मुखपृष्ठ >> महाराष्ट्र
 


स्पर्धेचे नियम व अटी




महाराष्ट्र
शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा पैसा पोहोचत नाही Print E-mail
राहुल गांधी यांची खंत
अकोला, ७ सप्टेंबर/वार्ताहर

तळागाळातील लोकांच्या गरजा ओळखून सरकारच्या योजना आखण्याची गरज अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांंच्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत खासदार मीनाक्षी नटराजन, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.व्यंकट मायंदे उपस्थित होते.खासदार राहुल गांधी यांचा दौरा अराजकीय होता.
 
ते आले आणि त्यांनी जिंकले.. Print E-mail
सचिन देशपांडे ,अकोला, ७ सप्टेंबर
राजकारणातील बडय़ा बडय़ा नेत्यांना आपण राहूल गांधी यांच्याशी थेट भेट घ्यावी, अशी मनोमन इच्छा असते तर राहुल गांधी यांना पाहण्याची अनेकांना हौस असते. युवक वर्गात ते सर्वाधिक लोकप्रिय आहेत. त्यांच्या भेटीसाठी अनेकांनी आज रांगा लावल्या होत्या पण, त्यांनी या राजकीय नेते मंडळींपासून दूर जात थेट गरिबाच्या घरात प्रवेश केला.
 
शाळांच्या ‘मास्टर प्लॅन’साठी आता घेणार उपग्रहाची मदत! Print E-mail
पुणे, ७ सप्टेंबर/विशेष प्रतिनिधी
गेल्या नऊ वर्षांपासून रेंगाळलेला राज्यातील शाळांचा बृहत्आराखडा (मास्टर प्लॅन) तयार करण्यासाठी आता उपग्रहाची मदत घेण्यात येणार असून येत्या डिसेंबपर्यंत तो तयार होण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत.
 
पुण्यातील सनदी लेखापालाचा ठाण्यात अपघाती मृत्यू Print E-mail
पुणे, ७ सप्टेंबर / प्रतिनिधी
ठाण्याच्या कार्यालयामध्ये कागदपत्रे जमा करण्यासाठी निघालेल्या पुण्यातील सनदी लेखापालाचा मुलुंड स्थानकाजवळ धावत्या एक्सप्रेसमधून पडून मृत्यू झाला.  मकरंद बारटक्के (वय २७, रा. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या सनदी लेखापालाचे नाव आहे.
 
खानाव-उसर परिसरातील सातबारा उताऱ्यांवरील आरक्षण नोंदी रद्द Print E-mail
माजी आमदार मधुकर ठाकूर यांचा यशस्वी पाठपुरावा
अलिबाग, ७ सप्टेंबर / प्रतिनिधी

अलिबाग तालुक्यांतील उसर, खानाव, कुणे, मल्याण परिसरातील शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यांवर, ‘महाराष्ट्र शासनाच्या प्रकल्पासाठी राखीव’ अशा नोंदींचा उल्लेख असलेला शिक्का जमीन प्रकल्पासाठी नको असतानाही ठेवल्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी
 
उरण मेट्रो सेंटर कार्यालयातील अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल Print E-mail
उरण, ७ सप्टेंबर
उरण परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना महत्त्वाची कागदपत्रे उपलब्ध करून देणाऱ्या येथील मेट्रो सेंटर कार्यालयात गेल्या नऊ महिन्यांपासून कायमस्वरूपी विशेष भू-संपादन अधिकारीच नाही. यामुळे सिडको, जेएनपीटी प्रकल्पग्रस्त ३८ गावांतील नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.
 
‘संभ्रमित वातावरणात दिशा दाखविणारी ‘आजी’संस्था काळाच्या पडद्याआड’ Print E-mail
वसई, ७ सप्टेंबर
सभोवताली बौद्धिक व भावनिक प्रदूषणामुळे संभ्रमित करणारे वातावरण निर्माण झाले असून, अनुभवातून दिशा देणारी ‘आजी’ ही संस्था काळाच्या पडद्याआड गेली आहे. कुटुंबापासून माणसे दुरावत आहेत, अशा परिस्थितीत पालक व शिक्षकांची जबाबदारी वाढली असून, विद्यार्थ्यांनीही स्वत:चा शोध घेत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, आपला भविष्याचा मार्ग निवडावा,
 
रत्नागिरी जिल्ह्यात देशव्यापी संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद Print E-mail
रत्नागिरी, ७ सप्टेंबर
अर्निबध महागाई, नोकरकपात व बेरोजगारीला चालना देणाऱ्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात केंद्रीय संघटनांसह राज्यातील सर्व कामगार-कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आजच्या देशव्यापी संपाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
 
‘वसईतील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार’ Print E-mail
वसई, ७ सप्टेंबर
येथील सुखसंपत्ती संवर्धक सहकारी सोसायटी लि.तर्फे गार्गी बायोटेक, पुणे तसेच पाटील बायोटेक जळगाव यांच्या सहकार्याने अलीकडेच शेतकरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
 
गणेशोत्सवानिमित्त रेल्वे, बस स्थानकावर आरोग्य यंत्रणा कार्यरत Print E-mail
सावंतवाडी, ७ सप्टेंबर/ वार्ताहर
गणेश चतुर्थी सणासाठी सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमानी मंडळीची आरोग्य तपासणी करण्यासाठी रेल्वे व बस स्थानकावर आरोग्य यंत्रणा कार्यरत झाली आहे.गणेश चतुर्थीसाठी मुंबई-पुण्यासारख्या शहरातून चाकरमानी सिंधुदुर्गात येण्यास प्रारंभ झाला आहे.
 
वृक्षतोडीविरोधात आता जनहित याचिका Print E-mail
संगमेश्वर, ७ सप्टेंबर/ वार्ताहर
कोकणातील वृक्षतोडीविरोधात पुरोगामी युवक संघटनेसह सह्याद्री बचाव समितीने उघडलेल्या मोहिमेतून वृक्षतोडीवर काही काळासाठी आळा बसला खरा, परंतु आता शासनाच्या आदेशातून पळवाटा काढीत परवान्यांचे दामदुप्पट भाव घेऊन वितरण सुरू झाल्याने, या वृक्षतोडीविरोधात आता जनहित याचिकाच दाखल करणार असल्याची माहिती पुरोगामी युवक संघटनेच्या संजीव अणेराव यांनी दिली आहे.
 
औद्योगिक वसाहतीत संघटित कामगार संपावर, कंत्राटी कामावर Print E-mail
चिपळूण, ७ सप्टेंबर/ वार्ताहर
केंद्र सरकारच्या कामगार हितविरोधी धोरणाचा, वाढत्या महागाईबाबत कोणतेच कृतीयुक्त धोरण न राबवल्याचा निषेध म्हणून पुकारलेल्या देशव्यापी संपामध्ये चिपळूण पं, समिती कार्यालयीन कर्मचारी, महाराष्ट्र वीज मंडळ कर्मचारी फेडरेशनच्या कामगारांनी जोरदार मोर्चा काढून निषेध नोंदवला.
 
‘वैदूंना प्राथमिक रुग्णालयाचे प्रशिक्षण द्यावे’ Print E-mail
सावंतवाडी, ७ सप्टेंबर/ वार्ताहर
वैदूंना आधुनिक वैदिक शास्त्राच्या प्रवाहात आणून प्राथमिक रुग्णालयाचे प्रशिक्षण द्यावे. मानधन किंवा त्यांना पेन्शन देऊन आजीबाईचा बटवा अधिक सक्षम करण्याची गरज वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. नागेश टेकाळे यांनी व्यक्त केली.
 
नेचर फ्रेण्ड्सच्या तालुका अध्यक्षपदी नितीन जोशी Print E-mail
पनवेल, ७ सप्टेंबर/ प्रतिनिधी
पर्यावरण व वन्य प्राणी संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या नेचर फ्रेण्ड्स संस्थेची पनवेल तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून, त्यामध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी मनीषा दळवी, तर पनवेल तालुका अध्यक्षपदी नितीन जोशी यांची नियुक्ती अध्यक्ष शिवकुमार सूर्यवंशी, कार्याध्यक्षा वंदना मोरे व रायगड जिल्हाध्यक्ष फैसल पोपेरे यांनी केली.
 
महागाईविरोधातील संपाला महाडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद Print E-mail
महाड, ७ सप्टेबर / वार्ताहर
शासनाचे कामगारविरोधी धोरण आणि महागाईच्या विरोधांत सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला महाड पोलादपूर तालुक्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपामुळे सरकारी कार्यालयांतील कामकाज ठप्प झाले होते.
 
दापोली अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. प्रशांत मेहता तर उपाध्यक्षपदी गजानन पेठे Print E-mail
दापोली, ७ सप्टेंबर / खास प्रतिनिधी
दापोली अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी दापोलीतील प्रसिद्ध सर्जन डॉ. प्रशांत मेहता यांची तर उपाध्यक्षपदी गजानन पेठे यांची एकमताने निवड करण्यात आली. बँकेच्या प्रधान कार्यालयात अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया प्राधिकृत अधिकारी सहकारी संस्था सहायक निबंधक पी.एम. मालगावे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
 
आदिवासी मुलांना अळ्यांची ‘ट्रीट’ Print E-mail
पनवेल, ७ सप्टेंबर/ प्रतिनिधी
खांदा कॉलनी येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहामध्ये आसरा घेणाऱ्या राज्यभरातील सुमारे १७५ आदिवासी विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण मिळत असतानाच सोमवारी अळ्यांची ‘ट्रीट’ मिळाल्याने खळबळ उडाली.
 
देवरुख डी-कॅडमध्ये बीएफए अभ्यासक्रमाला सुरुवात Print E-mail
देवरुख, ७ सप्टेंबर/वार्ताहर
देवरुखच्या डी-कॅड चित्रकला महाविद्यालयात बीएफए ड्रॉइंग व पेंटिंग विषयाच्या प्रथमवर्ष अभ्यासक्रमाला नुकताच प्रारंभ करण्यात आला. डी-कॅड महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाची मान्यता मिळाली असून, त्या पाश्र्वभूमीवर हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.
 
पोलादपूर बँक ऑफ इंडिया शाखेत वर्धापनदिन साजरा Print E-mail
महाड, ७ सप्टेंबर / वार्ताहर
राष्ट्रीयकृत बँक ऑफ इंडियाच्या पोलादपूर शाखेत बँकेचा १०५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ग्रामीण भागांतील शेतकऱ्यांसाठी असलेल्या कृषी सहाय्य योजना बेरोजगारांसाठी असलेल्या योजनांची माहिती देण्यात आली.
 
कुडाळात ‘लालबागचा राजा’च्या धर्तीवर सिंधुदुर्गचा राजा Print E-mail
सावंतवाडी, ७ सप्टेंबर/ वार्ताहर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे खासदार डॉ. नीलेश राणे यांच्या प्रेरणेतून ‘सिंधुदुर्गचा राजा’ अवतरणार आहे. लालबागच्या गणेशोत्सव धर्तीवर मूर्ती स्थापन करून सार्वजनिक गणेश उत्सवात अधिक आनंद देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 Next > End >>

ताज्या बातम्या



लोकरंग

‘चिनी ज्यादा’ !

अनिकेत साठे - रविवार, ५ सप्टेंबर २०१०
( sathe.aniket@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चिनी लष्कराच्या मुक्त संचारामुळे भारताची चिंता वाढली असून त्यामागे ‘ड्रॅगन’ची नेमकी काय चाल आहे, असा प्रश्न होतो. त्याचे उत्तर शोधताना हा विषय केवळ गिलगिटपुरताच मर्यादित नाही, तर त्याला विविध स्वरूपाचे कंगोरे असल्याचे लक्षात येते. अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून संरक्षण क्षेत्रात अफाट गुंतवणूक करणारा चीन सध्या जी पावले टाकतो आहे, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाही गर्भित इशारा देण्याचा भाग आहे.

दिनदर्शिका

दिनांक ८ सप्टेंबर २०१० बुधवार मिती श्रावण वद्य अमावस्या १६ क. ०० मि. पूर्वा नक्षत्र २३ क. ५० मि. सिंह चंद्र २९ क. ५ मि.पर्यंत. सूर्योदय- ६।२६ सूर्यास्त- ६।४७. दर्श अमावस्या पोळा.
मेष -
योजना वेग घेतील, वृषभ - घरगुती प्रश्नांवर लक्ष ठेवा, मिथुन - महत्त्वाची कामे होतील, कर्क - जबाबदाऱ्या पूर्ण कराल, सिंह - नवे तंत्र यशस्वी ठरेल, कन्या - विचाराने पावले उचला, तुला - अनेकांचे सहकार्य मिळेल, वृश्चिक - प्रिय व्यक्तींच्या भेटी, धनु - मोठी उलाढाल होईल, मकर - थांबा बघा पुढे चला, कुंभ - वेळ वाया घालवू नका, मीन - मार्ग सापडतील, यश मिळेल.
शुभराशी- मिथुन, सिंह, तुला.