|
|
सुहास बहुळकर - रविवार ५ सप्टेंबर २०१०
 व्यक्तिचित्रणकला हे महाराष्ट्राचे वैशिष्टय़ मानले जाते. चित्रकार कै. गोपाळराव देऊस्कर (१९११-१९९४) हे या परंपरेतील एक अत्यंत महत्त्वाचे चित्रकार होते व ते त्यांच्या अत्यंत दर्जेदार अशा व्यक्तिचित्रांसोबतच त्यांच्या अफलातून व्यक्तिमत्त्वाबद्दलही प्रसिद्ध होते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात त्यांच्या नावाचा फार मोठा दबदबा होता. राजे-रजवाडे, संस्थानिक, राजकारणी, उद्योगपतीच नव्हे तर त्यांनी बालगंधर्वापासून ते पु.ल. देशपांडेंपर्यंत अनेक व्यक्तिचित्रे रंगविली आहेत.
|
|
कुमार केतकर , रविवार, २९ ऑगस्ट २०१०
सवंग सुख ही संस्कृती अधिकाधिक सत्ता हे साध्य, नीतिनिरपेक्ष स्पर्धा हे साधन अशा कोलाहलाने भरलेल्या वर्तमानात वैचारिकतेचा संकोच होतोय. मुक्त विचारांशी शत्रुत्व म्हणजे हुकूमशाहीला अन् झुंडशाहीला आमंत्रण. ही वेळ आहे विचारांचे जागरण करण्याची. म्हणून वेद - उपनिषदांपासून फुले - आगरकरांपर्यंत, सॉक्रेटीस - प्लेटोपासून चॉम्स्की - डेरिडापर्यंत पूर्व - पश्र्िचमेतील प्रमुख विचारवंतांचा आणि त्यांनी मांडलेल्या विचारधारांचा वेध घेणारे हे पुस्तक एखादे पुस्तक लिहिणे हेही कधीकधी धाडस असते. अगदी हिमालयाचे शिखर चढून जाण्याइतके वा अॅमेझॉनच्या घनदाट जंगलात घुसून, कुणाच्याही मदतीशिवाय तेथील वनस्पती व प्राणीसृष्टीचा अभ्यास करण्याइतके. प्रा.डॉ. केशव रंगनाथ शिरवाडकर हे असेच धाडसी शोधयात्री आहेत.
|
श्रीकांत लागू - रविवार, २२ ऑगस्ट २०१०
रोहन प्रकाशनातर्फे प्रसिध्द होत असलेल्या सत्यजित रे यांच्या फेलुदा या गुप्तहेर मालिकेतील १२ पुस्तकांचं भाषांतर अशोक जैन यांनी केलं आहे. पक्षाघातामुळं शरीरानं विकल झालेल्या आणि रुग्णशय्येला खिळलेल्या अशोक जैन यांनी महात्मा गांधींच्या नातवाचं ‘कस्तुरबा’, पी. एन. धर यांचं ‘इंदिरा गांधी आणि आणीबाणी’, ‘बिझनेस लिजंड’, लगान सिनेमाच्या निर्मितीवरचं सत्यजीत भटकळ यांचं ‘एका स्वप्नाचा प्रवास’, बिशन टंडन या तत्कालीन पंतप्रधानांच्या कार्यालयात संयुक्त सचिव म्हणून काम केलेल्या सनदी अधिकाऱ्याचं ‘चाहूल आणीबाणीची’, ‘आणि प्राण’ हे अभिनेते प्राण यांचं चरित्र आदी भाषांतरं २००८ पर्यंतच्या आजारपणात पूर्ण केली.
|
मुकुंद संगोराम - रविवार, २२ ऑगस्ट २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
 कोणत्याही भाषेत बायबलचे जेव्हा भाषांतर करायचे ठरते, तेव्हा त्यासाठी तज्ज्ञ अशा बारा जणांची समिती नियुक्त केली जाते. या समितीला या कामासाठी बारा वर्षांचा कालावधी दिला जातो. त्यानंतरच हे काम प्रसिद्ध केले जाते. ‘सुबोध बायबल’ हे एकाच व्यक्तीने बारा वर्षे प्रयत्न करून पूर्ण केलेले असे बहुधा एकमेव काम असेल. फादर दिब्रिटो यांनी हे शिवधनुष्य नुसते पेलले नाही, तर ते लीलया पेलले आहे, याची साक्ष हा ग्रंथ देतो, यात शंकाच नाही.
|
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी तिथीनुसार नागपंचमीला (१४ ऑगस्ट) ८९ व्या वर्षांत पदार्पण केले. यानिमित्ताने लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीच्या वतीने सुरू करण्यात येत असलेला ‘लोकमान्य मातृभूमी’ हा राष्ट्रीय पुरस्कार सर्वप्रथम बाबासाहेबांना १७ ऑगस्ट रोजी पुण्यात देण्यात येणार आहे. पाच लाख एकावन्न हजार रु. आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. या अनुषंगाने ‘जडण-घडण’ मासिकाचे मुख्य संपादक डॉ. सागर देशपांडे यांचा हा विशेष लेख.
|
अशोक जैन - रविवार ८ ऑगस्ट २०१०
जवाहिऱ्याचे व्यावसायिक आणि हौशी पर्यटक श्रीकांत लागू यांनी ७ ऑगस्ट २०१० रोजी वयाची ७५ र्वष पूर्ण केली. यानिमित्ताने ‘कोंदण’ हा त्यांच्या विविध लेखांचा संग्रह ज्येष्ठ पत्रकार अशोक जैन यांनी संपादित केला आहे आणि ‘रोहन प्रकाशना’ने प्रसिद्ध केला आहे. या पुस्तकाची ही प्रस्तावना. हिऱ्याला अनेक पैलू असतात त्याप्रमाणे श्रीकांत लागू या आमच्या मित्राच्या व्यक्तिमत्त्वाचेही अनेक लखलखते पैलू आहेत. ‘लागूबंधू हिरे-मोतीवाले’ या त्याच्या नामांकित पेढीवर तो एक कुशल विक्रेता असतो.
|
रमेश देसाई - रविवार ८ ऑगस्ट २०१०
स्पष्ट दृष्टिकोनाच्या आणि ठाम मतांच्या एक व्यासंगी लेखिका म्हणून सत्त्वशीला सामंत या लोकसत्ता- लोकरंगच्या सुजाण वाचकांना सुपरिचित आहेत. त्यांनी शब्दरेखित केलेली सर्वश्री शं. ना. नवरे, श्रीराम कामत, दिलीप प्रभावळकर आदींची व्यक्तिचित्रेही लक्षणीय होती. त्यांनी स्वेच्छा विकत घेऊन माझे ‘तिसरा ध्रुव’ पुस्तक वाचले, ते सर्वागसुंदर विशेषणाने गौरविले आणि प्रामाणिक मतभेदाच्या एका मुद्दय़ावर लोकरंगद्वारे काही जाहीर चर्चाही उपस्थित केली.
|
एस. जी. अकोलकर, रविवार १ ऑगस्ट २०१०
मी स्वत: ज्ञानेश्वरीचा गाढा अभ्यासक नाही किंवा भावार्थ दीपिकेतील प्रत्येक ओवीचा खराखुरा अर्थ मला समजला आहे असाही माझा दावा नाही. खरे तर ही गोष्ट फारच कठीण आहे. ज्ञानेश्वरीच्या शब्दार्थाच्या व्याप्तीमुळे आणि काही वेळा वेगवेगळ्या प्रतींतील पाठभेदांमुळे बऱ्याच ओव्यांचे वेगवेगळे अर्थ लावले गेले आहेत. ‘सर्व ज्ञानेश्वरी आपणाला समजली असा कोणी आग्रह धरू नये. तसेच सर्व शब्दांचे आपण केलेलेच अर्थ बरोबर आहेत असे कोणी म्हणू नये’ असा प्रेमळ सल्ला या क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती श्री. शं. वा. ऊर्फ प्रा. सोनोपंत दांडेकर यांनी ‘ज्ञानेश्वरीचे शब्दभांडार’ या रा. ना. वेलिंगकर यांच्या अभूतपूर्व ग्रंथावरील ‘अभिप्राया’त १९५९ सालीच दिला आहे.
|
अमोल गवळी, रविवार १ ऑगस्ट २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
द युनिक अॅकॅडमीच्या वतीने होणाऱ्या महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी व्याख्यानमालेचे दुसरे व्याख्यान आणि ‘परिवर्तनाचा वाटसरू’च्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने डॉ. सदानंद मोरे यांनी वारकरी संप्रदायाची आधुनिक काळातील मांडणी-चर्चाविश्वांची चिकित्सा या विषयावर केलेल्या मांडणीचे अमोल गवळी यांनी केलेले हे शब्दांकन. महाराष्ट्राची गेल्या पन्नास वर्षांतील वाटचाल पाहात असताना आधुनिक काळातील वारकरी संप्रदायाच्या मांडणीची चर्चा करणे म्हणजेच वारकरी संप्रदायाला महाराष्ट्राच्या समाजजीवनात असलेले कळीचे महत्त्व, त्याचा येथील जनमानसावर असलेला खोलवर प्रभाव व त्याची दखलपात्र स्थिती मान्य करणे होय.
|
पं. सुजन राणे - रविवार, २५ जुलै २०१०
भारतीय संगीत हे मेलडीवर आधारलेलं आहे तर पाश्चात्त्य संगीत हार्मनीवर आधारलेलं आहे, या दोन वेगळ्या पद्धतीचा मेळ कानाला खरंच सुखकर वाटतो का? जेव्हा कारुण्य व माधुर्य हे पूर्वीपासून चालत आलेले भारतीय संगीतातले मुख्य घटक दुय्यम मानू जाऊ लागतील, तेव्हा हे संगीत नष्ट होण्याच्या मार्गावर जाईल का, अशी भीती वाटणं साहजिक आहे; परंतु ही भीती अवास्तव आहे असं वाटतं, कारण जोपर्यंत माणसाच्या कानावर या दोन घटकांचे आघात थांबत नाहीत तोपर्यंत हे संगीत अमर राहील.भारतीय संगीताचा उगम हजारो वर्षांपूर्वी झाला असं आपल्या धार्मिक ग्रंथात नमूद केलं गेलं आहे.
|
मोहन कान्हेरे - रविवार, २५ जुलै २०१०
‘संगीताचे उत्तम गुरू असलेल्या देवधरांचं उत्तम शिष्य म्हणून जे दर्शन होतं ते जुळलेल्या तानपुऱ्यातून आपोआप उमटणाऱ्या गंधाराइतकं सहज आणि सुंदर आहे. ‘स्कूल ऑफ इंडियन म्युझिक’मधले देवधर जसे उत्तम गुरू आहेत, तसेच त्या स्कूलमधले उत्तम विद्यार्थीही तेच आहेत.’ पु. लं.नी नोंदवलेलं हे निरीक्षण!.. पं. विष्णू दिगंबर पलुस्कर चौकातल्या ‘देवधर्स स्कूल ऑफ इंडियन म्युझिक’ या प्रख्यात संस्थेच्या दर्जाबद्दल, गुणवत्तेबद्दल पु. लं.प्रमाणेच अनेकांनी जिव्हाळ्याने आत्मीयतेने वेळोवेळी बरंच काही लिहिलं आहे.
|
|
अरविंद व्यं. गोखले , रविवार , १८ जुलै २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
 मराठी भाषेत चित्रपटांवर पुस्तके प्रसिद्ध झाली; हॉलिवूडवरही अनेकांनी लिहिले. त्यात श्रीकृष्ण जकातदार, रा. बा. कुलकर्णी, वा. य. गाडगीळ अशी काही मंडळी जुन्या पिढीत होऊन गेली. काही नावे अलीकडच्या काळातही पुढे आली; पण या नव्या पुस्तकाच्या लेखिकेचे असे स्वतंत्र नाव त्यांनी नसतानाही हे धाडस करावे हे विशेष होते आणि त्यात लेखिकेला शंभर टक्के यश मिळाले आहे. त्यांचे नाव आहे, शैलजा देशमुख!
|
|
|
<< Start < Prev 1 2 Next > End >>
|
|
Page 1 of 2 |
|
लोकरंग
‘चिनी ज्यादा’ !
अनिकेत साठे - रविवार, ५ सप्टेंबर २०१० ( sathe.aniket@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चिनी लष्कराच्या मुक्त संचारामुळे भारताची चिंता वाढली असून त्यामागे ‘ड्रॅगन’ची नेमकी काय चाल आहे, असा प्रश्न होतो. त्याचे उत्तर शोधताना हा विषय केवळ गिलगिटपुरताच मर्यादित नाही, तर त्याला विविध स्वरूपाचे कंगोरे असल्याचे लक्षात येते. अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून संरक्षण क्षेत्रात अफाट गुंतवणूक करणारा चीन सध्या जी पावले टाकतो आहे, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाही गर्भित इशारा देण्याचा भाग आहे. |
दिनदर्शिका
दिनांक ८ सप्टेंबर २०१० बुधवार मिती श्रावण वद्य अमावस्या १६ क. ०० मि. पूर्वा नक्षत्र २३ क. ५० मि. सिंह चंद्र २९ क. ५ मि.पर्यंत. सूर्योदय- ६।२६ सूर्यास्त- ६।४७. दर्श अमावस्या पोळा. मेष - योजना वेग घेतील, वृषभ - घरगुती प्रश्नांवर लक्ष ठेवा, मिथुन - महत्त्वाची कामे होतील, कर्क - जबाबदाऱ्या पूर्ण कराल, सिंह - नवे तंत्र यशस्वी ठरेल, कन्या - विचाराने पावले उचला, तुला - अनेकांचे सहकार्य मिळेल, वृश्चिक - प्रिय व्यक्तींच्या भेटी, धनु - मोठी उलाढाल होईल, मकर - थांबा बघा पुढे चला, कुंभ - वेळ वाया घालवू नका, मीन - मार्ग सापडतील, यश मिळेल. शुभराशी- मिथुन, सिंह, तुला.
|