मुखपृष्ठ >> हास्यरंग
 


स्पर्धेचे नियम व अटी




त्यांचे (न)कारनामे! Print E-mail
सुधीर सुखठणकर - रविवार  ५ सप्टेंबर २०१०
अलीकडेच मुंबईत प्रवाशांनी टॅक्सी-रिक्षावाल्यांना गांधीगिरीचा हिसका दाखवला. त्याच दरम्यान मी सरंजाम्यांकडे गेलो. घरी अनुपम एकटाच होता. त्याने देव्हाऱ्याजवळच एक फोटो टांगला होता व त्याला कलाबूतवाला चांगलासा हार घातला होता. माझ्या छातीत धस्स झालं. फोटोतली व्यक्ती ओळखीची नाही, हे पाहून जीव भांडय़ात पडला.
‘‘काका, घाबरू नका. तो एका रिक्षावाल्याचा फोटो आहे.’’ अनूने खुलासा केला.
‘‘तो तुमच्या नात्यातला होता का?’’ मी विचारलं.
 
स्नेहाची आंघोळ Print E-mail
भरत मयेकर -  रविवार  ५ सप्टेंबर २०१०
आज सकाळी मी माझ्या लेकीच्या- स्नेहाच्या आंघोळीची तयारी करत होते आणि अरे देवा, साबणच नव्हता की हो घरात. म्हणजे तसे थोडय़ा वापरून झालेल्या दोन वडय़ा होत्या, पण आम्ही- म्हणजे मी आणि माझी लेक एक वडी फार तर ३-४ दिवस वापरतो. अहो का म्हणून काय विचारता? टी. व्ही.वरल्या जाहिराती पाहात नाही का तुम्ही? त्यात कधी तरी कोणी बरबटलेला, झिजलेला साबण वापरताना पाहिलाय का तुम्ही? मग? आपल्या त्वचेची आणि सौंदर्याची काळजी घ्यायची म्हणजे एवढे करायलाच हवे ना?
 
रोखठोक आणि सटरफटर Print E-mail
अशोक जैन , रविवार, २९ ऑगस्ट २०१०
सांप्रत मराठी वाङ्मयात टिंब व चिंब लेखकांचा सुळसुळाट झाला आहे. टिंब जमातीतील लेखक आपल्या लिखाणातून काही भरीव आशय व्यक्त करावयाचा असेल तर टिंबांचा मुबलक वापर करतात. काही नतद्रष्ट लोकांना हे निर्थक वाटते, पण टिंबातच असतो सारा आशय. टिंबे टिंबे (जल) आशय साचे असा या लेखकांचा दावा असतो. टिंब लेखक शब्दांचा कमीत कमी वापर करतात. याउलट चिंब जमातीतील लेखक शब्दांचा भरमसाट वापर करतात. त्यांच्या शब्दाशब्दातून हळुवार भावनांचे कढ पाझरत असतात. अशा या दोन्ही संप्रदायांची--- (म्हणजे मान्यवर) समीक्षकांनी दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
 
‘(सा) सू’ संवाद! Print E-mail
अनुराधा कोरडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०
हॅलोऽऽ? हॅलो आई,
‘‘मी xxx बोलतेय्. ‘फ्रेन्डशिप डे’च्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केलाय्..’’
‘हो, हो.. थँक्स! फ्रेन्डशिप डेच्या निमित्तानं मी तुझ्या शुभेच्छा स्वीकारते; आणि ‘अ‍ॅप्रिशिएट’सुद्धा करते. कुणा तरी पोएटनं म्हणून ठेवलंय की, सुनेशी नातं हवं ते मैत्रिणीचं.. म्हणजे दोघीत ‘मॅच’ होऊन ‘अंपायर’ अडचणीत येत नाही. निर्णय देतांना तो अडकित्त्यांत सापडतो नं! तो एकीचा नवरा तर एकीचा मुलगा..!’
 
कोण आहे रे तिकडे? Print E-mail
अनिल हर्डीकर - रविवार, २२ ऑगस्ट २०१०
माझ्या नातेवाईकांमध्ये प्रत्येक विषयावर प्रत्येकाची स्वतंत्र मतं आहेत. नाही म्हणायला ‘मी आळशी आहे’ या एकाच गोष्टीवर मतैक्याची मोहर आहे. ‘आळस’ हा सर्वसामान्य माणसं समजतात त्याप्रमाणे दुर्गुण नसून त्या उलट समाजाला पोषक, उपकारक, हितकारक असा सद्गुण आहे, असं माझं मत आहे. त्यामुळे मी एकमताने आळशी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे.
 
बाल दंतकथा Print E-mail
र. म. शेजवलकर, रविवार १५ ऑगस्ट २०१०
लहान मुलांची दाताची ट्रीटमेंट करणं हे एक मोठ्ठं आव्हानच असतं, म्हणजे आव्हान ट्रीटमेंट करण्याचं नसतं तर त्या लहान मुलाला ट्रीटमेंटसाठी तयार करण्याचं असतं. आधीच बऱ्याचदा घरच्या माणसांनी त्याला घाबरवलेलं असतं आणि त्यात आमच्या दाताच्या दवाखान्यातील वेगवेगळी हत्यारं, उपकरणं वगैरे नेहमीपेक्षा वेगळ्या गोष्टी पाहून लहान मूल आणखीनच भेदरतं आणि मग आरडाओरडा, रडारड, समजून काढणाऱ्यांचे चढे आवाज असे गोंधळाचे दृश्य दिसू लागते.
 
मा. सुरेशभाई यांसी, Print E-mail
चंद्रहास मिरासदार, रविवार १५ ऑगस्ट २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मा. सुरेशभाई यांसी,
ललित मोदीचा साष्टांग दंडवत, कोपरापासून नमस्कार इ. इ..
तुमच्या महाराष्ट्रात पत्राच्या मायन्यात स. न. सा. न. सा. दं. एवढेच ( तेही शॉर्ट फॉर्मममध्ये) लिहिण्याची प्रथा आहे. असे असताना मी तुम्हाला साष्टांग दंडवत घातला आणि कोपरापासून नमस्कारही केलाय, याचं कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटू शकते. पण या दोन्हीस आपण पात्र आहात असे आजकालचे वृत्तपत्र उघडल्यावर जाणवते. असो. तुम्हाला मी  इनलॅंड का पाठविले ( इनलॅंड म्हणजे आंतर्देशीय) याचेही तुम्हाला नवल वाटू शकते.
 
मूषक मामानामा Print E-mail
उज्ज्वल भातखंडे - रविवार ८ ऑगस्ट २०१०
एक दिवस पहाटेच मी अथर्वशीर्ष म्हणत बसले होते आणि अचानक ‘अय्या!..’ योगिताच्या या भीतीयुक्त आश्चर्योद्गारांनी मी एकदम भानावर आले आणि स्वयंपाकघरात पळाले. (अहो हो! पळाले म्हणजे गजगतीनेच)
हे पाहिलं का? मामासाहेब आलेले आहेत.
कशावरून? मी विचारलं.
अहो, केळी फस्त केलेत. योगिता फणफणली.
अगं आज संकष्टी आहे ना? मी पटकन बोलून गेले. अथर्वशीर्षांच्या ट्रान्समधून मी अजून बाहेर पडले नव्हते.
 
मालक झाऽऽलं! Print E-mail
संध्या साठे-जोशी - रविवार ८ ऑगस्ट २०१०
मराठी भाषा वळवावी तशी वाकते म्हणतात. शब्द तेच, पण संदर्भ बदलले की त्याला कसा वेगळा अर्थ प्राप्त होतो, त्याचे वेगवेगळ्या क्षेत्रांतील हे गमतीदार प्रसंग.
आमच्या जिल्ह्यात साक्षरता अभियान चालू होतं त्या काळातली गोष्ट. साक्षरतेसंबंधी जनजागृती करण्यासाठी म्हणून जी पहिली सभा बोलाविली गेली त्याला शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक यांच्यासोबत गावच्या सरपंचांनाही निमंत्रित केले होते.
 
मुलीचं वय उलटून चाललंय! Print E-mail
जयवंत कोरगावकर, रविवार १ ऑगस्ट २०१०
‘‘बापू! तुम्ही स्वस्थ पडा पाहू. किती काळजी कराल सगळ्यांची? आई येईल आता देवळातून.’’ सुजाता केसांच्या वेण्या घालीत म्हणाली.
‘‘बाई! बाई! बाई, शर्थ झाली यांच्या झोपेपुढे! अहो असे झोपून काय राहता?’’
‘‘अगं आई, मीच त्यांना आराम करायला सांगितले,’’ सुजाताने सांगितले.
‘‘अगं पण, तुझ्यासाठी स्थळ पाह्यला यांना कांदिवलीला जायचं आहे ना?’’
‘‘ते जातील गं जेवल्यावर. एवढी घाई काय आहे?’’ सुजाता म्हणाली.
 
माझाच ‘प्रॉब्लेम’ Print E-mail
माधव गवाणकर, रविवार १ ऑगस्ट २०१०
कुळथाचे पीठ, वरीचे धान्य, कपडय़ाचा साबण अशा अनेक वस्तूंची यादी माझ्या गळ्यात अडकवून मग बायकोने मला बाजाराकडे ‘सोडले’. कारण सांगितलेले बहुतेक जिन्नस मी विसरतो.
अकरावीच्या वर्गात जाऊन बारावीचे मानसशास्त्र शिकवायला सुरुवात केल्यावर विद्यार्थ्यांना माझ्याच ‘मानसिकते’बद्दल काळजी वाटू लागली.
 
‘डें’जरस Print E-mail
शंकर पु. देव - रविवार, २५ जुलै २०१०
आला दिवस (कसाबसा) साजरा करणे हे आमचे कर्तव्य कर्म आम्ही बायकोशी इमान राखून पार पाडतो. कधी कधी तर पार पडण्याची वेळ येते. पाहुणे आले तर त्यांना उठा-बसा करण्यात महिना संपायच्या आधीच ‘कसा’ खाली होतो. आता या इंधन दरवाढीने आमचेच धन रोजच्या रोज आणखी कमी होणार. एवढे सगळे असूनही दिवस साजरे करण्यात लोक मागे पडत नाहीत. बरे प्रत्येक महिन्याचे कॅलेंडर उघडावे तो दर महिन्यातच नव्हे तर दर आठवडय़ाला कोणता ना कोणता तरी ‘डे’ असतोच, पण त्यामुळे पेपरवाल्यांना आयताच विषय मिळतो आणि मग हा डे कसा साजरा करावा याचे को‘डे’ पडू नये म्हणून वाचकांकडून मते मागवली जातात.
 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 1 of 2

ताज्या बातम्या



लोकरंग

‘चिनी ज्यादा’ !

अनिकेत साठे - रविवार, ५ सप्टेंबर २०१०
( sathe.aniket@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चिनी लष्कराच्या मुक्त संचारामुळे भारताची चिंता वाढली असून त्यामागे ‘ड्रॅगन’ची नेमकी काय चाल आहे, असा प्रश्न होतो. त्याचे उत्तर शोधताना हा विषय केवळ गिलगिटपुरताच मर्यादित नाही, तर त्याला विविध स्वरूपाचे कंगोरे असल्याचे लक्षात येते. अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून संरक्षण क्षेत्रात अफाट गुंतवणूक करणारा चीन सध्या जी पावले टाकतो आहे, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाही गर्भित इशारा देण्याचा भाग आहे.

दिनदर्शिका

गुरुवार, ९ सप्टेंबर २०१०. मिती भाद्रपद शुद्ध प्रतिपदा १२ क. ०८ मि.पर्यंत. उत्तरा  नक्षत्र २० क. ५१ मि.पर्यंत. कन्या चंद्र. सूर्योदय- ६।२६ सूर्यास्त- ६।४६
मेष
- शत्रूंवर लक्ष ठेवा, वृषभ - मुलांचे प्रश्न सुटतील, मिथुन - घरात शांतता ठेवा, कर्क - छोटे-मोठे प्रवास होतील, सिंह - अचानक दडपण वाढतील, कन्या - महत्त्वाचे निर्णय घ्याल, तूळ - देवघेवीत चुका करू नका, वृश्चिक - पैसा हाती येईल, धनू - सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, मकर - प्रयत्न कारणी लागतील, कुंभ - अडचणींचा दिवस, मीन - शासकीय कामे होतील.
शुभराशी : वृश्चिक / धनू / मकर