मुखपृष्ठ >> लाइफ स्टाईल-मनोरंजन-कला
 


स्पर्धेचे नियम व अटी




लेख
‘लय’कारीतील शिल्पकृती! Print E-mail
प्रतिनिधी, गुरुवार, ९ सप्टेंबर २०१०
जहांगीरच्या वातानुकुलित दालनातील पहिल्या भागात सध्या संतोष पेडणेकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन सुरू आहे. बेळगावमध्येच त्यांचे बालपण गेले. बेळगावचे प्रसिद्ध चित्रकार के. बी. कुलकर्णी यांच्याकडे त्यांना चित्रकलेचे प्राथमिक धडे गरिवले. केबींचे शिष्य जॉन फर्नांडिस यांचे मार्गदर्शनही त्यांना लाभले.
 
गिरगावात मोर Print E-mail
आरती नाडकर्णी, गुरुवार, ९ सप्टेंबर २०१०
श्रावण महिन्यातला पहिला दिवस. श्रावणमासी हर्ष मानसी भरलेला. हॉलला लागूनच ओपन टेरेस असल्याने सकाळचा चहा पिताच गच्चीतील झाडांवर नजर टाकली.. आणि मी आश्चर्याने बघतच राहिले. कारण माझ्या या गच्चीरूपी अंगणात चक्क मोर आला होता.
 
‘विठा’ : स्वप्नवत अन् खडतर जीवनपट Print E-mail
रवींद्र पाथरे ,बुधवार, ८ सप्टेंबर २०१०
‘त माशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकरांच्या फडाचा तंबू सावकाराच्या ताब्यात!’ या बातमीनं त्याकाळी एकच खळबळ माजवली होती. पत्रकार माधव गडकरी यांनी त्याबद्दल ‘लोकसत्ता’मध्ये स्फुट लिहून विठाबाईचा तंबू सोडविण्याकरिता रसिकांना मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला भरभरून प्रतिसाद मिळून सावकाराच्या पाशातून तो तंबू सोडवला गेला होता. या घटनेतून तमाशा कलावंतांच्या भयावह जिण्याचं विदारक दर्शन लोकांना घडलं होतं.
 
नाटय़समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचा कल्याणकरांतर्फे हृद्य सत्कार Print E-mail
नाटय़ प्रतिनिधी
ज्येष्ठ नाटय़समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त ‘मिती-चार, कल्याण’ या नाटय़संस्थेने त्यांना अभिवादन करण्यासाठी कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. कल्याणमधील ज्येष्ठ नेपथ्यकार बापू लिमये यांच्या हस्ते कमलाकर नाडकर्णी यांचा यावेळी हृद्य सत्कार करण्यात आला. मानचिन्ह, मराठी वाङ्मयकोश आणि देश-विदेशातील जागतिक दर्जाच्या काही दुर्मिळ चित्रपटांचा संग्रह याप्रसंगी त्यांना भेट देण्यात आला.
 
‘कल्पक गणेश २०१०’ Print E-mail
प्रतिनिधी
रहेजा स्कूल ऑफ आर्ट्स, वरळी येथे ‘कल्पक गणेश २०१०’ हे प्रदर्शन सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांनी सर्व गणेश मूर्ती प्रदूषणविरहित अशा शाडूच्या मातीने तयार केल्या असून त्यात सर्व प्रकारचे, रंगाचे, निरनिराळ्या पद्धतीचे गणपती पाहायला मिळतात. या प्रदर्शनाबरोबर ‘सिरॅमिक व पॉटरी’चे अप्रतिम काम या प्रदर्शनात पहायला मिळते. हे प्रदर्शन एल. एस. रहेजा स्कूल ऑफ आर्ट, आदर्श नगर, बिल्डींग नं ३८ समोर,
 
साऊंड ऑफ म्युझिक : गणाधीश / संपूर्ण सुंदरकांड Print E-mail
प्रा. कीर्ती आगाशे, रविवार, ५ सप्टेंबर २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
गणाधीश
आबालवृद्धांना प्रिय असणाऱ्या गणपतीचं आगमन, मनात एक वेगळंच चैतन्य निर्माण करतं. खरंतर गणेशाचं लंबोदर, वक्रतुंड, एकदंत, शूर्पकर्णक हे चमत्कृतीपूर्ण रूप नेहमीच्या मनुष्यरूपी देवदेवतांपेक्षा वेगळं आणि मोहक वाटतं म्हणूनच अगदी लहान वयापासून आपलं बाप्पाशी नातं जुळतं.
 
उन्मुक्त प्रेमाची तरल दास्ताँ Print E-mail
रविंद्र पाथारे, रविवार, ५ सप्टेंबर २०१०
‘एक लफडं विसरता न येणारं!’
‘पांडुरंग बाजलकर.. बापाचं नाव गाळून.’
बापाला गाळण्याचं कारण-
बापाचा पत्त्याच नाही.
 
चुकवू नये असे काही : मानवी चेहरे आणि प्रेमभावना Print E-mail

प्रतिनिधी, शनिवार, ४ सप्टेंबर २०१०
मानवी चेहरे आणि प्रेमभावना
विविध मानवी चेहरे आणि त्यातून व्यक्त होणारी प्रेमभावना दर्शविणाऱ्या नित्यम सिंघा रॉय यांच्या चित्रांचे प्रदर्शन रसिकांना येत्या ५ सप्टेंबपर्यंत पाहता येईल. हे प्रदर्शन काळा घोडा येथील जहांगीर कलादालन, क्रमांक-१ येथे सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळेत सर्वासाठी खुले आहे.

 
ट्रे-किंग : ‘हार्ट ऑफ ट्रेकर्स’ Print E-mail
कैलास कोरडे, शनिवार, ४ सप्टेंबर २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
रात्री शेवटची लोकल गेल्यानंतर एरव्ही लोकल रेल्वे स्थानकांवर शुकशुकाट होतो. रेल्वे कर्मचारी आणि पोलीस सोडता बाकी माणसं दिसेनाशी होतात. एक स्थानक मात्र त्याला अपवाद आहे. दर वीकेण्डला हे रेल्वे स्थानक जागं असतं. वर्दळीमुळे फलाटांना झोप लागत नाही.
 
‘तू भेटशी नव्याने’मध्ये जमलीय आशुतोष-ऋजुताची केमिस्ट्री Print E-mail
प्रतिनिधी, शनिवार, ४ सप्टेंबर २०१०
‘मी मराठी’ वाहिनीवर ३० ऑगस्टपासून ‘तू भेटशी नव्याने’ ही मालिका सुरू झाली आहे. छोटय़ा पडद्यावरील रिअ‍ॅलिटी शोमध्ये काम करणारा आशुतोष कुलकर्णी आणि ऋजुता देशमुख या मालिकेच्या निमित्ताने प्रथमच एकत्र काम करत आहेत.
 
बॅकस्टेज कलाकारांचा सन्मान Print E-mail
प्रतिनिधी, शनिवार, ४ सप्टेंबर २०१०
नाटक यशस्वी होण्यासाठी लेखक, दिग्दर्शक, कलाकार यांच्याप्रमाणेच पडद्यामागे काम करणाऱ्यांच्या मेहनतीचाही महत्त्वाचा वाटा असतो. परंतु नाटय़पुरस्कारांमध्ये त्यांच्या कार्याची अजिबात दखल घेतली जात नाही.
 
निसानची मायक्रा : पॉश हॅचबॅक Print E-mail
रवींद्र बिवलकर, शुक्रवार, ३ सप्टेंबर २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
भारतातील हॅचबॅक मोटारींच्या यादीत आणखी भर पडली आहे, ती म्हणजे निसानच्या ‘मायक्रा’ या मोटारीची. गेल्या काही महिन्यांपासून भारतातील ग्राहकांची नस ओळखून परदेशी कंपन्यांनी आता हॅचबॅक व सी सेगमेंटमधील मोटारी बाजारपेठेत आणण्यास सुरुवात केली आहे.
 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

ताज्या बातम्या



लोकरंग

‘चिनी ज्यादा’ !

अनिकेत साठे - रविवार, ५ सप्टेंबर २०१०
( sathe.aniket@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चिनी लष्कराच्या मुक्त संचारामुळे भारताची चिंता वाढली असून त्यामागे ‘ड्रॅगन’ची नेमकी काय चाल आहे, असा प्रश्न होतो. त्याचे उत्तर शोधताना हा विषय केवळ गिलगिटपुरताच मर्यादित नाही, तर त्याला विविध स्वरूपाचे कंगोरे असल्याचे लक्षात येते. अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून संरक्षण क्षेत्रात अफाट गुंतवणूक करणारा चीन सध्या जी पावले टाकतो आहे, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाही गर्भित इशारा देण्याचा भाग आहे.

दिनदर्शिका

गुरुवार, ९ सप्टेंबर २०१०. मिती भाद्रपद शुद्ध प्रतिपदा १२ क. ०८ मि.पर्यंत. उत्तरा  नक्षत्र २० क. ५१ मि.पर्यंत. कन्या चंद्र. सूर्योदय- ६।२६ सूर्यास्त- ६।४६
मेष
- शत्रूंवर लक्ष ठेवा, वृषभ - मुलांचे प्रश्न सुटतील, मिथुन - घरात शांतता ठेवा, कर्क - छोटे-मोठे प्रवास होतील, सिंह - अचानक दडपण वाढतील, कन्या - महत्त्वाचे निर्णय घ्याल, तूळ - देवघेवीत चुका करू नका, वृश्चिक - पैसा हाती येईल, धनू - सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, मकर - प्रयत्न कारणी लागतील, कुंभ - अडचणींचा दिवस, मीन - शासकीय कामे होतील.
शुभराशी : वृश्चिक / धनू / मकर