मुखपृष्ठ >> विशेष लेख
 


स्पर्धेचे नियम व अटी




विशेष लेख
सोयीस्कर असत्ये Print E-mail
निकीत अभ्यंकर ,गुरुवार, ९ सप्टेंबर २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
(स्टॅनफर्ड विद्यापीठ, अमेरिका)

‘गैरसोयीची असत्ये’ (२३ जुलै) हा मुग्धा कर्णिक यांचा लेख प्रकाशित झाला. त्यामध्ये त्यांनी जागतिक तापमानवाढ आणि वातावरण बदल हे नैसर्गिक असून, त्याला कार्बन डायऑक्साइड व इतर हरितगृह वायू जबाबदार नाहीत, अशा प्रकारचा दावा केला आहे. त्याकरिता त्यांनी काही शास्त्रज्ञांचे दाखलेसुद्धा दिले आहेत.
 
असत्यांचा कोळसा उगाळावा तितका.. Print E-mail
मुग्धा कर्णिक ,गुरुवार, ९ सप्टेंबर २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
माझ्या ‘ग्लोबल वॉर्मिग आणि कार्बन डायऑक्साइड’वरील १२ ऑगस्टच्या अंकातील अभिजित घोरपडे यांच्या लेखामुळे एक चर्चा मराठीत सुरू झाली. अशा प्रकारच्या चर्चा पाश्चिमात्य जगात रोजच्या रोज झडत असतात. दोन्हीकडे विद्वत्तापूर्ण अभ्यास केलेले आणि ठोस भूमिका घेऊन उभे राहिलेले लोक आहेत.
 
ते मंतरलेले दिवस Print E-mail
के. सुब्रम्हण्यम ,बुधवार, ८ सप्टेंबर २०१०
वरिष्ठ संरक्षण विश्लेषक

पाकिस्तान अण्वस्त्रे तयार करण्याच्या विचारात असल्याचा गुप्तचर समितीचा अहवाल होता, त्यावर चर्चा करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय व्यवहार समितीची बैठक झाली. त्यात पाकिस्तानला प्रत्युत्तर म्हणून लगेच भारतानेही अण्वस्त्रनिर्मितीची प्रक्रिया सुरू करण्यास मोरारजींनी विरोध दर्शविला होता.
 
वादातीत कर्तृत्व.. Print E-mail
सी. राजमोहन
ज्येष्ठ पत्रकार, परराष्ट्र व सामरिक धोरणाचे अभ्यासक

ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ होमी नौसेरवानजी सेठना यांच्या निधनामुळे भारताच्या अणुतंत्रज्ञानाच्या धगधगत्या इतिहासातील एक सोनेरी कालखंड अंतर्धान पावला आहे. आधुनिक भारताच्या अणुविषयक तंत्रज्ञान विकास कार्यक्रमाचे ते अध्वर्यु होतेच; पण भारताचा अणुतंत्रज्ञान विकासाचा कार्यक्रम सुरक्षित आणि अबाधित राखण्यात त्यांनी जे योगदान दिले आहे, त्याला खरेच तोड नाही.
 
संप जगण्याच्या अधिकारासाठी Print E-mail
कॉ. अरविंद नाचणे ,मंगळवार, ७ सप्टेंबर २०१०
७ सप्टेंबर २०१० ला भारतातील दोन कोटी कामगार एक दिवसाचा लाक्षणिक संप करणार आहेत. त्यानंतरचा कार्यक्रम आहे डिसेंबरमध्ये २० लाख कामगारांचा संसदेवर मोर्चा नेण्याचा. भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात प्रथमच सर्वात जास्त सभासद संख्या असलेली इंटक या दोन्ही कार्यक्रमांत भाग घेणार आहे. किंबहुना इंटकचे अध्यक्ष डॉ. संजीव रेड्डी हेच या संयुक्त आघाडीचे निमंत्रक आहेत.
 
डॉ. राधाकृष्णन यांच्या विचारातील भारतीय संस्कृती Print E-mail
डॉ. मीरा इनामदार ,शनिवार, ४ सप्टेंबर २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
भूतपूर्व राष्ट्रपती, जगन्मान्य थोर तत्त्वज्ञ आणि ‘शिक्षक’ पदाला भूषण मिळवून देणारे थोर आचार्य डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा उद्या जन्मदिवस. त्यानिमित्ताने ‘भारतीय संस्कृती’च्या संदर्भातील त्यांच्या विचारांचा हा शोध..!
डॉ. राधाकृष्णन हे प्राचीन ऋषीमुनींच्या परंपरेत स्व-तेजाने उजळणारे आधुनिक काळातील ज्ञानर्षी, राजर्षी आणि ‘संस्कृती तत्त्वज्ञ’ होते. भारतीय सांस्कृतिक संचिताबद्दल त्यांना नितांत आदर होता.
 
स्त्रीजीवनाच्या सहृदय कथाकार! Print E-mail
अरुणा अन्तरकर , शनिवार, ४ सप्टेंबर २०१०
गेले ते दिवस म्हणून गळा काढण्याचा उद्देश नाही, पण सहाव्या दशकाचा काळ म्हणजे साहित्य, सिनेमा आणि त्यांचे चाहते यांच्याकरिता सोन्याचे दिवस होते. या दोन्ही क्षेत्रातल्या उत्तुंग प्रतिभांचे विलक्षण आविष्कार तेव्हा पाहायला मिळाले. आज दुर्मिळ झालेल्या कथा नावाच्या साहित्यप्रकाराचा तर तो बहराचा काळ होता.गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, जी. ए. कुलकर्णी, शांताराम, दि. बा. मोकाशी, वसुंधरा पटवर्धन, विजया राजाध्यक्ष यांनी त्या काळात लिहिलेल्या कथा आजही पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटतात.
 
शेतकऱ्यांच्या समस्यांचा आवाज Print E-mail
हेरंब कुलकर्णी ,शुक्रवार, ३ सप्टेंबर २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
शरद जोशी. नुसतं नावच एका चैतन्यदायी भूतकाळाचं स्मरण जागं करायला पुरेसं आहे. प्रत्यक्षात मी शेतकरी कुटुंबातला नाही. शरद जोशींच्या आंदोलनाचा सुवर्णकाळ १९८० ते ९५. आमचा अकोले तालुका एकेकाळी शेतकरी संघटनेचा बालेकिल्लाच होता. त्यामुळे अनेक आंदोलनांचा प्रभाव त्या वयात पडत राहिला. अनेक आंदोलने बघितल्यामुळे शरद जोशींविषयीचे कुतूहल कायम राहिले.१२ वर्षांपूर्वी मी पाचव्या वेतन आयोगाच्या वेतनवाढीला विरोध केला.
 
मुख्यमंत्र्यांना अनावृत पत्र ; वनवास संपणार कधी? Print E-mail
गुरुवार, २ सप्टेंबर २०१०
अशोक चव्हाण
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
सादर नमस्कार.
महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत आपण राज्याची धुरा वाहात आहात याबद्दल अभिवादन व अभिनंदन! अवघ्या भारताला हेवा वाटावी अशी समाजसुधारकांची परंपरा महाराष्ट्राला लाभली. १८२३ला लोकहितवादी जन्मले. १९७३ साली प्रबोधनकार ठाकरे यांचे निधन झाले. सलग दीडशे वर्षे महात्मा फुले, सुधारककार आगरकर, विठ्ठल रामजी शिंदे, राजर्षी शाहू महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे या दिग्गजांनी मराठी मनात बुद्धिवादाची आणि विवेकाची पेरणी व मशागत केली.
 
समाज प्रबोधनाचा धर्म हवा Print E-mail
दिनेशचंद्र हुलवळे ,गुरुवार, २ सप्टेंबर २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आषाढीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपुरात १५ लाख वारकरी आल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. एवढे लोक ज्या तन्मयतेनं, शिस्तीनं दोन दिवस रांगेत उभे राहतात ती निश्चितच कौतुकास्पद आहे. पण गर्दीमुळे उद्भवणारे कायदा सुव्यवस्थेचे-आरोग्याचे प्रश्न, त्याचा प्रशासनावर पडणारा ताण विचारात घ्यायला हवा.
 
अशा आठवणी, असे किस्से Print E-mail
बुधवार, १ सप्टेंबर २०१०
मुंबई आकाशवाणीचे माजी वृत्त संपादक तसेच मुंबई दूरदर्शनचे पहिले वृत्त संपादक दि. बा. खाडे यांचे मंगळवारी निधन झाले. मोजक्याच शब्दात भाष्य करणाऱ्या मिश्किल स्वभावाच्या खाडे यांच्याकडे माहिती आणि किस्से यांचा भरपूर खजिना असे. ‘महाराष्ट्राचा लेखाजोखा’ या ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या पुस्तकात त्यांनी लिहिलेले काही किस्से.
 
जागतिक स्पर्धात्मकता गुणांकन २०१० : बोध व संकेत Print E-mail
डॉ. अमोल गोरे, डॉ. गुरूप्रसाद मूर्ती ,मंगळवार, ३१ ऑगस्ट २०१०
प्रोफेसर-डायरेक्टर जनरल
डॉ. व्ही. एम. बेडेकर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज

नुकताच सादर झालेला आयएमडी (IMD) जागतिक स्पर्धात्मकता वार्षिक अहवाल २०१०, अनेक विचारांना चालना देतो. विशेष करून जागतिक वित्तीय संकटांच्या पाश्र्वभूमीवर आणि युरोपमधल्या ग्रीक वित्तीय प्रश्नांच्या घडामोडींमुळे या अहवालाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

ताज्या बातम्या



लोकरंग

‘चिनी ज्यादा’ !

अनिकेत साठे - रविवार, ५ सप्टेंबर २०१०
( sathe.aniket@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चिनी लष्कराच्या मुक्त संचारामुळे भारताची चिंता वाढली असून त्यामागे ‘ड्रॅगन’ची नेमकी काय चाल आहे, असा प्रश्न होतो. त्याचे उत्तर शोधताना हा विषय केवळ गिलगिटपुरताच मर्यादित नाही, तर त्याला विविध स्वरूपाचे कंगोरे असल्याचे लक्षात येते. अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून संरक्षण क्षेत्रात अफाट गुंतवणूक करणारा चीन सध्या जी पावले टाकतो आहे, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाही गर्भित इशारा देण्याचा भाग आहे.

दिनदर्शिका

गुरुवार, ९ सप्टेंबर २०१०. मिती भाद्रपद शुद्ध प्रतिपदा १२ क. ०८ मि.पर्यंत. उत्तरा  नक्षत्र २० क. ५१ मि.पर्यंत. कन्या चंद्र. सूर्योदय- ६।२६ सूर्यास्त- ६।४६
मेष
- शत्रूंवर लक्ष ठेवा, वृषभ - मुलांचे प्रश्न सुटतील, मिथुन - घरात शांतता ठेवा, कर्क - छोटे-मोठे प्रवास होतील, सिंह - अचानक दडपण वाढतील, कन्या - महत्त्वाचे निर्णय घ्याल, तूळ - देवघेवीत चुका करू नका, वृश्चिक - पैसा हाती येईल, धनू - सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, मकर - प्रयत्न कारणी लागतील, कुंभ - अडचणींचा दिवस, मीन - शासकीय कामे होतील.
शुभराशी : वृश्चिक / धनू / मकर