|
|
वृत्तान्त कॅम्पेन
प्रतिनिधी ,बुधवार, ८ सप्टेंबर २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सध्या टॅक्सी शोधण्यासाठी मुंबईकरांची वणवण होत आहे. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे टॅक्सी चालकांमध्ये बळावलेली भाडे नाकारण्याची प्रवृत्ती तसेच टॅक्सींच्या संख्येत घट होऊन अगदी ३० ते ३५ हजारांवर आलेली त्यांची संख्या याला कारणीभूत आहे.राज्य शासनाच्या लेखी आजही ५३ ते ५५ हजार टॅक्सी रस्त्यांवर धावत आहेत. प्रत्यक्षात मात्र मागील काही वर्षांत विविध कारणांमुळे त्यांची संख्या १५ ते २० हजारांनी कमी झाली आहे.
|
संजय बापट - मंगळवार, ७ सप्टेंबर २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
 अहमदाबाद-मुंबई, पुणे-अहमदाबाद, नाशिक-मुंबई अशा विविध मार्गाने मुंबईत येणाऱ्या किंवा बाहेर जाणाऱ्या वाहनांमुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर काशीमिरा ते बोरिवली दरम्यान होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कोटय़वधी रूपये खर्चाचा लांबलचक उड्डाणपूल बांधला जात आहे. मात्र या मार्गाच्या दोन्ही बाजुला असलेल्या सव्र्हिस रोडला अतिक्रमणांचा पडलेला विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असून त्याकडे पालिका, एमएमआरडीए अथवा सार्वजनिक बांधकाम विभाग यापैकी कोणाचेच लक्ष नाही.
|
शेखर जोशी, शुक्रवार, ३ सप्टेंबर २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सुशिक्षितांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीकरांची ओळख ‘सहनशील प्रवासी’ म्हणूनही आहे. शहरातील रिक्षाचालकांची मुजोरी, पदपथ आणि रेल्वेस्थानक परिसरात फेरीवल्यांनी केलेले अतिक्रमण आणि अन्यनागरी प्रश्न डोंबिवलीकर शांतपणे घेतात. हक्काची डोंबिवली लोकल मिळविण्यासाठीही डोंबिवलीकरांना अनेक वर्षे प्रतिक्षा करावी लागली होती.
|
कैलास कोरडे - बुधवार, १ सप्टेंबर २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
 झोपलेल्याला जागे करता येते. मात्र झोपेचे सोंग घेणाऱ्याला जागे करता येत नाही.. दादर स्थानकातील फलाट क्रमांक एक आणि दोनवर गैरसोयींमुळे प्रवाशांना होत असलेल्या त्रासाकडे मध्य रेल्वे सोयीस्कररीत्या काणाडोळा करीत आहे. येथील अरुंद फलाटांमुळे दररोज लाखो प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असूनही मध्य रेल्वेला त्याचे काहीएक सोयरसूतक नसल्याचे दिसत आहे.
|
प्रतिनिधी, शुक्रवार, २७ ऑगस्ट २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) विकासासाठी हाती घेतलेल्या रस्त्यांसह शहर, पूर्व व पश्चिम उपनगरांतील रस्त्यांच्या दुरुस्तीचा २० कोटी रुपयांचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने घाईघाईने मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे आणला आहे.
|
प्रतिनिधी / नाशिक ,शुक्रवार , २७ ऑगस्ट २०१०
शहरातील दवाखाने आणि रुग्णालयांच्या नोंदणी कामात वैद्यकीय विभागाने हात आखडता घेतल्याने नव्या रुग्णालयाच्या नोंदणीसह शेकडो जुन्या रुग्णालयांच्या प्रमाणपत्रांच्या नूतनीकरणाही ‘ब्रेक’ लागल्याच्या विषयावर ‘नाशिक वृत्तान्त’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर ही यंत्रणा कार्यप्रवण झाली असून जे काम गेल्या चार महिन्यांपासून रखडले होते,
|
अनधिकृत झोपडय़ांचा हा ढळढळीत पुरावा.. संजय बापट, गुरुवार, २६ ऑगस्ट २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मिठी नदी आणि वाकोला नाल्याचा सर्वागीण विकास केल्याचा दावा करणारे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण वास्तविक नदीला गाळात घालत आहे! नदीच्या दोन्ही बाजूंस सव्र्हिस रोडवर झोपडय़ांची झुंबड उडाली असून एमएमआरडीए मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भारतनगरमधून जाणाऱ्या वाकोला नाल्यावरही राजरोस झोपडय़ा उभारल्या जात आहेत.
|
प्रतिनिधी - बुधवार, २५ ऑगस्ट २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
 यंदाच्या म्हणजेच २०१०-११च्या रेल्वे अर्थसंकल्पात मध्य रेल्वेवरील परळसह सात स्थानकांसाठी नवे पादचारी पूल रेल्वे मंत्रालयाने मंजूर केले आहेत. करीरोड स्थानकात पादचारी पुलाची निकड असूनही त्या दृष्टीने मात्र मध्य रेल्वे प्रशासन कोणतीही पावले उचलताना दिसत नाही.
|
प्रतिनिधी - मंगळवार, २४ ऑगस्ट २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
 गणेशोत्सवापूर्वी मुंबई आणि उपनगरांतील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याची घोषणा मुंबई महापालिकेकडून जूनच्या अखेरीस करण्यात आली होती. मात्र गणेशोत्सव अवघ्या १७ दिवसांवर येऊन ठेपला असताना विविध ठिकाणच्या खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती हाती घेण्यात आलेली नाही. इतकेच नव्हे तर पालिका मुख्यालयाबाहेरील खड्डेमय झालेला रस्ता पालिकेला अद्याप दुरुस्त करण्यास वेळ मिळालेला नाही.
|
कैलास कोरडे, शुक्रवार, २० ऑगस्ट २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
अवघ्या साडेतीन वर्षांमध्ये ‘बेस्ट’ उपक्रमातर्फे राबविण्यात येत असलेल्या गो-मुंबई कार्ड योजनेचा पूर्णत: खेळखंडोबा झाल्यामुळे तिचा लाभ घेणाऱ्या ‘बेस्ट’च्या लाखो प्रवाशांचा अक्षरश: गोंधळ उडाला आहे. प्रवाशांचा रोष टाळण्यासाठी ‘बेस्ट’कडून पासाचे नूतनीकरण करण्यात येत आहे. मात्र पास काढण्यासाठी बस आगारांत पोहोचणाऱ्यांवर ‘पास नको त्रास आवरा’ अशी म्हणण्याची वेळ येत आहे.
|
बांधकामाच्या परवानगीची तारीख पे तारीख संजय बापट, गुरुवार, १९ ऑगस्ट २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
गेल्या दहा वर्षांपासून चर्चेत राहिलेल्या पेडररोड उड्डाणपुलाच्या कामी आता केंद्रीय पर्यावरण विभागाच्या नकारघंटेने अडथळा आणला आहे तर गेल्या सहा महिन्यांपासून या प्रकल्पाचा प्रस्तावही पाहण्यास पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळ नाही. परिणामी प्रकल्पाचा पाठपुरावा करणाऱ्या राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) पदरात केवळ तारीख पे तारीखच पडत आहेत. त्याचवेळी याच भागातील इमारतींच्या बांधकामाना मात्र सत्वर परवानगी मिळत आहे.
|
परिवहन विभागाला टॅक्सी उद्योगाचा संतप्त सवाल कैलास कोरडे - बुधवार, १८ ऑगस्ट २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
 परिवहन विभागाने शहरातील बोगस टॅक्सींविरोधात १३ ऑगस्ट रोजी राबविलेल्या मोहिमेअंतर्गत ‘एमएच-०१ एक्स-३२०६’ क्रमांकाची टॅक्सी जप्त केली. तपासणीदरम्यान टॅक्सीच्या इंजिन आणि कर पावतीवरील इंजिन क्रमांकामध्ये फरक असल्याचे आढळून आल्याबद्दल तसेच वाहनाची नोंदणी पुस्तिका (आर.सी.बुक) सादर न केल्याबद्दल भरारी पथकाने सदर टॅक्सीविरुद्ध कारवाई केली.
|
|
|
<< Start < Prev 1 2 Next > End >>
|
|
Page 1 of 2 |
|
लोकरंग
‘चिनी ज्यादा’ !
अनिकेत साठे - रविवार, ५ सप्टेंबर २०१० ( sathe.aniket@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चिनी लष्कराच्या मुक्त संचारामुळे भारताची चिंता वाढली असून त्यामागे ‘ड्रॅगन’ची नेमकी काय चाल आहे, असा प्रश्न होतो. त्याचे उत्तर शोधताना हा विषय केवळ गिलगिटपुरताच मर्यादित नाही, तर त्याला विविध स्वरूपाचे कंगोरे असल्याचे लक्षात येते. अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून संरक्षण क्षेत्रात अफाट गुंतवणूक करणारा चीन सध्या जी पावले टाकतो आहे, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाही गर्भित इशारा देण्याचा भाग आहे. |
दिनदर्शिका
दिनांक ८ सप्टेंबर २०१० बुधवार मिती श्रावण वद्य अमावस्या १६ क. ०० मि. पूर्वा नक्षत्र २३ क. ५० मि. सिंह चंद्र २९ क. ५ मि.पर्यंत. सूर्योदय- ६।२६ सूर्यास्त- ६।४७. दर्श अमावस्या पोळा. मेष - योजना वेग घेतील, वृषभ - घरगुती प्रश्नांवर लक्ष ठेवा, मिथुन - महत्त्वाची कामे होतील, कर्क - जबाबदाऱ्या पूर्ण कराल, सिंह - नवे तंत्र यशस्वी ठरेल, कन्या - विचाराने पावले उचला, तुला - अनेकांचे सहकार्य मिळेल, वृश्चिक - प्रिय व्यक्तींच्या भेटी, धनु - मोठी उलाढाल होईल, मकर - थांबा बघा पुढे चला, कुंभ - वेळ वाया घालवू नका, मीन - मार्ग सापडतील, यश मिळेल. शुभराशी- मिथुन, सिंह, तुला.
|