मुखपृष्ठ >> नवी मुंबई वृत्तान्त
 


स्पर्धेचे नियम व अटी




नवी मुंबई वृत्तान्त
पाय फुटणाऱ्या फायलींच्या विरोधात आता फौजदारी गुन्हा दाखल होणार Print E-mail
विकास महाडिक, गुरुवार, ९ सप्टेंबर २०१०
साडेबारा टक्के योजनेतील गायब होणाऱ्या फायलींच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांनी भूसंपादन विभागाला दिले आहेत. असे गुन्हे दाखल झाल्यानंतरच साडेबारा टक्के योजनेतील फायली गायब होण्याचे सत्य बाहेर येईल, असे सत्रे यांनी स्पष्ट केले आहे.
 
दिघा येथील ७२ गाळे भुईसपाट Print E-mail
५६ हजार चौरस मीटरच्या भूखंडाने घेतला मोकळा श्वास
नवी मुंबई/प्रतिनिधी

 दिघा येथील तब्बल ५६ हजार चौरस मीटरचा विस्तीर्ण भूखंड गिळंकृत करत सर्व कायदे-नियम धाब्यावर बसवून उभारण्यात आलेले तब्बल ७२ व्यापारी गाळे आज अतिक्रमणविरोधी पथकाने भुईसपाट केले. उच्च न्यायालयाने या संदर्भात दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
 
नवी मुंबईत गणेशोत्सवाला कचऱ्याच्या साम्राज्याचे विघ्न Print E-mail
नवी मुंबई/प्रतिनिधी
श्रीगणेशाच्या आगमनाला जेमतेम दोन दिवस शिल्लक असताना नवी मुंबई परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याची ओरड आज स्थायी समिती सभेत नगरसेवकांनी केली. कॉंग्रेसचे नगरसेवक दशरथ भगत यांनी मोराज, पाम बीच येथे कचऱ्याचे ढीग पडल्याची छायाचित्रे सभागृहात सादर केली. घंटागाडी प्रकल्पाचा ठेकेदार सध्या सुस्तावल्याने जागोजागी असे ढीग दिसत असून महापालिकेने या संदर्भात तातडीने पावले उचलावीत, अशी मागणीही सदस्यांनी यावेळी केली.
 
युतीचे उद्या ‘घर बचाव’ आंदोलन Print E-mail
नवी मुंबई/प्रतिनिधी
नवी मुंबई महापालिका, सिडको तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने शहरातील अनधिकृत बांधकामांना पाठविलेल्या नोटिसांविरोधात आता वातावरण तापू लागले असून शिवसेना-भाजपा युतीने या नोटिसांविरोधात येत्या गुरुवारी घर बचाव आंदोलनाची हाक दिली आहे.
 
नवी मुंबईत गणेशविसर्जनाला मध्यरात्रीची डेडलाईन Print E-mail
जयेश सामंत ,बुधवार, ८ सप्टेंबर २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मुंबई, पुण्यासारख्या मोठय़ा शहरांमध्ये गणेशमूर्तीच्या विसर्जनाचा तासन् तास होणारा खोळंबा लक्षात घेऊन नवी मुंबई पोलिसांनी शहरातील सर्वच गणेश मंडळांना विसर्जनासाठी मध्यरात्रीची ‘डेड लाईन’ आखून दिल्याने या मुद्दय़ावरून नवा वाद उभा रहाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
 
कार्यकर्त्यांनी निरपेक्ष भावनेने काम करावे- हावरे Print E-mail
नवी मुंबई/प्रतिनिधी
संघटना कशी असावी याचे मार्गदर्शन कार्यकर्त्यांना करून देताना, कार्यकर्त्यांनी कुठल्याही अपेक्षा न ठेवता निरपेक्ष भावनेने कार्य करत राहिले पाहिजे, असा सल्ला भाजप ठाणे विभागाचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी सानपाडा येथे दिला. भाजप नवी मुंबईची सानपाडा-जुईनगर मंडळ कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली, त्यावेळी ते बोलत होते.
 
‘स्वरलिपीपेक्षा स्वरांचे ज्ञान महत्त्वाचे’ Print E-mail
नवी मुंबई/प्रतिनिधी
स्वरलिपीपेक्षा स्वरज्ञान असणे आवश्यक असून, त्यासाठी सूर व ताल याची साथ गरजेची आहे. ज्यांना संगीतक्षेत्रात नाव कमावण्याची इच्छा आहे, त्यांनी हा गुणधर्म पाळणे आवश्यक आहे, असा सल्ला सुप्रसिद्ध संगीतकार अनिल मोहिले यांनी दिला.
 
महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना गुळाची चिक्की Print E-mail
जयेश सामंत - मंगळवार, ७ सप्टेंबर २०१०
नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या सुमारे २६ हजार विद्यार्थ्यांना पोषक आहार म्हणून दिल्या जाणाऱ्या बेसन बर्फीचा पुरवठा थांबविण्याचा निर्णय आयुक्त विजय नहाटा यांनी घेतला आहे. संबंधित बर्फीच्या काही तुकडय़ांमध्ये बुरशी आढळल्याच्या तक्रारी मध्यंतरी प्राप्त झाल्या होत्या.
 
नवी मुंबईतील गणेश विसर्जनाला गेबियन पद्धतीचा आधार Print E-mail
जयेश सामंत, रविवार, ५ सप्टेंबर २०१०
गणेश विसर्जनादरम्यान तलाव प्रदूषित होऊ नयेत, यासाठी नवी मुंबई महापालिकेने यावेळी एक वेगळा प्रयोग करण्याचे ठरविले असून वेगवेगळ्या उपनगरांमधील तब्बल १४ तलावांमध्ये यावेळी विसर्जनासाठी स्वतंत्र असे कप्पे तयार करण्यात आले आहेत. इटलीमधील प्रसिद्ध अशा गेबियन पद्धतीचा यासाठी वापर करण्यात आला असून या तलावांमध्ये विशिष्ट पद्धतीने दगडाचे पेटारे उभे करण्यात आले आहे.
 
काँग्रेसच्या नवी मुंबई अध्यक्षपदासाठी रस्सीखेच Print E-mail
विकास महाडिक, शनिवार, ४ सप्टेंबर २०१०
देशात काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदापासून ते वॉर्ड अध्यक्षपदापर्यंतच्या निवडणुकांचे वारे सध्या वाहत आहेत. त्याला नवी मुंबईही अपवाद नसून, नवी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.
 
भजन.. लावण्या, डीजेच्या तालावर रंगला उत्सव Print E-mail

नवी मुंबईतील मंडळांनी गाजविला दिवस
शुक्रवार, ३ सप्टेंबर २०१०

मुंबई, ठाण्यातील उंचच्या उंच दहीहंडय़ांवर रोखलेला प्रकाशझोत काहीसा आपल्याकडे वळवित यावेळी नवी मुंबईतील मंडळांनी दहीहंडी उत्सवाची धूम उडवून दिल्याचे चित्र आज शहरातील कानाकोपऱ्यात पाहावयास मिळाले. काही ठिकाणी टाळ-मृदंगाच्या तालावर सुरू असलेल्या भजनांनी, तर नटरंगपासून पिंजरापर्यंतच्या दिलखेच लावण्यांच्या तालाने या उत्सवात वेगळेच रंग भरल्याचे चित्र दिसत होते.

 
नवी मुंबईत दहीहंडीची कोटींची उड्डाणे Print E-mail
जयेश सामंत, गुरुवार, २ सप्टेंबर २०१०
मुंबई, ठाण्यासारख्या दहीहंडी उत्सवाची मोठी परंपरा लाभलेल्या शहरांच्या तोडीस तोड अशा लाखमोलाच्या दहीहंडय़ा उभारत नवी मुंबईतील उत्सव मंडळांनी या वर्षी मोठमोठय़ा पथकांना आपल्याकडे आकर्षित करून घेतले आहे.
 
उड्डाणपुलांखालील पार्किंग झोन हटवा Print E-mail
पालकमंत्र्यांचा सक्त आदेश
नवी मुंबई/प्रतिनिधी

 जिल्ह्यातील अनेक उड्डाणपुलांच्या खाली तेथील स्थानिक प्राधिकरणांनी निविदा काढून पार्किंग झोन दिले आहेत. ते धोकादायक असून भविष्यात पार्किंगच्या नावाखाली दहशतवादी कृत्ये करणारे समाजकंटक तिथे दबा धरून बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
पायाभूत सुविधांवर वीज वितरण २१० कोटींचा खर्च करणार Print E-mail
नवी मुंबई/प्रतिनिधी
नवी मुंबईतील वीज वितरणातील त्रुटी दूर करण्यासाठी येत्या वर्षभरात महावितरण कंपनीतर्फे तब्बल २१० कोटी रुपयांचे प्रकल्प आखण्यात आले आहेत, अशी माहिती महावितरणच्या नवी मुंबई विभागाचे अधीक्षक अभियंता डी.आर.साबू यांनी वाशी येथे दिली.
 
‘डाऊ’तर्फे शिक्षकांना पर्यावरणविषयक मार्गदर्शन Print E-mail
पनवेल/प्रतिनिधी
‘डाऊ केमिकल इंटरनॅशनल प्रा.लि. (डाऊ इंडिया) या कंपनीतर्फे शालेय शिक्षकांना पर्यावरणविषयक मार्गदर्शन करण्यासाठी पनवेलजवळील शेडुंग फाटा येथे नुकतीच दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.
 
पोलिसांची इफ्तार पार्टी रद्द Print E-mail
नवी मुंबई/प्रतिनिधी
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने मंगळवारी आयोजित करण्यात आलेली इफ्तार पार्टी रद्द करण्याचा निर्णय नवी मुंबई पोलीस आयुक्त जावेद अहमद यांनी तातडीने घेतला आहे. इफ्तार पार्टीच्या काढण्यात आलेल्या निमंत्रणपत्रिकेत केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहरातील शासकीय पदाधिकाऱ्यांची नावे छापण्यात आली होती.
 
पोलिसांच्या इफ्तार पार्टीत सापत्नपणाची वागणूक Print E-mail
नवी मुंबई कॉंग्रेसची भावना
विकास महाडिक - मंगळवार, ३१ ऑगस्ट २०१०

देशात दहशतवादाला रंग देण्याचा राजकीय खेळ ऐन रंगात आलेला असताना नवी मुंबई पोलिसांनी मंगळवारी आयोजित केलेल्या रोजा-इफ्तार पार्टीत राजकीय मतभेदाचा रंग देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे पोलिसांनी धार्मिक सलोखा निर्माण व्हावा, यासाठी आयोजित केलेली ही इफ्तार पार्टी चांगलीच वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.
 
हुश्श! मोरबे धरण झाले एकदाचे Print E-mail
पालिका एमजेपीला पाणी विकणार!
नवी मुंबई/प्रतिनिधी

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मालकीचे असलेले खालापूर तालुक्यातील चावरी नदीवर बांधण्यात आलेले मोरबे धरण एकदाचे नवी मुंबई पालिकेच्या मालकीचे एकदाचे झाले आहे. मागील सात वर्षे नवी मुंबई पालिकेचे मोरबे धरण म्हणवणाऱ्या प्रशासनाने रविवारी ५५४ कोटी रुपयांपैकी शेवटचे २१ कोटी रुपये देऊन खऱ्या अर्थाने या धरणाची मालकी स्वत:कडे घेतली आहे.
 
‘जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करायलाच हव्यात’ Print E-mail
नवी मुंबई/प्रतिनिधी
राज्यकर्त्यांनी जनतेचे रक्षण करतानाच अन्न, वस्त्र आणि निवारा यासारख्या मूलभूत गरजा पुरविल्याच पाहिजेत, असे प्रतिपादन पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले. मंत्रालयात बोलविलेल्या बैठकीत ते बोलत होते.
 
नवी मुंबईत लाखमोलाच्या अनेक दहीहंडय़ा! Print E-mail
सुरेश हावरे मित्रमंडळ बक्षिसांमध्ये आघाडीवर
नवी मुंबई/प्रतिनिधी

मागील काही वर्षांपासून नवी मुंबईत लाखो रुपयांची बक्षिसे असलेल्या अनेक दहीहंडय़ा आयोजित केल्या जात असून, यात भाजपचे ठाणे विभाग अध्यक्ष व विकासक सुरेश हावरे यांच्या हावरे मित्रमंडळाने बाजी मारली आहे. मुंबई, ठाण्याप्रमाणे या उत्सवाचा इव्हेंट करताना हावरे यांनी एकूण २५ लाखांची बक्षिसे ठेवली आहेत. गतवर्षी स्वाईन फ्लूच्या थैमानामुळे हावरे यांनी ही दहीहंडी रद्द केली होती.
 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 1 of 2

ताज्या बातम्या



लोकरंग

‘चिनी ज्यादा’ !

अनिकेत साठे - रविवार, ५ सप्टेंबर २०१०
( sathe.aniket@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चिनी लष्कराच्या मुक्त संचारामुळे भारताची चिंता वाढली असून त्यामागे ‘ड्रॅगन’ची नेमकी काय चाल आहे, असा प्रश्न होतो. त्याचे उत्तर शोधताना हा विषय केवळ गिलगिटपुरताच मर्यादित नाही, तर त्याला विविध स्वरूपाचे कंगोरे असल्याचे लक्षात येते. अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून संरक्षण क्षेत्रात अफाट गुंतवणूक करणारा चीन सध्या जी पावले टाकतो आहे, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाही गर्भित इशारा देण्याचा भाग आहे.

दिनदर्शिका

गुरुवार, ९ सप्टेंबर २०१०. मिती भाद्रपद शुद्ध प्रतिपदा १२ क. ०८ मि.पर्यंत. उत्तरा  नक्षत्र २० क. ५१ मि.पर्यंत. कन्या चंद्र. सूर्योदय- ६।२६ सूर्यास्त- ६।४६
मेष
- शत्रूंवर लक्ष ठेवा, वृषभ - मुलांचे प्रश्न सुटतील, मिथुन - घरात शांतता ठेवा, कर्क - छोटे-मोठे प्रवास होतील, सिंह - अचानक दडपण वाढतील, कन्या - महत्त्वाचे निर्णय घ्याल, तूळ - देवघेवीत चुका करू नका, वृश्चिक - पैसा हाती येईल, धनू - सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, मकर - प्रयत्न कारणी लागतील, कुंभ - अडचणींचा दिवस, मीन - शासकीय कामे होतील.
शुभराशी : वृश्चिक / धनू / मकर