|
|
सुचिता देशपांडे - रविवार, ५ सप्टेंबर २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
भोवतालच्या सृष्टीत वावरणाऱ्या प्राणी-पक्ष्यांबद्दल वाटणारं औत्सुक्य शमविणारी शैलजा ग्रब लिखित चार पुस्तकं ‘मनोविकास प्रकाशन’ने अलीकडेच प्रकाशित केली आहेत. वरून संथ, शांत भासणारं असं पाण्याच्या पोटातलं जग हे सदैव जिवंत, जागतं असतं. पाण्यातल्या या जगाबद्दल सदैव आपल्या मनात कुतूहल असतं. तिथं कोण कोण असतं, ते कसे राहतात, काय खातात, कोण कुणाला मारतं, कोण कुणाला खातं असे बरेच प्रश्न आपल्या साऱ्यांच्याच मनात घोळत असतात. यातील अनेक प्रश्नांची उत्तरं ही आपल्याला ‘जलचर प्राणी’ या पुस्तिकेतून मिळतात.
|
अंतरा भिडे - रविवार, ५ सप्टेंबर २०१० इ. दहावी, बालभारती विद्यामंदिर, रायबंदर, गोवा
जर सर्वजण पक्षी झाले.. तर घरांच्या जागी झाडे झाडांवरती छोटी घरटी झाडांवर छोटेसे वाडे नसेल पक्ष्यांत काही कुणी श्रेष्ठ वा कनिष्ठ मिळतील सर्वां सुंदर रंग
|
रविवार, २९ ऑगस्ट २०१०
पावसाळ्याच्या सुरुवातीला आमच्या घरासमोरच्या आंब्याच्या झाडावर बगळे घरटी बनवतात व पावसाळा संपल्यावर आपल्या पिल्लांबरोबर निघून जातात. एके दिवशी बगळ्याचं एक पिल्लू झाडाखाली असलेल्या कुंडीत बसलेलं दिसलं. कदाचित उडण्याच्या प्रयत्नात ते खाली पडलं असावं. त्याचं ओरडणं ऐकून ‘रिकामटेकडे’ कावळे त्या पिल्लाजवळ जमून काव-काव करत होते. झाडाखाली पडलेले माशांचे तुकडे खाण्यासाठी मांजर झाडाखाली आली.
|
प्रतिनिधी , रविवार, २९ ऑगस्ट २०१०
मराठी लेखन कसे शिकावे, याचे सोपे आणि तरीही अतिशय शास्त्रीय विवेचन अरुण फडके लिखित ‘मला मराठी शिकायचंय’ या पुस्तकात वाचायला मिळते. ठाण्याच्या ‘अंकुर प्रकाशना’ने अलीकडेच प्रकाशित केलेल्या या पुस्तकात मुळाक्षरांपासून जोडाक्षरांपर्यंत आणि शब्दांपासून वाक्यांपर्यंत क्रमाक्रमाने लेखनकौशल्यं शिकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अलीकडेच राज्य शासनाने वर्णमालेसंबंधी घेतलेल्या निर्णयांचा अंतर्भाव असणारे हे पहिले पुस्तक असल्याचा दावा प्रकाशकांनी केला आहे. स्वरमालेतील स्वर, स्वरादी, व्यंजनांचे उच्चार, ल, श ही अक्षरे कशी काढावीत, श, ष ह्या अक्षरांतील उच्चाराचा फरक यासंबंधीचे स्पष्टीकरणही पुस्तकात देण्यात आले आहे.
|
प्रतिनिधी , रविवार, २९ ऑगस्ट २०१०
मुलांना केवळ उपदेशात्मक बोलण्यापेक्षा गोष्टींतून बोध देणं जास्त सोपं असतं आणि ते अधिक परिणामकारक पद्धतीनं मुलांपर्यंत पोहोचवता येतं. याचंच प्रत्यंतर ‘धमालघर’ या रत्नाकर धर्माधिकारी यांच्या गोष्टींच्या पुस्तकातून येतं. या गोष्टी मुलांबरोबरच मोठय़ांनाही चार उपदेशाच्या गोष्टी सांगून जातात. एकूण १६ कथांचा यात समावेश आहे. मोठी माणसं मुलांना सतत उपदेश करीत असतात, पण लहानग्यांच्या वर्तणुकीतूनही अनेकदा मोठय़ांनी बरंच काही शिकण्यासारखं असतं, याचा दाखलाही या पुस्तकातील गोष्टींतून मिळतो. विशेष म्हणजे मोठय़ा माणसांनीही मुलांनी दाखवून दिलेल्या चुकीचा मोठय़ा मनाने स्वीकार करावा, अशी शिकवणही कळत-नकळत या गोष्टींमधून मिळते.
|
रविवार, २२ ऑगस्ट २०१०
एक होता काऊ एक होती चिऊ दोघांनी ठरवलं पिकनिकला जाऊ झिम्माडी पावसात चिंबगार भिजू कुठं बरं जाऊ? या गाण्यातील चिऊ-काऊप्रमाणे आमच्या बाईंनी आम्हाला पावसाळी सहलीसाठी ‘दूधिवरे’ या ठिकाणी नेले होते. आम्ही सकाळी साडेसात वाजता शाळेतून बसने निघालो.
|
विकास नारायण कपोले देवपूर, धुळे
उभरे ताहा.. उभरे ताहा.. असे म्हणत एक १४/१५ वर्षांचा मुलगा अचानक आमच्या गाडीसमोर आला. ड्रायव्हरने पटकन ब्रेक मारून गाडी थांबवली. आम्ही सर्व गाडीच्या बाहेर येऊन त्या मुलाला विचारलं, ‘उभरे ताहा- म्हणजे रे काय?’ ‘अहो साहेब, म्हणजे थांबा-थांबा.. असं म्हणायचंय मला,’ त्या सावळ्या, तरतरीत मुलाने आपल्या भील-मराठी मिश्रित भाषेत सांगितलं. त्या मुलाच्या मदतीने रस्त्यावरील दगड-माती बाजूला करून त्याला आमच्यासोबत गाडीने तोरणमाळला चलण्याचा आग्रह केला.
|
रविवार ८ ऑगस्ट २०१०
श्रेष्ठ साहित्यिक आचार्य अत्रे यांनी शालेय मुलांसाठी प्रसिद्ध केलेली ‘नवयुग वाचनमाला’ आता लवकरच ‘परचुरे प्रकाशन’तर्फे पुन्हा प्रकाशित होत आहे. त्यातील काही गोष्टी- रात्रीची वेळ होती. थंडी बरीच पडली होती. आभाळात चांदोबा उघडाच फिरत होता. चांदोबा आईकडे गेला आणि म्हणाला, ‘‘आई, आई, मला फार थंडी वाजते. मला एक आंगरखा शिवशील?’’
|
रविवार ८ ऑगस्ट २०१०
कोण जाणे का, पण मला नाही हसू येत! गाढवाला पाहून मला नाही हसू येत. लोक त्याला का हसतात? लांब कान आहेत म्हणून? का ते लोळते म्हणून? का ते ओझी वाहते म्हणून? का ते मोठय़ाने ओरडते म्हणून?
|
रविवार ८ ऑगस्ट २०१०
घडय़ाळात तीन काटे आहेत. सेकंदकाटा, मिनिटकाटा आणि तासकाटा. सेकंदकाटा मला फार आवडतो. सारखा तुरुतुरू पळत असतो. सेकंदकाटा ६० घरे फिरतो, तेव्हा मिनिटकाटा एक घर फि रतो.
|
रविवार ८ ऑगस्ट २०१०
एकदा टिपू खेळत होता. खेळता खेळता टिपूने वळून पाहिले. तो टिपूला आपली शेपटी दिसली. टिपूला वाटले, शेपटी दातात पकडावी. मग तो शेपटीमागे पळत सुटला. खूप पळाला, खूप पळाला.
|
रविवार ८ ऑगस्ट २०१०
एक होता हरण. एक होती हरिणी. दोघे नेहमी रानात बरोबर फिरायची. दोघे नेहमी रानात बरोबर चरायची. हरणाला हरिणीचा फार लळा होता. हरिणीला पण हरणाचा फार लळा होता. एकदा फिरत-फिरत ती दूर गेली. रान मागे राहिले आणि वाळवंट पुढे लागले.
|
|
|
<< Start < Prev 1 2 Next > End >>
|
|
Page 1 of 2 |
|
लोकरंग
‘चिनी ज्यादा’ !
अनिकेत साठे - रविवार, ५ सप्टेंबर २०१० ( sathe.aniket@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चिनी लष्कराच्या मुक्त संचारामुळे भारताची चिंता वाढली असून त्यामागे ‘ड्रॅगन’ची नेमकी काय चाल आहे, असा प्रश्न होतो. त्याचे उत्तर शोधताना हा विषय केवळ गिलगिटपुरताच मर्यादित नाही, तर त्याला विविध स्वरूपाचे कंगोरे असल्याचे लक्षात येते. अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून संरक्षण क्षेत्रात अफाट गुंतवणूक करणारा चीन सध्या जी पावले टाकतो आहे, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाही गर्भित इशारा देण्याचा भाग आहे. |
दिनदर्शिका
गुरुवार, ९ सप्टेंबर २०१०. मिती भाद्रपद शुद्ध प्रतिपदा १२ क. ०८ मि.पर्यंत. उत्तरा नक्षत्र २० क. ५१ मि.पर्यंत. कन्या चंद्र. सूर्योदय- ६।२६ सूर्यास्त- ६।४६ मेष - शत्रूंवर लक्ष ठेवा, वृषभ - मुलांचे प्रश्न सुटतील, मिथुन - घरात शांतता ठेवा, कर्क - छोटे-मोठे प्रवास होतील, सिंह - अचानक दडपण वाढतील, कन्या - महत्त्वाचे निर्णय घ्याल, तूळ - देवघेवीत चुका करू नका, वृश्चिक - पैसा हाती येईल, धनू - सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, मकर - प्रयत्न कारणी लागतील, कुंभ - अडचणींचा दिवस, मीन - शासकीय कामे होतील. शुभराशी : वृश्चिक / धनू / मकर
|