मुखपृष्ठ >> विज्ञान - तंत्रज्ञान
 


स्पर्धेचे नियम व अटी




विज्ञान - तंत्रज्ञान
सौंदर्य फुले! Print E-mail
सिमंतिनी नुलकर - बुधवार, १ सप्टेंबर २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कासला जांभळी मंजिरी, आमरी, सीतेची आसवं सडाभर दिसतात, पण काही सौंदर्यखाणी वाटेवर असतात, काही पहायला थोडी वाकडी वाटच करायला लागते. Thumbergia fragrens  म्हणजे White lady!  अतिव देखणे नाजूक फूल. हे तसे कुठेही आढळते. चोर पावलांनी शहरी बागांमध्ये घुसलेली आणि रुळलेली ही फुलवेल मोहवून टाकणारी आहे. या फुलांना स्थानिक लोक ‘दहिभात’ म्हणतात. कालवलेल्या दहिभातासारखाच शुभ्र, सुंदर, मऊ, रेशीम स्पर्शी!
 
सिकलसेल अ‍ॅनिमिया Print E-mail
अलकनंदा सुळे - बुधवार, १ सप्टेंबर २०१०
डॉ. चित्ररेखा कुलकर्णी

सिकलसेल अ‍ॅनिमिया म्हणजे दात्रकोशिका पांडुरोग. हा आनुवंशिक रक्तविलयजन्य पांडुरोग असून विकृत रक्तारुणामुळे उद्भवतो.
आपल्या रक्तामध्ये तीन प्रकारच्या पेशी असतात. लाल पेशी, पांढऱ्या पेशी व प्लेटलेट्स. या सर्व पेशी आपल्या हाडाच्या मगजामधील स्टेम सेल्सपासून तयार होतात. अशा या लाल पेशीमधील हिमोग्लोबिनच्या गुणसूत्रामध्ये विकृती (म्युटेशन) झाली तर सिकलसेल अ‍ॅनिमिया हा आजार होतो.
 
किलगड खा आणि निरोगी राहा Print E-mail
अनिल दांडेकर - बुधवार, १ सप्टेंबर २०१०
रशिया हा एक अनेक आश्चर्याचा देश आहे. पूर्व-पश्चिम अस्ताव्यस्तपणे पसरलेल्या रशियाचे क्षेत्रफळ सुमारे १७,०७५,४०० चौ. कि. मी. असून, त्याचा सुमारे साठ टक्के भूप्रदेश आशिया खंडात आणि बाकीचा भूप्रदेश युरोप खंडात सामावलेला आहे. मध्य भागात सदैव बर्फाखाली आच्छादलेला सॅबेरियाचा उजाड प्रदेश उत्तरेकडील उत्तर गोलार्धातील सहा सात महिने अतिशित प्रदेश असून, दक्षिणेकडील भूप्रदेशात निसर्गाने, हवामानाने मनमुराद उधळण केलेली आहे.
 
भुई आमरीचे आविष्कार! Print E-mail
सीमंतिनी नूलकर - बुधवार, १८ ऑगस्ट २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कासच्या सडय़ावर तसा वर्षभर पुष्पोत्सव असतो. रानजाईचे (वनमल्लिका) मदमस्त सुवास पावले अडखळवतात, करवंदीच्या जाळय़ात जीव उगीचच गुंतून पडतो. धायटीच्या मधाचा गोडवा जिभेवर हुळहुळतो, पण पाऊस सुरू झाला, की हाच सडा चैतन्याने सळसळून उठतो. ढगांच्या दुलईत स्वत:ला गुरफटून घेतो. यातच आघाडीवर असतात भुई आमरी उर्फ ग्राऊंड ऑर्किड्सचे असंख्य प्रकार!
एक दिवसापासून ते सात दिवसांपर्यंतचे आयुष्य असलेल्या या वेगवेगळय़ा भुई आमरी! आषाढहाबे आमरी, बाहुली आमरी, आकाश आमरी, हिरवी आमरी.
 
पक्ष्यांच्या स्थलांतरणातील महामॅरेथॉन Print E-mail
डॉ. रमेश महाजन - बुधवार, १८ ऑगस्ट २०१०
दर चार वर्षांनी होणाऱ्या ऑलिम्पिक खेळात मॅरेथॉनची शर्यत असतेच असते. जवळजवळ ४२ किलोमीटर्स अंतराच्या शर्यतीने मानवी शारीरिक क्षमतेचा कस त्यातून लागतो. मुख्य म्हणजे ही शर्यत प्रगत राष्ट्रांची मिरासदारी न बनता केनया, इथोपियासारख्या गरीब राष्ट्रांची मिरासदारी बनली आहे. गेल्या काही वर्षांत मॅरेथॉन पूर्ण करणम्याची वेळ कमी होत होत आणि ती एका निश्चित मर्यादेत बंदिस्त आहे.
 
विज्ञान : स्वाइन फ्लूवरील उपचारांचे आव्हान Print E-mail
राजेंद्र येवलेकर, मंगळवार, १० ऑगस्ट २०१०
स्वाइन फ्लू रोगाने गेल्या वर्षी जे थैमान घातले होते त्याचे प्रमाण यंदा कमी आहे, पण त्या रोगाचा धोका कायमचा संपलेला नाही. एच१ एन१ विषाणूमुळे होणारा हा रोग वैज्ञानिकांसाठी आव्हानाचा विषय ठरला आहे. एच१ एन१ विषाणू हा इतर रोगांच्या विषाणूसारखाच चतुर आहे.
 
कासच्या अंगणी Print E-mail
सीमंतिनी नूलकर - बुधवार, ४ ऑगस्ट २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मध्यरात्री उमलणारी, सूर्योदयी उमलणारी, थोडय़ा मिनिटांचे आयुष्य असणारी, महिना महिना राहणारी, सुगंधी, दरुगध असलेली, कोणताही वास नसलेली, विषारी किंवा कीटकभक्षी, सात वर्षांनी उमलणारी, फुलोऱ्यानंतर मरून जाणारी, टिचभर टिकलीएवढी आणि डोळ्यांतही न भरणारी.. लाल, निळी, जांभळी, रंगीबेरंगी, फुलेच फुले.. आणि या फुलांनी भरलेले पठार!
कास! होय. आपण कासविषयीच बोलतोय. खरेतर ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ म्हटले की, हिमालयातील ती ‘पुष्प घाटी’ डोळ्यांपुढे येते.
 
आचार्य प्रफुल्लचंद्र राय Print E-mail
कविता भालेराव - बुधवार, ४ ऑगस्ट २०१०
इ. स. १८६१ हे वर्ष भारतासाठी फार भाग्यकारक ठरले. कारण या वर्षांत तीन महान व्यक्तींनी या भूतलावर जन्म घेतला. एक रसायनशास्त्रज्ञ प्रफुल्लचंद्र राय, दुसरे कलकत्त्यात जन्मलेले रवींद्रनाथ टागोर आणि तिसरे अलाहाबादमधील जवाहरलाल नेहरूंचे वडील मोतीलाल नेहरू. या तिघांनी भारताच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा उचलला. इ. स. २०१० हे त्यांच्या १५० व्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. या लेखात आपण आचार्य प्रफुल्लचंद्र राय यांचा परिचय करून घेऊया.
 
किरणोत्सारी घटकांपासून बचाव करताना.. Print E-mail
अनिल दांडेकर - बुधवार, ४ ऑगस्ट २०१०
काही दिवसांपूर्वी छापून आलेल्या बातमीने विशेष करून अणुशास्त्रज्ञ अणुऊर्जा संशोधक आणि पोलीस खाते यांची खऱ्या अर्थाने झोप उडाली. दिल्लीतील भंगाराच्या दुकानात काम करणाऱ्या काही मजुरांना किरणोत्सर्गामुळे वेगवेगळे आजार झाल्याचे निश्चित झाले. ते किरणोत्सर्जन कोठून निर्माण झाले, कोणते किरणोत्सारी घटक तेथे होते, ते घटक निष्काळजीपणे बाजारात विक्रीला कसे आले, त्याला जबाबदार कोण असेल अशा प्रश्नांची मालिका सुरू झाली.
 
विज्ञान : वैद्यकाला दिशा देणारे पेशीतील बदलांचे चित्रण Print E-mail
राजेंद्र येवलेकर ,मंगळवार, २७ जुलै २०१०
प्रत्येक सजिवात पेशींना फार महत्त्व असते. त्यांचे कार्य जर सुरळीत चालले तरच शरीर तंदुरुस्त राहते. कर्करोगासारख्या रोगांवर उपचार शोधून काढण्यासाठी गेली अनेक वर्षे वैज्ञानिक प्रयत्नशील आहेत. पेशींची अनियमित वाढ झाल्यामुळे कर्करोग होतो, पण ती वाढ जैविक प्रक्रियांच्या पातळीवर रोखणे हे सर्वात कठीण आव्हान आहे. मानवी शरारीत अ‍ॅपॉपटॉसिस या क्रियेमुळे प्रतिकारशक्ती टिकून राहते तसेच कर्करोग टाळणारी ती नैसर्गिक प्रक्रिया आहे. अ‍ॅपॉपटॉसिस म्हणजे पेशींचा सुनियंत्रित मृत्यू असतो.
 
विज्ञान - तंत्रज्ञान : मानवाचे उगमस्थान आफ्रिकेत Print E-mail
निरंजन घाटे ,बुधवार,२१ जुलै २०१०
मानवी उत्क्रांतीबाबत जे संशोधन झालंय त्यात अलीकडच्या काळात जननिक माहिती आणि गेल्या काही वर्षांत सापडलेले मानवी अवशेष यांचा विचार करता मानव प्रथम आफ्रिकेतच अस्तित्वात आला, याबाबत आता बहुतेक मानवशास्त्रज्ञांमध्ये एकमत झालेलं आढळतं. तसंच पृथ्वीच्या इतिहासाचा एकूण काळ बघता मानवी अगदी अलीकडच्या काळात पृथ्वीवर अस्तित्वात आला, याबद्दलही मानवशास्त्रज्ञांमध्ये दुमत नाही. आजच्या माणसासारखा माणूस फार तर लाख-दोन लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात आला.
 
विज्ञान - तंत्रज्ञान : प्राण्यांचा कॅमेरा भक्ष्य मिळविण्यासाठी Print E-mail
सु. वि. पाडळीकर
परमेश्वरी लीला अगाध आहे याची जाणीव विज्ञान सतत करून देत असते. पृथ्वीवरील विविध प्राणिमात्रांना, वनस्पतींना अनेकविध उपायांनी  त्यांचे रक्षण करण्याचे वा अन्न मिळविण्याचे तंत्र परमेश्वर शिकवित असतो वा देतो. ज्यायोगे ते आपापले जीवन सुसहय़ तर करतातच, पण संकटाच्या वेळी ते स्वत:चा जीव वाचवतात. उदा., कुत्र्यास उच्च दर्जाची वासक्षमता उपजतच असते. तसेच वाघ, सिंह यांनाही दूर अंतरावरून वास येतो. तसेच छोटय़ा चिचुंद्रीलाही सूक्ष्म आवाज ओळखण्याची क्षमता असते. याचाच अभ्यास काही शास्त्रज्ञांनी केला.
 


ताज्या बातम्या



लोकरंग

‘चिनी ज्यादा’ !

अनिकेत साठे - रविवार, ५ सप्टेंबर २०१०
( sathe.aniket@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चिनी लष्कराच्या मुक्त संचारामुळे भारताची चिंता वाढली असून त्यामागे ‘ड्रॅगन’ची नेमकी काय चाल आहे, असा प्रश्न होतो. त्याचे उत्तर शोधताना हा विषय केवळ गिलगिटपुरताच मर्यादित नाही, तर त्याला विविध स्वरूपाचे कंगोरे असल्याचे लक्षात येते. अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून संरक्षण क्षेत्रात अफाट गुंतवणूक करणारा चीन सध्या जी पावले टाकतो आहे, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाही गर्भित इशारा देण्याचा भाग आहे.

दिनदर्शिका

दिनांक ८ सप्टेंबर २०१० बुधवार मिती श्रावण वद्य अमावस्या १६ क. ०० मि. पूर्वा नक्षत्र २३ क. ५० मि. सिंह चंद्र २९ क. ५ मि.पर्यंत. सूर्योदय- ६।२६ सूर्यास्त- ६।४७. दर्श अमावस्या पोळा.
मेष -
योजना वेग घेतील, वृषभ - घरगुती प्रश्नांवर लक्ष ठेवा, मिथुन - महत्त्वाची कामे होतील, कर्क - जबाबदाऱ्या पूर्ण कराल, सिंह - नवे तंत्र यशस्वी ठरेल, कन्या - विचाराने पावले उचला, तुला - अनेकांचे सहकार्य मिळेल, वृश्चिक - प्रिय व्यक्तींच्या भेटी, धनु - मोठी उलाढाल होईल, मकर - थांबा बघा पुढे चला, कुंभ - वेळ वाया घालवू नका, मीन - मार्ग सापडतील, यश मिळेल.
शुभराशी- मिथुन, सिंह, तुला.