|
|
देश-विदेश
नवी दिल्ली, ७ सप्टेंबर/विशेष प्रतिनिधी भाजपच्या तीव्र निषेध आणि आक्षेपानंतरही आज माजी दूरसंचार सचिव पी. जे. थॉमस यांनी केंद्रीय दक्षता आयोगाच्या आयुक्तपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात प्रतिभाताई पाटील यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग, गृहमंत्री पी. चिदंबरम, विधी व न्यायमंत्री वीरप्पा मोईली यांच्या उपस्थितीत थॉमस यांना शपथ दिली.
|
नवी दिल्ली, ७ सप्टेंबर/विशेष प्रतिनिधी विरोधी पक्षांच्या दबावामुळे आज केंद्रीय मंत्रिमंडळाने नव्याने शत्रुसंपत्ती अध्यादेश काढण्याचे टाळले. नुकत्याच संपलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात युपीए सरकारला शत्रुसंपत्ती विधेयकावरून माघार घ्यावी लागली होती.
|
मेलबर्न, ७ सप्टेंबर/पीटीआय
महात्मा गांधी यांच्या ब्राँझच्या पुतळ्याचे ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातल्या न्यू साऊथ वेल्स विद्यापीठात अनावरण करण्यात आले. भारतीय व ऑस्ट्रेलियन यांच्यातील दृढ संबंधांचे प्रतिक म्हणून हा पुतळा उभारण्यात आला आहे. न्यू साऊथ वेल्स विद्यापीठाच्या ग्रंथालयाच्या हिरवळीवर हा पुतळा उभारण्यात आला आहे. भारत सरकारने हा पुतळा व पुस्तके सदर विद्यापीठाला भेट म्हणून दिली होती.
|
नवी दिल्ली, ७ सप्टेंबर/पी.टी.आय. कॅप्टन सुमित कोहली यांच्या जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या गूढ मृत्यूचा फेरतपास करण्याचे आदेश संरक्षणमंत्री ए.के.अॅण्टनी यांनी आज दिले. कोहली यांनी आत्महत्या केल्याचा लष्कर करीत असलेला दावा पूर्णपणे चुकीचा असून त्यांची हत्या करण्यात आली आहे,
|
रांची, ७ सप्टेंबर/पी.टी.आय. गेले तीन महिने राजकीय अस्थिरतेचा सामना करणाऱ्या झारखंडमध्ये पुन्हा एकदा राजकीय समीकरण जुळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आज सायंकाळी भाजपने राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी आपल्याकडे पुरेसे बहुमत असल्याचा दावा करीत राज्यपालांची भेट घेतली.
|
श्रीनगर, ७ सप्टेंबर/पी.टी.आय. संतप्त जमावाकडून दोन पोलीस ठाण्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्यांमुळे श्रीनगर परिसरात आज पुन्हा संचारबंदी लावण्यात आली. सुरक्षादलांकडून करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये चार जण ठार झाले होते.
|
लेह, ७ सप्टेंबर/पीटीआय आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी यंदा जास्तीत जास्त घुसखोरी करण्याचे प्रयत्न चालविले आहेत असे लष्कराच्या नॉर्दन कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल बी. एस. जयस्वाल यांनी आज सांगितले.
|
पेशावर, ७ सप्टेंबर/पी.टी.आय. पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांतातील विद्यापीठाच्या कुलगुरूंचे अज्ञात व्यक्तीकडून अपहरण करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुहम्मद अजमल खान असे त्यांचे नाव असून ते इस्लामिया विद्यापीठाचे कुलगुरू आहेत.
|
पेशावर, ७ सप्टेंबर/पीटीआय पाकिस्तानच्या खैबर या आदिवासी भागात तालिबानी बंडखोरांनी आज मुलींच्या दोन शाळा स्फोटके लावून उडवून दिल्या. फझलाबाद आणि मीर अफजल कलाय येथील प्राथमिक शाळा उडवून देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
|
विषारी दारू दुर्घटनेतील बळींची संख्या २३ मलप्पुरम (केरळ), ७ सप्टेंबर विषारी दारू प्राशन केल्याच्या घटनेत आणखी आठजण दगावल्यामुळे मृतांची संख्या २३ झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. मलप्पुरम जिल्ह्य़ातील कुट्टीपुरम येथे काल ही घटना घडली.
|
मानवतावादी दृष्टिकोनातून बिनशर्त सुटका, नऊ दिवसांचे अपहरणनाटय़ संपुष्टात लखिसराय, ६ सप्टेंबर /पी.टी.आय.
माओवाद्यांनी अपहृत केलेल्या तिघा पोलिसांना बिनशर्त सोडण्यात आले असून सुमारे नऊ दिवस चाललेले हे अपहरण नाटय़ आज अखेर संपुष्टात आले. बिहार राज्य पोलीस दलातील उपनिरिक्षक अभयप्रसाद यादव, रुपेशकुमार सिन्हा आणि बिहार मिलिटरी पोलीसशी संलग्न हवालदार एहसान खान यांची आज सुटका करण्यात आली. पाटणापासून १६५ किलोमीटर अंतरावरील चन्नान काजरा जंगल परिसर आणि लखिसराई जिल्ह्यातील डोंगराळ भागात सिमरा रारीजवळ त्यांना आज सकाळी सोडून देण्यात आले.
|
वॉशिंग्टन, ६ सप्टेंबर /पी.टी.आय.
मानवतावादी कामासाठी आपले सर्वस्व वाहून केवळ त्याच सेवाभावी वृत्तीने जीवन व्यतीत करणाऱ्या मदर टेरेसा यांना मानवंदना म्हणून काल अमेरिकेच्या टपाल खात्याने मदर टेरेसा यांचे टपाल तिकीट समारंभपूर्वक प्रसिद्ध केले. १९७९ मध्ये मदर टेरेसा यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. थॉमस ब्लॅकशेअर २ या नामवंत चित्रकारांनी चितारलेले मदर टेरेसा यांची चित्रकृती या स्टॅम्पसाठी घेण्यात आली आहे.
|
बंदिवासातील अनन्वित छळाचे ‘३०९६ दिवस’ लंडन, ६ सप्टेंबर / पीटीआय
ऑस्ट्रियातील एका कोवळ्या मुलीला एका मनोविकृत नराधमाने पळवून नेऊन तब्बल साडेआठ वर्षे आपल्या तळघरात कोंडून ठेवले. या प्रदीर्घ काळात तिला प्रचंड शारीरिक, मानसिक व लैंगिक छळाला सामोरे जावे लागले. अंगावर शहारे आणणारी ही कहाणी आता तिच्या आत्मकथेच्या रूपाने जगासमोर येत आहे. नताशा कांपुश नावाच्या या मुलीने लिहिलेले ‘३०९६ डेज’ नावाचे हे पुस्तक तिची थरारक कहाणी कथन करणार आहे.
|
नवी दिल्ली, ६ सप्टेंबर/विशेष प्रतिनिधी
काँग्रेस पक्ष आणि केंद्रातील सरकार यांच्यात कोणताही दुरावा नाही, अशी ग्वाही आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिली. संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल करण्याचे संकेत देताना मनमोहन सिंग यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांचे सरासरी वय कमी करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले. मात्र, आपण निवृत्त होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
|
मल्लापूरम, ६ सप्टेंबर /पी.टी.आय.
केरळमधील मल्लापूरम जिल्ह्यात विषारी दारू पिऊन १४ जणांचा बळी गेला असून कुट्टिपूरम भागात पाच जण मरण पावले. तर ही संख्या अजूनही वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन यांनी न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या घटनेने कुट्टिपूरम भागातील संतप्त नागरिकांनी दारुविक्रीच्या दुकानांवर हल्ले करून दुकानांची जाळपोळ केली.
|
नवी दिल्ली, ६ सप्टेंबर/विशेष प्रतिनिधी दूरसंचार सचिव असताना साठ हजार कोटींच्या स्पेक्ट्रम घोटाळ्याला पाठिशी घालणारे पी. के. थॉमस यांची केंद्रीय दक्षता आयोगाच्या आयुक्तपदी झालेल्या नियुक्तीचा भाजपने आज तीव्र निषेध केला.
|
काबूल, ६ सप्टेंबर/एएफपी अफगाणिस्तान दूरचित्रवाणीचे आघाडीचे पत्रकार आणि राजकीय कार्यकर्ते सईद हमीद नुरी यांची त्यांच्या राहात्या घराजवळ रविवारी भोसकून हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. नुरी हे अफगाणिस्तानच्या ‘नॅशनल जर्नालिस्ट असोसिएशन’चे उपाध्यक्ष होते. काल, रविवारी रात्री उशिरा सुरीने भोसकून त्यांना ठार मारण्यात आले.
|
पेशावर, ६ सप्टेंबर/पीटीआय
स्फोटकांनी भरलेले वाहन पोलीस ठाण्यात घुसवून एका आत्मघातकी मानवी बॉंम्बने केलेल्या स्फोटात ५५ जण ठार झाले. मृतांमध्ये ११ पोलीस कर्मचारी आणि चार शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे.वायव्य पाकिस्तानमधील खैबर-पख्तूनवाला प्रांतात महत्त्वाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लक्की मारवत येथील मुख्य पोलीस ठाण्यात आज सकाळी हा स्फोट करण्यात आला.
|
नवी दिल्ली, ६ सप्टेंबर/पीटीआय
गुजरातमधील सुप्रसिद्ध अक्षरधाम मंदिरावर २००२ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्या आदमभाई सुलेमान आणि अब्दुल कय्युम मुफ्ती या दोन दहशतवाद्यांच्या मृत्युदंडाच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली.ही स्थगिती देतानाच न्या. बी सुदर्शन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सीबीआय आणि गुजरात सरकारला, त्यांनी दाखल केलेल्या आव्हान याचिकेसंदर्भात नोटीस बजावली आहे.
|
नवी दिल्ली, ६ सप्टेंबर/विशेष प्रतिनिधी गोवा मुक्ती आंदोलन आणि महाराष्ट्र एकीकरणाच्या आंदोलनात सक्रिय भूमिका बजावणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष, स्वातंत्र्य संग्राम सैनिक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने येत्या २४ सप्टेंबर रोजी त्यांच्यावर काढण्यात आलेल्या टपाल तिकीटाचे प्रकाशन करण्यात येईल.
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 Next > End >>
|
|
लोकरंग
‘चिनी ज्यादा’ !
अनिकेत साठे - रविवार, ५ सप्टेंबर २०१० ( sathe.aniket@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चिनी लष्कराच्या मुक्त संचारामुळे भारताची चिंता वाढली असून त्यामागे ‘ड्रॅगन’ची नेमकी काय चाल आहे, असा प्रश्न होतो. त्याचे उत्तर शोधताना हा विषय केवळ गिलगिटपुरताच मर्यादित नाही, तर त्याला विविध स्वरूपाचे कंगोरे असल्याचे लक्षात येते. अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून संरक्षण क्षेत्रात अफाट गुंतवणूक करणारा चीन सध्या जी पावले टाकतो आहे, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाही गर्भित इशारा देण्याचा भाग आहे. |
दिनदर्शिका
दिनांक ८ सप्टेंबर २०१० बुधवार मिती श्रावण वद्य अमावस्या १६ क. ०० मि. पूर्वा नक्षत्र २३ क. ५० मि. सिंह चंद्र २९ क. ५ मि.पर्यंत. सूर्योदय- ६।२६ सूर्यास्त- ६।४७. दर्श अमावस्या पोळा. मेष - योजना वेग घेतील, वृषभ - घरगुती प्रश्नांवर लक्ष ठेवा, मिथुन - महत्त्वाची कामे होतील, कर्क - जबाबदाऱ्या पूर्ण कराल, सिंह - नवे तंत्र यशस्वी ठरेल, कन्या - विचाराने पावले उचला, तुला - अनेकांचे सहकार्य मिळेल, वृश्चिक - प्रिय व्यक्तींच्या भेटी, धनु - मोठी उलाढाल होईल, मकर - थांबा बघा पुढे चला, कुंभ - वेळ वाया घालवू नका, मीन - मार्ग सापडतील, यश मिळेल. शुभराशी- मिथुन, सिंह, तुला.
|