|
|
अग्रलेख
गुरुवार, ९ सप्टेंबर २०१० नैतिकतेचे ढोल बडवून राजकीय गुन्हेगारीकरण आणि भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविणाऱ्या भाजपने ज्या पद्धतीने झारखंडमध्ये सत्तेसाठी शिबू सोरेन आणि त्यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाला वश करण्याचा आटापिटा चालविला आहे, त्यावरून या पक्षाच्या भविष्यातील वाटचाल कशी असेल याचा अंदाज लावता येऊ शकतो.
|
बुधवार, ८ सप्टेंबर २०१० ‘आम्हाला डॉ. होमी भाभा यांच्याकडून बाळकडू मिळाले आहे. विज्ञान- तंत्रज्ञान आमच्या रक्तात आहे. देशासाठी आव्हाने स्वीकारणे हाच आमचा धर्म आहे. सततच्या कामामुळे आम्ही नेहमीच ताजेतवाने असतो. त्यामुळे या वयातही म्हणजे ८० व्या वर्षी तुम्ही मला १२ तास काम करताना पाहू शकता..
|
मंगळवार, ७ सप्टेंबर २०१० स्वत:स माओवादी म्हणवून घेणाऱ्या नक्षलवाद्यांनी आपल्या ताब्यातल्या ओलीस पोलिसांची अखेर सुटका केली. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या धोरणीपणाचा हा विजय आहे. नक्षलवाद्यांना त्यांनी नमवले तोच दिवस नेमका निवडणूक आयोगाने बिहारच्या विधानसभा निवडणुका जाहीर करण्यासाठी योग्य असल्याचे मानले आहे.
|
सोमवार, ६ सप्टेंबर २०१० चीनचा नेमका कोणता चेहरा खरा, असा प्रश्न भल्याभल्यांना नेहमीच पडत असतो. चीनच्या एका वरिष्ठ नेत्याने बीजिंगच्या जागतिक पुस्तक प्रदर्शनामध्ये भारतीय दालनास भेट देऊन भारताविषयी गौरवोद्गार काढले. पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या देशाला ‘पंचशील’ दिले, असे त्या नेत्याने यावेळी स्पष्ट केले.
|
शनिवार, ४ सप्टेंबर २०१० सर्व काँग्रेसवाले गांधीजी-नेहरू किंवा इंदिरा-राजीव आणि आता सोनिया गांधी यांच्या ‘ब्रँड’ नावावर त्यांचे राजकारण करतात. पण ‘राजकारण करतात’ म्हणजे नक्की काय करतात? बहुतेक काँग्रेसवाल्यांना पंडित नेहरूंच्या विचारसरणीचा मुख्य आशय सुस्पष्टपणे विवेचन करून सांगता येणार नाही.
|
शुक्रवार, ३ सप्टेंबर २०१० गेल्या २० वर्षांत सोनिया गांधींकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती विलक्षण बदलला आहे? विरोधी पक्षांचा, मीडियाचा, स्वयंभू ‘इंटेलेक्च्युअल्स’चा आणि काँग्रेसचाही! कमालीचा विद्वेषाच्या आणि विखाराच्या अग्नीपरीक्षेतून सोनिया गांधी तावून-सुलाखून बाहेर आल्या आहेत आणि पुन्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत.
|
गुरुवार, २ सप्टेंबर २०१० संपूर्ण जगात आणि विशेषत: अरब जगतात विद्वेषाचे वातावरण कायम ठेवून अमेरिकेने इराकमधून काढता पाय घेतला आहे. सद्दाम हुसेन यांच्या कारकीर्दीत स्वतंत्र आणि सुस्थिर असणाऱ्या इराकची धूळधाण उडवून मगच इराकी जनतेच्या हाती त्यांचा देश सोपवण्यात आला आहे.
|
बुधवार, १ सप्टेंबर २०१० पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी आपल्या खेळालाच कायमचे संपवायचे ठरवले असेल तर मग प्रश्नच नाही. पण तसे नसेल तर दरवेळी आपल्याच खेळाडूंविषयी संशयाचे धुके निर्माण का होते, याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल. याचा अर्थ, इतर देशांमध्ये असणारे खेळाडू धुतल्या तांदळासारखे आहेत, असा मुळीच नाही.
|
मंगळवार, ३१ ऑगस्ट २०१० ब्लॅकबेरीच्या संदर्भात काही महिन्यांमध्ये सुरू झालेला वाद आता भारत सरकार आणि ब्लॅकबेरी या दोघांनीही दोन पावले मागे घेण्याच्या घेतलेल्या भूमिकेमुळे काहीसा निवळला आहे. ब्लॅकबेरीने भारत सरकारला मर्यादित अॅक्सेस देण्याचे मान्य केले आहे आणि सरकारनेही पूर्ण अॅक्सेसचा लावून धरलेला मुद्दा सध्या मागे घेत या समस्येच्या उत्तरात सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला आहे.
|
सोमवार, ३० ऑगस्ट २०१० पाकिस्तानमध्ये पेशावरला अमेरिकन व्यापारी कचेरीजवळ आणि पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेच्या कार्यालयानजीक दहशतवाद्यांनी सुरक्षारक्षकांनाच ताब्यात घेतले होते. दहशतवाद्यांनी या सुरक्षा रक्षकांच्या बंदुकाच त्यांच्या दिशेने वळवल्या होत्या. मात्र लष्करी बळाच्या जोरावर अखेरीस या दहशतवाद्यांना शरण यावे लागले. पाकिस्तानी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवरून या दहशतवाद्यांचा विरोध हा परकीयांच्या मदतीला असायची शक्यता आहे.
|
शनिवार, २८ ऑगस्ट २०१० ऐंशीच्या दशकात हिंदी चित्रपटातला खलनायक हा सोन्याची तस्करी करणारा दाखविला जात असे. कालांतराने सोन्याच्या आयातीवरील र्निबध सैल झाले आणि सोन्याच्या तस्करीत काही ‘दम’ राहिला नाही. त्यामुळे तस्करीने आपला मोर्चा अमली पदार्थाच्या दिशेने वळवला. चित्रपटातला हा कलही बदलत गेला.
|
शुक्रवार, २७ ऑगस्ट २०१० पर्यावरणमंत्री जयराम रमेश सध्या भलतेच फॉर्मात आले असून पर्यावरण कायद्याचा आधार घेऊन त्यांनी रोज एकेक प्रकल्पांना कुलूप लावण्याचा सपाटा लावला आहे. आधी मंजूर झालेले काही प्रकल्पही जयराम रमेश यांच्या कचाटय़ात सापडले. रमेश यांची वक्रदृष्टी आपल्या राज्यावर पडेल की काय, या शंकेने अनेक राज्यांचे मुख्यमंत्री धास्तावले आहेत.
|
|
|
<< Start < Prev 1 2 Next > End >>
|
|
लोकरंग
‘चिनी ज्यादा’ !
अनिकेत साठे - रविवार, ५ सप्टेंबर २०१० ( sathe.aniket@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चिनी लष्कराच्या मुक्त संचारामुळे भारताची चिंता वाढली असून त्यामागे ‘ड्रॅगन’ची नेमकी काय चाल आहे, असा प्रश्न होतो. त्याचे उत्तर शोधताना हा विषय केवळ गिलगिटपुरताच मर्यादित नाही, तर त्याला विविध स्वरूपाचे कंगोरे असल्याचे लक्षात येते. अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून संरक्षण क्षेत्रात अफाट गुंतवणूक करणारा चीन सध्या जी पावले टाकतो आहे, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाही गर्भित इशारा देण्याचा भाग आहे. |
दिनदर्शिका
गुरुवार, ९ सप्टेंबर २०१०. मिती भाद्रपद शुद्ध प्रतिपदा १२ क. ०८ मि.पर्यंत. उत्तरा नक्षत्र २० क. ५१ मि.पर्यंत. कन्या चंद्र. सूर्योदय- ६।२६ सूर्यास्त- ६।४६ मेष - शत्रूंवर लक्ष ठेवा, वृषभ - मुलांचे प्रश्न सुटतील, मिथुन - घरात शांतता ठेवा, कर्क - छोटे-मोठे प्रवास होतील, सिंह - अचानक दडपण वाढतील, कन्या - महत्त्वाचे निर्णय घ्याल, तूळ - देवघेवीत चुका करू नका, वृश्चिक - पैसा हाती येईल, धनू - सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, मकर - प्रयत्न कारणी लागतील, कुंभ - अडचणींचा दिवस, मीन - शासकीय कामे होतील. शुभराशी : वृश्चिक / धनू / मकर
|