगे धरणात उपयुक्त पाणीसाठय़ाला सुरुवात झाली असून राज्यातील सर्वाधिक साठवण क्षमता असलेल्या उजनी आणि भाटघर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.
 
जागल्या : बुद्धिनायका ! Print E-mail
मुकुंद संगोराम
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
गणेशोत्सवाचा प्रारंभ आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. पुण्यातल्या सगळ्या गणेशोत्सव मंडळांची मांडव उभारणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. गणनायक गणेश आता आपल्या उत्सवी स्वरूपात दाखल होईल  तेव्हा त्याचे स्वागत जोरदारपणे होईल, यात शंका नाही. पुण्याला असलेल्या अनेक धोक्याच्या घंटा गेल्या दोन वर्षांत वाजून गेल्या आहेत.
 
पुण्याच्या गणेशोत्सवात नगरचे सिंह Print E-mail
पुण्यातील दगडूशेठ गणपतीच्या सजावटीसमोर ठेवण्यासाठी प्रमोद कांबळे यांनी देवस्थानच्या मागणीनुसार दोन सिंह बनविले आहेत. आठ फूट उंचीचे आणि सहा फूट लांबीचे हे दोन सिंह आज पुण्यात येणार आहेत.
 
मिर्झा बेगला २० सप्टेंबरपर्यंत कोठडी Print E-mail
जर्मन बेकरी बॉम्बस्फोट
पुणे, ८ सप्टेंबर / प्रतिनिधी

‘लष्कर ए- तैय्यबा’चा महाराष्ट्राचा प्रमुख आणि ‘इंडियन मुजाहिद्दीन’ या अतिरेकी संघटनेशी संबंध असणाऱ्या मिर्झा हिमायत इनायत बेग यानेच कोरेगाव पार्कमधील जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट घडवून आणल्याचे आज स्पष्ट झाले असून पुण्यातील दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) त्याला जेरबंद केले.
 
जर्मन बेकरी स्फोटातील भटकळ व चौधरी अद्याप फरारी Print E-mail
पुणे, ८ फेब्रुवारी / प्रतिनिधी
जर्मन बेकरीमध्ये बॉम्ब प्लान्ट करणाऱ्यास जरी महाराष्ट्र एटीएसने अटक केली असली तरीदेखील त्याचे आणखी दोन साथीदार पोलिसांपासून कोसो दूर आहेत.
 
जर्मन बेकरी स्फोटाचा घटनाक्रम Print E-mail
१३ फेब्रुवारी २०१० :  सायंकाळी सात वाजता.
पहिल्या दिवशी मृतांची व जखमींची संख्या : ९ जणांचा मृत्यू, ५७ जण जखमी
पहिल्या दिवशी घटनास्थळी भेट : गृहराज्यमंत्री रमेश बागवे, महापौर मोहनसिंग राजपाल, जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी, पालकमंत्री अजित पवार, हर्षवर्धन पाटील, गृहमंत्री आर. आर. पाटील, सुरेश कलमाडी.
 
बेगनेच केली होती जर्मन बेकरीची टेहळणी Print E-mail
पुणे, ८ सप्टेंबर / प्रतिनिधी
दहशतवाद विरोधी पथकाने अटक केलेल्या संशयित हिमायत इनायत बेग यानेच जर्मन बेकरीची टेहळणी करून उदगीर येथील त्याच्या सायबर कॅफेत स्फोटाचा कट आखला होता.
 
आझम कॅम्पसमधून बेगने घेतले ‘डी.एड’चे शिक्षण? Print E-mail
पुणे, ८ सप्टेंबर / प्रतिनिधी
जर्मन बेकरीच्या बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मिर्झा हिमायत इनायत बेग याने सुमारे दोन वर्षांपूर्वी येथील आझम कॅम्पसमध्ये डी. एड. चे शिक्षण पूर्ण केल्याची माहिती एटीएसचे सहायक पोलीस आयुक्त विनोद सातव यांनी पत्रकारांना दिली.
 
महाविद्यालयाचे एक हजार विद्यार्थी होणार ‘विशेष पोलीस अधिकारी’ Print E-mail
गणेशोत्सवात अपुऱ्या मनुष्यबळावर पोलिसांचा तोडगा
बाळासाहेब जवळकर, पिंपरी, ८ सप्टेंबर

अपुऱ्या मनुष्यबळाच्या कारणामुळे पोलीस खात्यावर पडणारा प्रचंड ताण आणि ऐन गणेशोत्सवाच्या काळात होणारी ओढाताण कमी करण्यासाठी पोलिसांनी यंदा वेगळाच तोडगा काढला आहे.
 
पिंपरीतील काही भागांत आज पाणीपुरवठा बंद Print E-mail
पिंपरी, ८ सप्टेंबर / प्रतिनिधी  
पिंपरी-चिंचवड शहरात विविध भागांतील पाइपलाइन दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने काही भागांतील पाणीपुरवठा उद्या (गुरुवारी) बंद राहणार आहे.    
 
पिंपरीत आज शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन Print E-mail
पिंपरी, ८ सप्टेंबर / प्रतिनिधी
आगामी महानगरपालिको निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्योजक उमेश चांदगुडे यांच्या सत्काराचे निमित्त साधून पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने उद्या शक्तिप्रदर्शन होणार आहे.
 
‘गदिमा कविता महोत्सव’शुक्रवारी चिंचवडला Print E-mail
पिंपरी, ८ सप्टेंबर / प्रतिनिधी
महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गदिमा यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद आणि लायन्स क्लब यांच्या वतीने दहावा राज्यस्तरीय गदिमा काव्य महोत्सव शुक्रवारी (१० सप्टेंबर) चिंचवड येथील ऑटोक्लस्टर सभागृहात आयोजित के ला आहे.
 
‘टाटा मोटर्स’ ला उत्कृष्ट ऊर्जा कार्यक्षम प्रकल्प पारितोषिक Print E-mail
पिंपरी, ८ सप्टेंबर / प्रतिनिधी
कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या वतीने टाटा मोटर्स सीव्हीबीयू पुणे प्रकल्पास ऊर्जा व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय गुणवत्ता पारितोषिक २०१० चे प्रदान करण्यात आले. करंडक व मानपत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.
 
मुलींच्या छेडछाडीचे वाढते प्रकार; Print E-mail
आकुर्डी पोलीस चौकीसमोर आज सभा
पिंपरी, ८ सप्टेंबर / प्रतिनिधी

वाल्हेकरवाडी भागात विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या प्रकाराकडे पोलिसांचे सर्रास दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ उद्या (गुरु वारी) अकरा वाजता आकुर्डी पोलीस चौकीसमोर जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
 
पिंपरी संक्षिप्त Print E-mail
कामगार संघटना कृती समितीची रॅली
कामगार कायद्यांची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी मागणी कामगार संघटना कृती समितीचे अध्यक्ष कैलास कदम यांनी केली आहे.
 
आरोग्यम् : परि ‘नेत्र’रुपी उरावे..! Print E-mail
मुस्तफा आतार
‘क्षणभर थोडासा विचार करा की तुम्हाला ‘दृष्टी’ च नाही! काही क्षणांसाठी तुमच्या डोळ्यांसमोर संपूर्ण अंधारच उभा राहिला असेल ना..?’ सामान्यांना केवळ कल्पना करूनच डोंगर कोसळल्यासारखे वाटते तर ज्यांना जन्मत:च किंवा ज्यांची दृष्टीच हरवली असेल तर त्यांचे काय?.. देशात नव्हे जगात अशा दृष्टिहिनांची संख्या कमी असली तरी ती दुर्लक्षित करता येण्यासारखी निश्चितच नाही.
 
पत्नीबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मोठय़ा भावाचा खून Print E-mail
तळेगाव दाभाडे, ८ सप्टेंबर/वार्ताहर
पत्नीबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय मनात धरून रागाच्या भरात तळेगाव दाभाडे येथे लहान भावाने मोठय़ा भावाचा खून केला.
ही घटना आज मंगळवार, ७ सप्टेंबर रोजी रात्री १२.३० च्या सुमारास घडली.
 
पुनर्वसनाबाबत शासनाचा भिकार सावकाराचा खेळ - गोऱ्हे Print E-mail
पौड, ८ सप्टेंबर/वार्ताहर
पुणे जिल्ह्य़ातील धरणग्रस्तांचे अद्यापही पुनर्वसन झाले नाही. हे पुनर्वसन कागदोपत्री असून याबाबत शासनाचा भिकार सावकाराचा खेळ चालू आहे, अशी टिका शिवसेनेच्या उपनेत्या, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार नीलम गोऱ्हे यांनी पिरंगुट (ता. मुळशी) येथे केली.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 1 of 10

ताज्या बातम्या



लोकरंग

‘चिनी ज्यादा’ !

अनिकेत साठे - रविवार, ५ सप्टेंबर २०१०
( sathe.aniket@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चिनी लष्कराच्या मुक्त संचारामुळे भारताची चिंता वाढली असून त्यामागे ‘ड्रॅगन’ची नेमकी काय चाल आहे, असा प्रश्न होतो. त्याचे उत्तर शोधताना हा विषय केवळ गिलगिटपुरताच मर्यादित नाही, तर त्याला विविध स्वरूपाचे कंगोरे असल्याचे लक्षात येते. अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून संरक्षण क्षेत्रात अफाट गुंतवणूक करणारा चीन सध्या जी पावले टाकतो आहे, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाही गर्भित इशारा देण्याचा भाग आहे.

दिनदर्शिका

गुरुवार, ९ सप्टेंबर २०१०. मिती भाद्रपद शुद्ध प्रतिपदा १२ क. ०८ मि.पर्यंत. उत्तरा  नक्षत्र २० क. ५१ मि.पर्यंत. कन्या चंद्र. सूर्योदय- ६।२६ सूर्यास्त- ६।४६
मेष
- शत्रूंवर लक्ष ठेवा, वृषभ - मुलांचे प्रश्न सुटतील, मिथुन - घरात शांतता ठेवा, कर्क - छोटे-मोठे प्रवास होतील, सिंह - अचानक दडपण वाढतील, कन्या - महत्त्वाचे निर्णय घ्याल, तूळ - देवघेवीत चुका करू नका, वृश्चिक - पैसा हाती येईल, धनू - सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, मकर - प्रयत्न कारणी लागतील, कुंभ - अडचणींचा दिवस, मीन - शासकीय कामे होतील.
शुभराशी : वृश्चिक / धनू / मकर