|
|
फ्रंट एलिव्हेशन - शनिवार , ४ सप्टेंबर २०१० प्रा. मोहन निकम (आर्किटेक्ट)
 आम्ही मोठमोठाले धरण बांधले आणि त्याचं पाणी नळाद्वारे हवं तसं खेळवतो म्हणजे आम्ही जलतत्त्वावर विजय मिळवला. आम्ही आकाशात विमान चालवतो म्हणजे वायुवर विजय मिळवला. आम्ही आगीचा उपयोग हवा तसा करतो. स्वयंपाकघरात तिला इवल्याशा गॅसच्या रूपात वापरतो किंवा कारखान्यांत भट्टीसारखा तिचा वापर करतो म्हणजेच आम्ही अग्नीवर विजय मिळवला. जमीनीवर हव्या तेवढय़ा आकाराचे आम्ही टॉवर बांधतो म्हणजे आम्ही पृथ्वीवरही विजय मिळवला.
|
संजय पाटील - शनिवार , ४ सप्टेंबर २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
 वास्तुरंगचा आजचा अंक पर्यावरण विशेष आहे. लेखमालेच्या अगदी सुरुवातीला आपण झाडांच्या वास्तुनियमांची विस्तृतपणे माहिती घेतली होती. बहुसंख्य वाचकांनी लेखमाला वाचायला उशिरा सुरुवात केली असं त्यांच्या मेलवरून समजतंय. झाडांचे सर्व भाग त्यांनी मिस केले. म्हणून आजच्या पर्यावरण विशेषांकाच्या निमित्तानं फक्त संकीर्ण स्वरूपात वृक्षनियमांची माहिती आपण घेणार आहोत.
|
सुधीर मुकणे - शनिवार , ४ सप्टेंबर २०१० ८२१३८६६१४
आजच्या काळात ‘रिअल इस्टेट’ हे खूप मोठे व्यापक क्षेत्र झाले असून स्थापत्यशास्त्रामध्ये समाविष्ट असलेली इमारत बांधकाम (घर बांधकाम) ही उपशाखा खूप महत्त्वाची, जरुरीची व गरजेची मानली जाते. आर्किटेक्ट, डिझायनर्स, सिव्हिल इंजिनीअर्स ते सजावट करणाऱ्या इंटिरिअर डेकोरेटर्सपर्यंत सर्वाचेच योगदान असलेली ही एक खूप मोठी साखळी आहे. यांच्याशिवाय कोणत्याही घराची उभारणी होऊ शकणार नाही, होऊ शकत नाही.आजच्या काळातील शहर भागाप्रमाणे ग्रामीण भागातसुद्धा झपाटय़ाने सुधारणा होत असल्याचे चित्र बघण्यास मिळते.
|
उमेश वाघेला - शनिवार , ४ सप्टेंबर २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आपले घरटय़ाचे बांधकाम मजबूत व्हावे असा प्रयत्न तर सर्वच पक्ष्यांचा असतो. पण त्याचबरोबर घरटय़ात थोडी अंतर्गत सजावट करावी, असे पक्ष्यांनाही का वाटू नये? चित्र-विचित्र वस्तूंचा उपयोग करून आपले घरटे आणखी सुंदर बनवणाऱ्या चिरक या पक्ष्याविषयी.. राखी तितर आणि अन्य माळरानातल्या पक्ष्यांच्या निरीक्षणासाठी दिवेघाटात गेलो होतो. या भागात वनविभागाने जमिनीत पावसाचे पाणी मुरण्यासाठी २००८ साली आठ हजार आठशेपेक्षा अधिक चर खोदून अनेक झाडांचे रोपण केले आहे.
|
रजनी देवधर - शनिवार , ४ सप्टेंबर २०१०
पर्यावरण, माणसांसह सर्व प्राणीमात्रांच्या जीवनातील महत्त्वाचा घटक त्याच्या रक्षणाची जबाबदारी अर्थातच सर्वात प्रगत असलेल्या मनुष्यजातीवरच येते, परंतु प्रत्यक्षात त्याचा अधिकाधिक ऱ्हास माणसांकडूनच केला जातो. आधुनिकतेच्या आंधळ्या हव्यासापोटी भोवतालच्या परिसराची साधी, सोपी वैशिष्टय़े लक्षात घेतली जात नाहीत. परिणामी परिसर, हवामान, जीवनमान याच्याशी पूर्णत: विसंगत निवासस्थाने उभारली जातात व कधी पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणातून तर कधी जसे आहे तसे स्वीकारण्याच्या अगतिकतेतून ती स्वीकारलीही जातात.
|
शांताराम कोटकर - शनिवार , ४ सप्टेंबर २०१०
 पूर्वी वास्तव्य असलेल्या गोविळ या गावी आजोबांचे निधन झाल्यानंतर आमची आजी कै. पार्वतीबाई धोंडू कोटकर मुलांसह गोविळ गाव सोडून अंदाजे १९१७-१८च्या दरम्यान शिपोशी गावी राहावयास आली. तेथील आपल्या बहिणीच्या व जाधव कुटुंबीयांच्या सहकार्याने छोटेशे घर बांधून राहू लागली. मुले थोडी मोठी झाली तेव्हा एक-दोन मुलांना वाडीतील भार्गवनाना आठल्ये व गावातील ब्राह्मण लोकांकडे गुरे राखावयास ठेव, बाकीच्या मुलांना घेवून, खोत लोकांची शेती वाटय़ाने करावयास घे, असे करत उदरनिर्वाह चालवत होती. काही वर्षांनी आमचे मोठे काका व माझे बाबा यांना कामानिमित्त मुंबईला पाठविले.
|
डी. आर. कुलकर्णी , शनिवार , २८ ऑगस्ट २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
संपर्क : ९४२०८६१६६४ चित्र - अलका रोडे
 सहकारी गृहनिर्माण संस्थेची इमारत व ती इमारत ज्या भूखंडावर उभी राहिली आहे, ती जमीन विशिष्ट कालावधीत संबंधित संस्थेच्या नावे हस्तांतर न करणाऱ्या बिल्डरांना चाप लावण्यासाठी सरकारने केलेल्या कायद्यातील बदलाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय अखेर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. जवळपास पाच वर्षे चाललेल्या या प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग पूर्ण झाला असला, तरी अजूनही नियमावलीची अधिसूचना निघाली नसल्यामुळे आडात पाणी असूनही भांडे नसल्याने ते काढता येत नाही, अशी एकूण परिस्थिती आहे. या संदर्भातील कायदा तुलनेने लवकर झाला, पण शेपूट मात्र अजूनही अडून बसले आहे.
|
मानीव हस्तांतराचा कायदा झाला, नियमावली झाली, लवकरच अधिसूचना निघेल ! अॅड. जयंत कुलकर्णी , शनिवार , २८ ऑगस्ट २०१०
 महाराष्ट्र शासनाने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील हजारो नोंदणीकृत सहकारी संस्थांना त्यांच्या इमारती ज्या जमिनीवर उभ्या आहेत, त्या जमिनीचे व इमारतीचे अभिहस्तांतर सहा महिन्यांत विकसकाने संस्थेच्या नावे करून न दिल्यास शासन मानीव अभिहस्तांतर प्रक्रिया सुरू करेल, अशी सज्जड तंबी दिली आहे. तसेच महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिकांचे नियम १९६४ मध्ये प्रस्तावित केलेल्या नियमावलींना अंतिम मान्यता दिल्याचे जाहीर केले.
|
संजय पाटील , शनिवार , २८ ऑगस्ट २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
 तरुण-तरुणींना आपल्या प्रथा परंपरांची ओळख करून घ्यावीशी वाटतेय इतकंच नव्हे तर त्या फॉलो कराव्यात असंही वाटतंय ही आनंदाची बाब आहे. शेवटी ऋषीमुनींच्या विचारांच्या बैठकीतून तयार झालेल्या या प्रथा आहेत. वसिष्ठ, अगस्ती, कश्यप, पातंजली, पराशर..असे शेकडो ज्ञानवंत म्हणजे आमचे पूर्वज. गीतेत म्हटलंय की शौच (पवित्रता), संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे आयुष्याचे नियम आहेत. शौच म्हणजे जीवन पवित्र आहे असं मानणं. कुठल्यातरी पापाचा परिणाम म्हणून आपण जन्माला आलेलो नाही किंवा आपण माकडाचे वंशज नाही. आपण कोणत्या न कोणत्या ऋषीच्या कुळात जन्माला आल्याचे सांगत असतो.
|
शनिवार , २८ ऑगस्ट २०१०
 प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या नासिकपासून अवघ्या १२ मैलांवर आदिशक्तिपीठ सप्तश्रृंगी गडाकडे जाणाऱ्या वाटेवर दिंडोरी हे सुंदर गाव वसले आहे. त्या दिंडोरीत अग्निहोत्री कुटुंबीयांचे अत्यंत रेखीव प्राचीन असे राम-कृष्ण मंदिर आहे. अग्निहोत्री कुटुंबीय सात्त्विक तसेच धार्मिक प्रवृत्तीचे! माझे पणजोबा कै. रंगनाथ दाजी अग्निहोत्री सन १८५० साली दिंडोरीपासून जवळच असलेल्या राजापूर या गावी प्रभू रामचंद्र, लक्ष्मण व सीतामाई यांच्या वालुकामय पाषाणांच्या मूर्तीची व सन १८६० च्या दरम्यान चार फुटी अत्यंत सुंदर व रेखीव अशा भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीची स्थापना केली. ही मूर्ती त्या वेळी जयपूरहून मागविण्यात आली होती.
|
शनिवार , २८ ऑगस्ट २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
 शहरातून कमी होत चाललेली चिमण्यांची संख्या हा चिंतेचा विषय आहे. निसर्गचक्राचे संतुलन जपण्यासाठी प्रयत्नशील निसर्गाने लालबुडय़ा बुलबुल पक्ष्याच्या संख्येत वाढ करून ती कमतरता भरून काढण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. वाढत्या वृक्षतोडीमुळे पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवासही नष्ट होत चालला आहे. निसर्गाचा नियम आहे- survival of The Fittest म्हणजेच परिस्थितीनुरूप जो स्वत:त बदल करून घेतो, असा सक्षम तोच जगतो. हे मला बुलबुलच्या या घरटय़ाचे निरीक्षण करताना समजले.
|
श्रीनिवास घैसास , शनिवार , २८ ऑगस्ट २०१० फोन - २५४०३३२४.
वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ज्या कुण्या आर्किटेक्टला मान्यता देण्यात आली असेल त्यांना नियुक्तीपत्र १५ दिवसांच्या आत देणे आवश्यक असते. तसेच सभेत मंजूर झाल्याप्रमाणे त्यांनी कोणती कामे करायची त्यासंबंधीच्या अटी व शर्ती या निश्चित करून सदर वास्तुविशारद व सल्लागार यांच्याशी करार करणेदेखील आवश्यक आहे. हे वास्तुविशारद व सल्लागार प्रकल्प अहवाल तयार करतील व तो संस्थेला सादर करतील. अशा प्रकारचा प्रकल्प अहवाल हा दोन महिन्यांच्या कालावधीत संस्थेला सादर करावा लागतो. या अहवालाला सोसायटीच्या कार्यकारी मंडळाच्या सभेची मान्यता घेणे जरुरीचे असते आणि त्यासाठी प्रथम काही गोष्टींची पूर्तता करावी लागते, त्या गोष्टी अशा :-
|
|
|
<< Start < Prev 1 2 Next > End >>
|
|
Page 1 of 2 |
|
लोकरंग
‘चिनी ज्यादा’ !
अनिकेत साठे - रविवार, ५ सप्टेंबर २०१० ( sathe.aniket@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चिनी लष्कराच्या मुक्त संचारामुळे भारताची चिंता वाढली असून त्यामागे ‘ड्रॅगन’ची नेमकी काय चाल आहे, असा प्रश्न होतो. त्याचे उत्तर शोधताना हा विषय केवळ गिलगिटपुरताच मर्यादित नाही, तर त्याला विविध स्वरूपाचे कंगोरे असल्याचे लक्षात येते. अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून संरक्षण क्षेत्रात अफाट गुंतवणूक करणारा चीन सध्या जी पावले टाकतो आहे, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाही गर्भित इशारा देण्याचा भाग आहे. |
दिनदर्शिका
गुरुवार, ९ सप्टेंबर २०१०. मिती भाद्रपद शुद्ध प्रतिपदा १२ क. ०८ मि.पर्यंत. उत्तरा नक्षत्र २० क. ५१ मि.पर्यंत. कन्या चंद्र. सूर्योदय- ६।२६ सूर्यास्त- ६।४६ मेष - शत्रूंवर लक्ष ठेवा, वृषभ - मुलांचे प्रश्न सुटतील, मिथुन - घरात शांतता ठेवा, कर्क - छोटे-मोठे प्रवास होतील, सिंह - अचानक दडपण वाढतील, कन्या - महत्त्वाचे निर्णय घ्याल, तूळ - देवघेवीत चुका करू नका, वृश्चिक - पैसा हाती येईल, धनू - सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, मकर - प्रयत्न कारणी लागतील, कुंभ - अडचणींचा दिवस, मीन - शासकीय कामे होतील. शुभराशी : वृश्चिक / धनू / मकर
|