मुखपृष्ठ >> आरोग्य आणि वैद्यकीय
 


स्पर्धेचे नियम व अटी




आरोग्य आणि वैद्यकीय
वैद्यकाच्या दाही दिशा : ताई ची आणि ची गाँग Print E-mail
डॉ. उल्हास कोल्हटकर ,गुरुवार, २६ ऑगस्ट २०१०
चीनच्या सुंग घराणे राज्यातील (इ. स. ९६० ते १२७९) चँग सॅन फेंग नावाच्या टाओपंथीय, मार्शल आर्ट प्रवीण मुनीची ही गोष्ट! (कदाचित कल्पितही असू शकेल!) त्याने एकदा प्रचंड सारस पक्ष्याची व एका सर्पाची लढाई पाहिली. ज्या लवचिकतेने, सफाईने व गतीने त्या छोटय़ाशा सर्पाने त्याच्याहून खूप मोठय़ा व ताकदवान सारस पक्षाशी लढत दिली, स्वसंरक्षण केले व योग्यवेळी चपळतेने, आक्रमण करून शेवटी त्याचा पराभव केला,
 
वैद्यकाच्या दाही दिशा : श्वासोपचारांची न्यारी दुनिया Print E-mail
डॉ. उल्हास कोल्हटकर ,गुरुवार, २२ जुलै २०१०
‘दमा’ हा श्वसनाचा विकार आहे हे आपणास सहजगत्या उमगते; पण सतत दमल्यासारखे वाटते हे ‘चुकीच्या श्वसनामुळे’ असू शकेल हे आपल्या लक्षात येणे जरा कठीण आहे. ‘स्पाँडिलायटीस’ किंवा ‘स्लिप डिस्क’मुळे मान, पाठ दुखते हे आपणास माहीत असते; पण श्वासाचा आकृतीबंध बिघडल्यामुळेही असे होऊ शकते, असे कोणी आपणास सांगितले तर ते खरे वाटणार नाही. मनोविकृतींमुळे नैराश्य व नाहक चिंता निर्माण होतात हे आपण वाचलेले असते; पण श्वसनतंत्र बिघडल्यानेही ते निर्माण होऊ शकतात हे आपल्या गावीही नसते;
 
वैद्यकाच्या दाही दिशा : उपचारांची नवी क्षितीजे 'ऊर्जावैद्यक' Print E-mail
डॉ. उल्हास कोल्हटकर, गुरुवार, ८ जुलै २०१०
सर्वसाधारणपणे उपचार म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर गोळ्या, औषधे, शल्यक्रिया, मसाज, लेप, व्यायाम, आहार-विहाराची पथ्ये, किरणोपचार, मानसोपचार, समुपदेशन या व अशा काही ठोस गोष्टी डोळ्यासमोर येतात. पण कोणी नुसते आपले हात हातात घेऊन किंवा स्पर्श करून किंवा शरीराभोवती काही हातवारे करून आपल्याला बरे करतो म्हणाला तर आपल्याला निश्चितच चमत्कारीक वाटेल.
 
वैद्यकाच्या दाही दिशा : अस्तित्वाचे हार्डवेअर सांभाळा.. Print E-mail
डॉ. उल्हास कोल्हटकर ,गुरुवार, २४ जून २०१०
विविध व्याधी विकारांवर उपलब्ध असलेल्या उपचारपद्धतींकडे एक धावती नजर टाकली तरी त्यांचे अधिष्ठान फार पूर्वीच्या काळी फक्त ‘देह’ हेच होते उदा. मसाज, सांधे व मऊ उती यांच्या मसाजावर अधिष्ठित चिनी उपचारपद्धत टय़ुइना (Tuina) इ. व आता त्या अधिकाधिक ‘मना’धिष्ठित होत चालल्या आहेत. उदा. डॉ. बारव पुष्पोपचार पद्धती इ. हे सहज लक्षात येते. वास्तविक अस्तित्वाचे दोन्ही आयाम ‘मन’ व ‘देह’ हे महत्त्वाचे आहेत, परस्परावलंबी आहेत व कोणत्याही व्याधी विकारात दोघांवर उपचार महत्त्वाचे असतात हे विसरून चालणार नाही.
 
सायलंट किलर ‘हिपेटायटिस सी’पासून सावधान Print E-mail
सुहास धुरी
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सायलंट किलर म्हणून ओळखला जाणारा हिपेटायटिस सी हा आजार दिवसेंदिवस घातक होत चालला असून याबाबत निष्काळजी केल्यास तो थेट मृत्यूच्या दाढेत तो घेऊन जाऊ शकतो अशी भीती जसलोक आणि फोर्टिस रुग्णालयाच्या कन्सल्टिंग हेपॅटोलॉजिस्ट आणि गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. आभा नगराल यांनी व्यक्त केली आहे. इन्सालच्या अभ्यासानुसार  एचसीव्ही चा प्रसार हा भारतात अधिक वेगाने होत असून दरवर्षी एक लाखाहून अधिक लोकांना याची लागन होत आहे.
 
वैद्यकाच्या दाही दिशा : उपचारांच्या वेगळ्या वाटा.. अलेक्झांडर फेल्डेनक्रेस रोल्फिंग तंत्रे Print E-mail
डॉ. उल्हास कोल्हटकर , गुरुवार, १० जून २०१०
तो १९ व्या शतकाच्या उत्तरार्धातील, रंगभूमीवरील एक नामवंत शेक्सपिअरिअन नट! त्याच भांडवल म्हणजे त्याचा अवाज, पण तोच हळूहळू बसत एक दिवस नाहीसा होतो. सर्व प्रकारचे उपचार तो करून पाहातो; पण कशाचाच उपयोग होत नाही. मग एक दिवस आरशासमोर उभे राहून सराव करताना, संवाद फेकताना आपले शरीर नको एवढे ताठरते हे  त्याच्या लक्षात येते आणि तो हळूहळू शरीरातील विविध स्नायूंमधील हा तणाव प्रयत्नपूर्वक काढून टाकतो आणि एक दिवस, अहो आश्चर्यम्, त्याचा आवाज चक्क पूर्ववत होतो!
 
वैद्यकाच्या दाही दिशा : ‘देही’ असो द्यावे समाधान.. Print E-mail
डॉ. उल्हास कोल्हटकर ,गुरुवार, २० मे २०१०
‘चित्ती असो द्यावे समाधान’ या संतवचनाला अनुसरून आणि अगदी आधुनिक चेतावैद्यकाच्या सिद्धांतानुसारही, शरीरस्वास्थ्याकरिता मानसिक समाधान असणे अत्यावश्यक असते. तसे असेल तर शरीरात अनेक प्रकारची पोषक चेतारसायने उदा. आनन्दामाईड्स निर्माण होऊन एकप्रकारची ‘फील गुड’ भावना तर निर्माण होतेच, पण रक्तदाब, रक्तशर्करा पातळी नियमनापासून ते विविध संप्रेरकांचा समतोल साधण्यापर्यंत अनेक गोष्टी साध्य होतात.
 
वैद्यकाच्या दाही दिशा : ‘प्रतिमा’तंत्र Print E-mail
डॉ. उल्हास कोल्हटकर ,गुरुवार, ६ मे २०१०
अमेरिकेतील टेक्सास विश्वविद्यालयातील क्ष-किरण चिकित्सक डॉ. ओ. कार्ल सिमॉनटन यांनी १९७१ साली वर्णन केलेल्या ६१ वर्षांच्या घशाच्या असाध्य कर्करोगाने ग्रस्त रुग्णाची ही कहाणी ‘शरीर-मन वैद्यकाच्या’ इतिहासात एक नवीन अध्याय सुरू करण्यास कारणीभूत ठरली असं म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. या रुग्णाचा कर्करोग हा अंतिम अवस्थेत होता, त्याला गिळताही येत नव्हते,
 
क्षयरोग Print E-mail
अलकनंदा सुळे - बुधवार, २८ एप्रिल २०१०
डॉ. चित्ररेखा कुलकर्णी

एखाद्या गोष्टीचा क्षय होणे म्हणजे नाश होणे असे आपण समजतो. तसेच क्षयरोगाचा संसर्ग आपल्या शरीरातील निरनिराळय़ा अवयवांना झाल्यास त्यातील पेशींचा नाश होऊन रसग्रंथी व आवरण यांचा क्षय होतो. क्षय हा आजार संसर्गजन्य असून पूर्वी तो गुरांकडून संसर्गित होतो असे समजले जात असे. पूर्वीच्या काळी क्षय हा जीवघेणा आजार होता. त्यास राजयक्ष्मा असे संबोधिले जायचे. तसेच क्षय हा दीर्घकाळ चालणारा आजार असून फक्त फुफ्फुसाचा रोग समजला जायचा. परंतु तो इतर अवयवांनासुद्धा बाधा करू शकतो.
 
वैद्यकाच्या दाही दिशा : ।। जैवप्रतिज्ञापन।। Print E-mail
डॉ. उल्हास कोल्हटकर ,गुरुवार, १५ एप्रिल २०१०
सुमारे ५ दशकांपूर्वी अमेरिकेतील कान्सास येथील ‘मेनिन्जर फाऊंडेशन’च्या प्रेक्षकांसमोर एक अद्भूत प्रयोग सादर झाला. सन १९६२ मध्ये डॉ. शर्न यांनी एक विशिष्ट तंत्र वापरून (Operant Training) हृदयाचे ठोके साधारण ५ मिनिटांइतके वाढविता वा कमी करता येतात हे दाखविले होते. पण मेनिन्जर फाऊंडेशनमधील प्रयोगात, त्या व्यक्तीने आपल्या हृदयाचे ठोके चक्क प्रतिमिनिट ३५० पर्यंत वाढविले (Atrial Flutter) व एका क्षणी तर या व्यक्तीचे हृदय पूर्णपणे थांबले व नंतर परत पूर्ववत झाले.
 
वैद्यकाच्या दाही दिशा : पूर्णोपचार (होलिस्टिक मेडिसिन) Print E-mail
डॉ. उल्हास कोल्हटकर ,गुरुवार, १ एप्रिल २०१०
डॉ. मॅकगिनिस आणि डॉ. फोजी यांनी १९९३ सालच्या ‘जामा’मध्ये (जर्नल ऑफ दी अमेरिकन मेडिकल असोसिएशन) एक लेख लिहून त्या काळातील अमेरिकेतील मृत्यूस कारणीभूत होणाऱ्या अशा दहा प्रमुख व्याधी विकारांचा मागोवा घेतला होता. त्यांच्या मते वरकरणी यात जरी कर्करोग, हृदयविकार, मधुमेह व एड्स असे रोग दिसत असले
 
प्रोजेरिया - वृद्धत्वाच्या पेहरावातील बालपण Print E-mail
रमेश महाजन - बुधवार, ३१ मार्च २०१०
अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘पा’ चित्रपटाचा विषय प्रोजेरिया या दुर्मीळ जनुकव्याधीशी निगडित आहे. अमिताभ बच्चनसारख्या प्रतिभावान कलाकाराकडून व्याधिग्रस्त मुलाची भूमिका साकारत असल्याने लोकांच्या मनात व्याधीबद्दल कुतूहलही आहे. एकंदरीतच जनुकव्याधींबद्दल लोकांचा दृष्टिकोन सकारात्मक आणि समजूतदार असावा, या दृष्टीने चित्रपटाचे वेगळे महत्त्व आहेच.
 


ताज्या बातम्या



लोकरंग

‘चिनी ज्यादा’ !

अनिकेत साठे - रविवार, ५ सप्टेंबर २०१०
( sathe.aniket@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चिनी लष्कराच्या मुक्त संचारामुळे भारताची चिंता वाढली असून त्यामागे ‘ड्रॅगन’ची नेमकी काय चाल आहे, असा प्रश्न होतो. त्याचे उत्तर शोधताना हा विषय केवळ गिलगिटपुरताच मर्यादित नाही, तर त्याला विविध स्वरूपाचे कंगोरे असल्याचे लक्षात येते. अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून संरक्षण क्षेत्रात अफाट गुंतवणूक करणारा चीन सध्या जी पावले टाकतो आहे, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाही गर्भित इशारा देण्याचा भाग आहे.

दिनदर्शिका

दिनांक ८ सप्टेंबर २०१० बुधवार मिती श्रावण वद्य अमावस्या १६ क. ०० मि. पूर्वा नक्षत्र २३ क. ५० मि. सिंह चंद्र २९ क. ५ मि.पर्यंत. सूर्योदय- ६।२६ सूर्यास्त- ६।४७. दर्श अमावस्या पोळा.
मेष -
योजना वेग घेतील, वृषभ - घरगुती प्रश्नांवर लक्ष ठेवा, मिथुन - महत्त्वाची कामे होतील, कर्क - जबाबदाऱ्या पूर्ण कराल, सिंह - नवे तंत्र यशस्वी ठरेल, कन्या - विचाराने पावले उचला, तुला - अनेकांचे सहकार्य मिळेल, वृश्चिक - प्रिय व्यक्तींच्या भेटी, धनु - मोठी उलाढाल होईल, मकर - थांबा बघा पुढे चला, कुंभ - वेळ वाया घालवू नका, मीन - मार्ग सापडतील, यश मिळेल.
शुभराशी- मिथुन, सिंह, तुला.