मुखपृष्ठ >> ठाणे वृत्तान्त
 


स्पर्धेचे नियम व अटी




ठाणे वृत्तान्त
ठाणे परिसरासाठी एकात्मिक वाहतूक योजना राबवणार Print E-mail
ठाणे/प्रतिनिधी, गुरुवार, ९ सप्टेंबर २०१०
ठाणे शहरातून जात असलेले महत्त्वाचे महामार्ग आणि भिवंडी परिसरात उभी राहत असलेली गोदामे, वेअरहाऊस यामुळे शहरातून अवजड वाहनांची वाहतूक सातत्याने सुरू असते. जेएनपीटीच्या विस्तारानंतर रस्त्यांवरील अवजड वाहनांची वाहतूक वाढणार आहे.
 
ठाण्यात सात नवीन मार्गावर शेअर रिक्षांना परवानगी Print E-mail
ढोकाळी, बाळकूमसाठी प्रवाशांचा आग्रह
ठाणे/प्रतिनिधी

इंधनाचे वाढते दर आणि त्यामुळे सातत्याने वाढत जाणारे रिक्षांचे भाडे यामुळे मीटर पद्धतीने रिक्षा प्रवास करणे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकापासून शहराच्या लांबच्या अंतरावर रिक्षा प्रवास शेअर पद्धतीने सुरू करावा, अशी नागरिकांकडून वाढती मागणी होत आहे.
 
३६० कोटींचे उत्पन्न देणाऱ्या महावितरण कार्यालयाची दुरवस्था Print E-mail
रमेश पाटील
वाडा तालुक्यात मोठय़ा प्रमाणात औद्योगिक क्षेत्र असल्याने येथील उद्योगधंद्यांपासून व इतर घरगुती विद्युत ग्राहकांकडून महावितरण कंपनीस वीज बिलापासून प्रति महिना ३० कोटी रुपये उत्पन्न मिळते.
 
कल्याण- डोंबिवली पालिकेची ३१ ऑक्टोबर रोजी निवडणूक! Print E-mail
कल्याण/प्रतिनिधी
निवडणूक आयोगाकडून कल्याण-डोंबिवली पालिकेला मिळालेल्या संकेतानुसार पालिकेची निवडणूक ३१ ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता १५ किंवा १६ ऑक्टोबरपासून लागू होऊ शकते.
 
अकरावीसाठी डीडीएम ज्युनिअर कॉलेजमध्ये देणगीशिवाय प्रवेश Print E-mail
ठाणे/प्रतिनिधी
अकरावी प्रवेशासाठी वणवण फिरणाऱ्या मुलांसाठी ठाण्यातील डीडीएम कनिष्ठ महाविद्यालयाने विनादेणगी प्रवेश देऊन आशेचा किरण दाखविला आहे. गेली ३५ वर्षे जुनी संस्था असलेल्या चरई येथील गुडविल इंटरनॅशनल फौंडेशन या संस्थेच्या माध्यमातून ज्ञानेश्वर ज्ञानमंदिर ही इंग्रजी माध्यमाची दहावीपर्यंतची शाळा चरईमध्ये चालवली जाते.
 
खरेदी-विक्री संघाची निवडणूक बिनविरोध Print E-mail
शहापूर/वार्ताहर
शहापूर तालुका खरेदी-विक्री संघाची २२ सप्टेंबर रोजी १७ संचालकपदासाठी होणारी पंचवार्षिक निवडणूक अखेर बिनविरोध झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, कुणबी सेना या सर्वच राजकीय पक्षांनी आपापसात जागावाटप करून निवडणूक बिनविरोध करून चांगला पायंडा टाकला आहे.
 
नोकरानेच केली शिवसेना नगरसेवकाच्या वडिलांची हत्या Print E-mail
भिवंडी/वार्ताहर
झोपेत असलेल्या मधुकर चौधरी यांना घरातील नोकराने तीक्ष्ण हत्याराने वार करून ठार मारले आणि सुमारे दोन लाखांच्या दागिन्यांची चोरी करून फरार झाला.
 
बिर्ला महाविद्यालयाचा ‘बेस्ट’ सोहळा Print E-mail
कल्याण/प्रतिनिधी
बिर्ला महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने शिक्षकदिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील काही शिक्षकांचा गौरव  सोहळा आयोजित केला होता.  विद्यापीठातर्फे बेस्ट कॉलेज पुरस्कार  नुकताच प्रदान करण्यात आला आहे, तसेच महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे ‘कॉलेज विथ पोटेन्शिअल ऑफ एक्सलन्स’ या योजनेत एक कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.
 
गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडण्या घ्याव्यात Print E-mail
महावितरणचे आवाहन
ठाणे/प्रतिनिधी

गणेशोत्सवाच्या कालावधीत मुंबई-ठाणे परिसरातील निरनिराळ्या मंडळांना महावितरण कंपनीने नाममात्र दरात वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे ठरविले असून, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन एका पत्रकान्वये करण्यात आले आहे.
 
टोलधाडीपासून वाचवा, अन्यथा रस्त्यावर उतरू- प्रताप सरनाईक Print E-mail
ठाणे/प्रतिनिधी
टोलवसुली करणाऱ्या कंपन्यांच्या व्यवहाराबाबत महालेखापालांनी ताशेरे ओढले असताना, तसेच याप्रश्नी उच्च न्यायालयात टोलवसुली रद्द करण्याबाबत याचिकेवरील निर्णय प्रलंबित होण्यापूर्वीच राज्य शासनाने मुंबईतील पाचही नाक्यांवरील टोलवसुलीचे काम संबंधित कंपन्यांना दिले आहे.
 
गणेशोत्सव व ईदसाठी भिवंडीतील पोलीस यंत्रणा सज्ज Print E-mail
शांतता कमिटी, मोहल्ला कमिटी व गणेशोत्सव मंडळांची बैठक
रतनकुमार तेजे

 गणेशोत्सव तसेच रमजान या दोन्ही सणांच्या पाश्र्वभूमीवर अत्यंत संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या भिवंडीत कायदा व सुरक्षा व्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
 
दसऱ्यापासून बदलापूरकरांसाठी शहर बस वाहतूक Print E-mail
बदलापूर/वार्ताहर
पुढील महिन्यात विजयादशमीच्या मुहूर्तावर बदलापूरकरांना शहर बस वाहतूक उपलब्ध करून देऊन आगळेवेगळे सीमोल्लंघन करण्याचा निर्णय नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी घेतला आहे. संबंधित ठरावाला सर्व सदस्यांनी मंजुरी दिली.
 
असे आहेत प्रभाग : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक Print E-mail
प्र.क्र. ९६- सावरकर रोड,  प्र.क्र. ९७ पेंडसेनगर,  प्र.क्र. ९८ इंदिरानगर,  प्र.क्र. ९९ डोंबिवली जिमखाना, प्र.क्र. १०० पाथर्ली गावठाण, प्र.क्र. १०१ गोग्रासवाडी.
 
‘संवाद-आस्वाद’चे प्रकाशन Print E-mail
ठाणे/प्रतिनिधी
मराठवाडय़ातील नामवंत समीक्षक मधू जामकर यांच्या संवाद-आस्वाद या पुस्तकाचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांच्या हस्ते  झाले. मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात झालेल्या या प्रकाशन सोहळ्याला प्रा. अनंत देशमुख, पत्रकार अरुण करमरकर व परममित्रचे माधव जोशी आदी उपस्थित होते.
 
इतिहास पुसण्याचा प्रयत्न झाल्यास तो उफाळून येतो - सुधीर जोगळेकर Print E-mail
डोंबिवली/प्रतिनिधी
इतिहास कधीही पुसून टाकता येत नाही. तो पुसण्याचा प्रयत्न केला तर तो दुप्पट शक्तीने उफाळून येतो. पुण्यातील भांडारकर संस्था आणि लाल महालातील दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्याचा प्रश्न ही त्याची उदाहरणे आहेत, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक सुधीर जोगळेकर यांनी सोमवारी येथे केले.
 
दयानंद म्हस्के, लोखंडवाला आदींना पुरस्कार Print E-mail
प्रतिनिधी
महापालिका क्षेत्र माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेतर्फे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्यांना देण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले असून माजी मंत्री दयानंद म्हस्के, श्रीधर घरत, सलमा लोखंडवाला आदी मान्यवरांचा त्यात समावेश आहे.
 
छताचे पीओपी कोसळले Print E-mail
कल्याण/प्रतिनिधी
पालिकेच्या शिक्षण मंडळ कार्यालयातील पीओपी काल रात्री कोसळले. कार्यालयातील सभागृहात गेल्या दोन वर्षांपूर्वी हे पीओपी बसविले होते. यासाठी सुमारे १० लाख रुपये खर्च करण्यात आला होता. याबाबत ठेकेदाराला जाब विचारण्यात येणार आहे.
 
बदलापूरमध्ये अक्षरधाराचा मायमराठी शब्दोत्सव Print E-mail
बदलापूर/वार्ताहर
गेली १५ वर्षे सातत्याने महाराष्ट्र तसेच गोवा व कर्नाटक या राज्यातून ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करणाऱ्या अक्षरधारा या पुणे येथील संस्थेच्या वतीने काटदरे मंगल कार्यालय, गांधी चौक, कुळगाव, बदलापूर येथे  २६ सप्टेंबपर्यंत माय  मराठी शब्दोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
स्वाध्याय परिवाराच्या श्रीकृष्ण जन्मोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद Print E-mail
ठाणे/प्रतिनिधी
पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या प्रेरणेने स्वाध्याय परिवाराच्या विविध स्तरांवर चालणाऱ्या वैश्विक रचनात्मक कार्यात युवावर्ग देखील मोठय़ा प्रमाणात सहभागी आहे. लाखो स्वाध्यायी युवक श्रीकृष्ण जन्मोत्सव, पथनाटय़ांच्या माध्यमातून आगळ्या रीतीने साजरा करतात.
 
पर्यावरणस्नेही गणेश सजावटीसाठी लहानग्यांची कार्यशाळा Print E-mail
ठाणे/प्रतिनिधी
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी श्री गणेशाची मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी शाडूच्या मातीची असावी, याकडे अधिकाधिक गणेशभक्तांचा ओढा वाढत आहे. आता सजावटीसाठीही घातक थर्माकोलऐवजी पुठ्ठे आणि अन्य पर्यावरणस्नेही वस्तूंचा उपयोग होताना दिसत आहे.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 Next > End >>

Page 1 of 6

ताज्या बातम्या



लोकरंग

‘चिनी ज्यादा’ !

अनिकेत साठे - रविवार, ५ सप्टेंबर २०१०
( sathe.aniket@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चिनी लष्कराच्या मुक्त संचारामुळे भारताची चिंता वाढली असून त्यामागे ‘ड्रॅगन’ची नेमकी काय चाल आहे, असा प्रश्न होतो. त्याचे उत्तर शोधताना हा विषय केवळ गिलगिटपुरताच मर्यादित नाही, तर त्याला विविध स्वरूपाचे कंगोरे असल्याचे लक्षात येते. अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून संरक्षण क्षेत्रात अफाट गुंतवणूक करणारा चीन सध्या जी पावले टाकतो आहे, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाही गर्भित इशारा देण्याचा भाग आहे.

दिनदर्शिका

गुरुवार, ९ सप्टेंबर २०१०. मिती भाद्रपद शुद्ध प्रतिपदा १२ क. ०८ मि.पर्यंत. उत्तरा  नक्षत्र २० क. ५१ मि.पर्यंत. कन्या चंद्र. सूर्योदय- ६।२६ सूर्यास्त- ६।४६
मेष
- शत्रूंवर लक्ष ठेवा, वृषभ - मुलांचे प्रश्न सुटतील, मिथुन - घरात शांतता ठेवा, कर्क - छोटे-मोठे प्रवास होतील, सिंह - अचानक दडपण वाढतील, कन्या - महत्त्वाचे निर्णय घ्याल, तूळ - देवघेवीत चुका करू नका, वृश्चिक - पैसा हाती येईल, धनू - सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, मकर - प्रयत्न कारणी लागतील, कुंभ - अडचणींचा दिवस, मीन - शासकीय कामे होतील.
शुभराशी : वृश्चिक / धनू / मकर