|
|
बातम्या
प्रतिनिधी, गुरुवार, ९ सप्टेंबर २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
रंगीबेरंगी रांगोळ्या.. थर्माकोलचे आणि पर्यावरणस्नेही मखर आणि सजावटीच्या चिनी वस्तू यांनी सध्या मशीद बंदरपासून ते दादपर्यंतची सर्व बाजारपेठ फुलून गेली आहे.
|
सुनील डिंगणकर
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईतील विविध ठिकाणचे गणपती पाहण्यासाठी भाविक गर्दी करत असतात. किंग्ज सर्कल येथे जीएसबी सेवा मंडळातर्फे पाच दिवसांचा सार्वजनिक गणपती बसविण्यात येतो. त्याचे दर्शन घेण्यासाठी सुमारे पाच लाख भाविक येतात.
|
प्रतिनिधी प्रत्येकाला जात, धर्म, पंथ असला तरी प्रत्येक व्यक्तीमध्ये जातीय सलोखा, राष्ट्रीय एकात्मतेची भावना असतेच. ती जागृत करण्याचे काम पोलीस आणि जनतेने करावे, असे आवाहन ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी मिरारोड येथे केले.
|
प्रतिनिधी श्री फिल्म्स अॅण्ड एण्टरटेन्मेंटच्या वतीने ‘तू सुखकर्ता तू दुखहर्ता’ या गणपतीवरील गाण्यांच्या अल्बमचे प्रकाशन अनेक दिग्गज कलावंतांच्या उपस्थितीत ज्येष्ठ संगीतकार आणि गायक पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
|
महावितरणचे आवाहन प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या कालावधीत मुंबई-ठाणे परिसरातील निरनिराळ्या मंडळांना महावितरण कंपनीने नाममात्र दरात वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे ठरविले असून, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन एका पत्रकान्वये करण्यात आले आहे.
|
प्रतिनिधी मोहमद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित व्हेन मेलडी वॉज क्वीन आणि अॅपल इव्हेंट्स् यांच्या विद्यमाने महमदरफीच्या सदाबहार गीतांचा कार्यक्रम दादर-माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये पार पडला. गायक अनिल अॅक्विला, मिनल राव, प्रतीक जोजफ यांनी आपल्या सहकार्यासमवेत रफींची गाणी सादर केली.
|
प्रतिनिधी दरवर्षी चांगल्या सजावटीसाठी, पर्यावरणस्नेही गणेशोत्सवासाठी मंडळांना पुरस्कार दिले जातात. यंदाच्या वर्षी त्यात सुरक्षितता या घटकाचाही समावेश झाला आहे.
|
प्रतिनिधी दर्जेदार आणि सातत्यपूर्ण संगीतरचना करणारे संगीतकार आणि गायक श्रीधर फडके गुरुवार, ९ सप्टेंबर रोजी वयाची साठी पूर्ण करीत आहेत. यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनात अग्रेसर असणाऱ्या ‘स्वरगंधार’ या संस्थेतर्फे याच दिवशी संध्याकाळी सात वाजता विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात श्रीधर फडके यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे.
|
प्रतिनिधी पाल्र्यातील साठय़े महाविद्यालयात ‘स्त्री समानता दिवस’ तसेच ‘वुमन डेव्हलपमेंट सेलच्या’ वर्धापनदिनाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात ज्युडो कराटे तज्ज्ञ शरीफ बाफ यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे देताना सांगितले की, मुलींची छेडछाड काढणाऱ्यांपासून स्वत:ला वाचविण्यासाठी दुसरे कुणी मदतीला येईल याची वाट पाहण्यापेक्षा प्रत्येकीने स्वत:च स्वतचे रक्षण करायला आणि समाजात आत्मविश्वासाने शिकले पाहिजे.
|
प्रतिनिधी हैदराबाद तथा मराठवाडा मुक्तिदिनानिमित्त येत्या १७ सप्टेंबर रोजी रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून मराठवाडय़ातील प्रथितयश अनुभवी मान्यवरांशी ५० वर्षांपूर्वीच्या समाजजीवनाला उजाळा देणारा संवाद आणि मराठवाडय़ातील लोकप्रिय गायक-गायिका यांचे अभंग गायन हे या कार्यक्रमाचे वैशिष्टय़ आहे.
|
प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त राज्यातील आयुर्वेद महाविद्यालयांच्या माध्यमातून १८ व १९ सप्टेंबर रोजी आयुर्वेद रिसर्च मेथडोलॉजी विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
|
प्रतिनिधी राज्याच्या दगडखाण क्षेत्रातील संतुलन पाषाण शाळा संदर्भात शिक्षणमंत्र्यांनी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेची टोलवाटोलवी केल्याच्या निषेधार्थ १३ सप्टेंबरपासून आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दगडखाण असंघटित कामगार विकास परिषदचे अध्यक्ष अॅड. बी. एम. रेगे यांनी दिला आहे.
|
कोटय़वधी रुपयांचे श्रीखंड खाण्यासाठी फाइलच गायब? प्रतिनिधी ,बुधवार, ८ सप्टेंबर २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
जुहू-विलेपार्ले विकास योजनेतील प्रसिद्ध पुष्पा नरसी उद्यानासह विविध कारणांसाठी आरक्षित असलेले एकूण ४५ ते ५० हजार चौ. मी. क्षेत्रफळाचे पाच भूखंड जेव्हीपीडी संस्थेच्या घशात घालण्याचा घाट सध्या महापालिकेत घातला जात आहे. ४० वर्षांपासून महापालिकेच्या ताब्यात असलेले हे भूखंड आजही आपल्याच मालकीचे असल्याचा दावा करीत विकास आराखडय़ातील आरक्षणानुसार हे भूखंड ताब्यात घ्या, अन्यथा त्यावरील हक्क सोडून द्या,
|
निशांत सरवणकर
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
 म्हाडा इमारतींचा पुनर्विकास करताना उपनगरातून अतिरिक्त एफएसआयपोटी प्रिमिअम (शुल्क) घेण्याऐवजी आता विकासकांकडून घरे बांधून घेण्यात येणार आहेत. ही घरे म्हाडा विक्रीसाठी उपलब्ध करणार असल्यामुळे मध्यमवर्गीयांना अनेक मोक्याच्या ठिकाणी विकासकांपेक्षा कमी किमतीत घरे मिळणार आहेत.
|
आत्महत्येच्या घटनांनी व्याकूळ झालेल्यांचा सवाल! प्रतिनिधी
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सहाय्यक आयुक्तांच्या मुलाने पत्नीचा खून करून केलेली आत्महत्या, त्यानंतर ओशिवरा पोलिसांत कार्यरत पोलिसाने गळफास लावून केलेली आत्महत्या आणि सोमवारी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत हवालदाराने कर्तव्यावर असतानाच सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वत:वर गोळी झाडून घेत केलेला आत्महत्येचा प्रयत्न या तीन घटनांनी पोलीस वर्तुळ अक्षरश: ढवळून निघाले आहे.
|
प्रा. सुरेंद्र रोटे सहाय्यक प्राध्यापक, समाजशास्त्र विभाग, सिद्धार्थ कॉलेज, मुंबई ब्रिटिशांनी १९३१ मध्ये जातवार जनगणना केली. तत्कालीन जनगणना आयुक्त जे. एच. हटन यांनी अस्पृश्य जाती कशा हिंदू धर्माबाहेरील आहेत व त्या हिंदू धर्मात नसल्याची निश्चिती करून त्यांचा अनुसूचित जातींमध्ये समावेश केला आणि भारत सरकार कायदा १९३५ अन्वये त्यांना सवलती देण्यात आल्या. अशा प्रकारे तत्कालीन अस्पृश्य जातींना एक समान ओळख अनुसूचित जातींद्वारे मिळाली. या अनुसूचित जातींची सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दुर्बलता लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्यांना सोयी-सवलती देण्यास सुरुवात केली.
|
प्रतिनिधी
‘मी मराठी’ वाहिनीवर ३० ऑगस्टपासून सुरू झालेली ‘खेळ मांडियेला’ ही मालिका एका लहान मुलीच्या जीवनावर आधारित मालिका आहे. चंद्रलेखा ही एक खेडेगावात राहाणारी लहान मुलगी आहे. या मालिकेमध्ये चंद्रलेखाची भूमिका श्रद्धा रानडे हिने साकारली आहे. ही मालिका इतर मालिकांपेक्षा अतिशय वेगळी अशी मालिका आहे. या मालिकेचे कथानक चंद्रलेखावर आधारित असले तरी तिच्या अनुषंगाने येणाऱ्या इतर विषयांवरही ‘खेळ मांडियेला’ या मालिकेत प्रकाश टाकण्यात आला आहे.
|
प्रतिनिधी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्याने डॉ. संदीप श्रोत्री यांच्या ‘पुष्पपठार कास’ या मराठी पुस्तकाच्या ‘प्लॅटू ऑफ फ्लावर्स- कास’ या इंग्रजी आवृत्तीचे नुकतेच प्रकाशन झाले. वैद्यकीय शिक्षण, फलोत्पादन आणि पर्यटन मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
|
पश्चिम उपनगरात झालेल्या गोळीबाराच्या घटनांमागे या गुंडांचा हात प्रतिनिधी गेल्या तीन महिन्यांत पश्चिम उपनगरात झालेल्या गोळीबाराच्या घटनांमागील कुख्यात गुंड रवी पुजारी टोळीच्या पाच गुंडांना मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने आज अटक केली. रवी पुजारी टोळीकडून सध्या मुंबईत पसरविण्यात येत असलेली दहशत मोडून काढण्यासाठी चालविण्यात येणाऱ्या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी ही कारवाई केली.
|
प्रतिनिधी सुगंधा कुळकर्णी या ७५ वर्षीय आजींनी नव्या अंगाईगीताची एक सीडी तयार केली आहे. गीतरचना त्यांची आणि चालीही त्यांच्याच. आशयघन व भावगर्भ गीते सोप्या व रसाळ चाली यांच्या संगमातून नव्या सुखद अंगाईगीतांचा ‘बाळा जो जो रे’ हा नजराणा या आजींनी आजच्या माता- बालकांना देऊ केला आहे.
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 Next > End >>
|
|
Page 1 of 4 |
|
लोकरंग
‘चिनी ज्यादा’ !
अनिकेत साठे - रविवार, ५ सप्टेंबर २०१० ( sathe.aniket@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चिनी लष्कराच्या मुक्त संचारामुळे भारताची चिंता वाढली असून त्यामागे ‘ड्रॅगन’ची नेमकी काय चाल आहे, असा प्रश्न होतो. त्याचे उत्तर शोधताना हा विषय केवळ गिलगिटपुरताच मर्यादित नाही, तर त्याला विविध स्वरूपाचे कंगोरे असल्याचे लक्षात येते. अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून संरक्षण क्षेत्रात अफाट गुंतवणूक करणारा चीन सध्या जी पावले टाकतो आहे, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाही गर्भित इशारा देण्याचा भाग आहे. |
दिनदर्शिका
गुरुवार, ९ सप्टेंबर २०१०. मिती भाद्रपद शुद्ध प्रतिपदा १२ क. ०८ मि.पर्यंत. उत्तरा नक्षत्र २० क. ५१ मि.पर्यंत. कन्या चंद्र. सूर्योदय- ६।२६ सूर्यास्त- ६।४६ मेष - शत्रूंवर लक्ष ठेवा, वृषभ - मुलांचे प्रश्न सुटतील, मिथुन - घरात शांतता ठेवा, कर्क - छोटे-मोठे प्रवास होतील, सिंह - अचानक दडपण वाढतील, कन्या - महत्त्वाचे निर्णय घ्याल, तूळ - देवघेवीत चुका करू नका, वृश्चिक - पैसा हाती येईल, धनू - सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, मकर - प्रयत्न कारणी लागतील, कुंभ - अडचणींचा दिवस, मीन - शासकीय कामे होतील. शुभराशी : वृश्चिक / धनू / मकर
|