|
|
व्यापार - उद्योग
व्यापार प्रतिनिधी, गुरुवार, ९ सप्टेंबर २०१० आर्थिकदृष्टय़ा परवडणाऱ्या प्रमाणशीर तंत्रज्ञानाद्वारे स्थानिक स्तरावर उपलब्ध स्रोतांचा वापर करून यशस्वीरीत्या वीजनिर्मितीच्या कमिन्स इंजिन रिसर्च फॅसिलिटी (सीईआरएफ)ने बरोबर सामंजस्यातून ओरिसा येथील कोलहा गावात प्रत्यक्षात राबविलेल्या प्रकल्प सर्वत्र कौतुकाचा विषय बनला आहे.
|
व्यापार प्रतिनिधी, गुरुवार, ९ सप्टेंबर २०१० उद्योगधंद्यांना पूरक अशी वेगवान मालवाहतूक आणि कच्चा मालाची ने-आण सुलभ व गतिमान करावी, या उद्देशाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसीने राज्यातील आपल्या विविध औद्योगिक वसाहतींना जोडून १५ ट्रक टर्मिनल्स उभारण्याचे नियोजन आखले आहे. पहिल्या टप्प्यातील सात ट्रक टर्मिनल्सचे कामही सुरू झाले आहे.
|
व्यापार प्रतिनिधी, गुरुवार, ९ सप्टेंबर २०१० रिलायन्स कम्युनिकेशन्सने सीडीएमए डेटा सेवेमध्ये अग्रगण्य स्थान प्रस्थापित केले आहे. आता कंपनी थ्रीजी सेवांमध्ये जलद प्रगती साधण्यासाठी सज्ज आहे. आरकॉम आपल्या १एक्स व एचएसडी सेवांद्वारे डेटा सेवांच्या क्षेत्रात मजबुतीने स्थापित आहे.
|
व्यापार प्रतिनिधी, गुरुवार, ९ सप्टेंबर २०१० वाहन उद्योगासाठीची टय़ुबिंग प्रणाली बनविणाऱ्या इम्पेरियल ऑटो इंडस्ट्रीज या आघाडीच्या कंपनीने अॅलेवार्ड रेजना ऑटोसस्पेन्शन्स बरोबर संयुक्त कंपनी स्थापन करण्याचा करार केला आहे. अॅलेवार्ड रेजना ऑटो सस्पेन्शन्स ही इटलीच्या सोजेफी उद्योगसमूहाची घटक असून, मोटारी आणि मालवाहू गाडय़ांसाठी इलेस्टीक सस्पेशन्स कम्पोनंट्सचे उत्पादन करते.
|
व्यापार प्रतिनिधी, गुरुवार, ९ सप्टेंबर २०१० फ्युचर जनराली इंडिया लाइफ इन्श्युरन्स कंपनीने आपल्या ग्राहकस्नेही योजनांच्या ताफ्यात पहिली अनोखी युलिप योजना ‘फ्युचर जनराली सिलेक्ट इन्श्युरन्स प्लॅन’ या नावाने दाखल केली.
|
व्यापार प्रतिनिधी, गुरुवार, ९ सप्टेंबर २०१० आयआरडीएच्या नवीन मार्गदर्शक निर्देशांप्रमाणे सुरक्षेवर भर देत जास्तीत जास्त लाभ आणि गुंतवणुकीचे अनेकविध विकल्प आणि रायडर्सची जोड असलेल्या ‘स्टार परफॉर्मर’ आणि ‘युनिट प्लस सुपर’ यासारख्या दोन नवीन युलिप योजना एसबीआय लाइफ इन्श्युरन्स कंपनीने दाखल केल्या आहेत.
|
गुरुवार, ९ सप्टेंबर २०१० ‘आयसीडब्ल्यूएआय’चे ठाण्यात केंद्र इन्स्टिटय़ूट ऑफ कॉस्ट अॅण्ड वर्क अकाऊंटंस ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागीय शाखेचे ठाण्यात तीन हात नाक्याजवळील दमाणी इस्टेट येथे नवीन केंद्राचे उद्घाटन खासदार आनंद परांजपे आणि ठाण्याचे महापौर अशोक वैती यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.
|
व्यापार प्रतिनिधी ,बुधवार, ८ सप्टेंबर २०१० गणेश चतुर्थीचा सण आता काही दिवसांवरच आला असताना, मुंबईकर गणेशक्तांसाठी यंदाचा सणाच्या जय्यत तयारीला साथ म्हणून विविध मॉल्समध्येही धामधूम सुरू झाली आहे. पर्यावरणाशी मैत्री साधणाऱ्या सुंदर गणेशमूर्ती, मखरसजावटीचे साहित्य, पारंपरिक गोडधोड पदार्थ आणि पारंपरिक कपडे अशा विविध उपयुक्त वस्तूंनी मॉल्स गजबजून गेली आहेत.
|
‘शिवरंजनी’ अगरबत्ती * बायकेरी इंडस्ट्रीने आपल्या ‘शिवरंजनी’ ब्रॅण्डअंतर्गत गणेश चतुर्थीच्या निमित्ताने ‘वरदान’, ‘प्रेममयी’ आणि ‘सावन मोगरा’ या तीन नवीन खास अगरबत्त्या उपलब्ध केल्या आहेत.
|
‘कर्ल-ऑन’ला पुन्हा कॉयर उद्योगाचा पुरस्कार * देशातील मॅट्रेस उद्योगातील क्रमांक एकचे ब्रॅण्ड ‘कर्ल-ऑन’चे या उद्योगक्षेत्रासाठी अतुलनीय योगदान आणि असामान्य कामगिरीची राष्ट्रीय कॉयर बोर्डाने उचित दखल घेतली आहे.
|
|
व्यापारी पेठेचे उद्घाटन |
|
|
गेली २१ वर्षे मराठी माणसांनी मराठी व्यावसायिकांकरिता आयोजित केलेली गणपती ते दिवाळी दरम्यान सातत्याने ६७ दिवस चालणाऱ्या महाराष्ट्र व्यापारी पेठेचे उद्घाटन शुक्रवारी आमदार नितीन सरदेसाई यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास मराठी व्यापारी मित्रमंडळाचे अध्यक्ष ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर, पेठेचे अध्यक्ष अनंत भालेकर आणि सारस्वत बँकेचे उपाध्यक्ष किशोर रांगणेकर हेदेखील उपस्थित होते. |
व्यापार प्रतिनिधी - मंगळवार, ७ सप्टेंबर २०१० ठाणे जनता सहकारी बँकेने बँकिंग क्षेत्रातील आपली घोडदौड सुरूच ठेवली असून बँक लवकरच पाच हजार कोटींचा टप्पा पार करेल, असा विश्वास बँकेच्या संचालक मंडळाला वाटत आहे. आंतरराष्ट्रीय व्यवहारातही बँकेने गरुडभरारी घेत ग्राहकांना एकाच छताखाली सर्व सुविधा द्यायला सुरुवात केली आहे.
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 Next > End >>
|
|
लोकरंग
‘चिनी ज्यादा’ !
अनिकेत साठे - रविवार, ५ सप्टेंबर २०१० ( sathe.aniket@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चिनी लष्कराच्या मुक्त संचारामुळे भारताची चिंता वाढली असून त्यामागे ‘ड्रॅगन’ची नेमकी काय चाल आहे, असा प्रश्न होतो. त्याचे उत्तर शोधताना हा विषय केवळ गिलगिटपुरताच मर्यादित नाही, तर त्याला विविध स्वरूपाचे कंगोरे असल्याचे लक्षात येते. अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून संरक्षण क्षेत्रात अफाट गुंतवणूक करणारा चीन सध्या जी पावले टाकतो आहे, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाही गर्भित इशारा देण्याचा भाग आहे. |
दिनदर्शिका
गुरुवार, ९ सप्टेंबर २०१०. मिती भाद्रपद शुद्ध प्रतिपदा १२ क. ०८ मि.पर्यंत. उत्तरा नक्षत्र २० क. ५१ मि.पर्यंत. कन्या चंद्र. सूर्योदय- ६।२६ सूर्यास्त- ६।४६ मेष - शत्रूंवर लक्ष ठेवा, वृषभ - मुलांचे प्रश्न सुटतील, मिथुन - घरात शांतता ठेवा, कर्क - छोटे-मोठे प्रवास होतील, सिंह - अचानक दडपण वाढतील, कन्या - महत्त्वाचे निर्णय घ्याल, तूळ - देवघेवीत चुका करू नका, वृश्चिक - पैसा हाती येईल, धनू - सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, मकर - प्रयत्न कारणी लागतील, कुंभ - अडचणींचा दिवस, मीन - शासकीय कामे होतील. शुभराशी : वृश्चिक / धनू / मकर
|