|
|
|
वृत्तांत कॅम्पेन : टॅक्सी मिळेल का टॅक्सी?
|
|
|
|
|
प्राजक्ता कदम, शुक्रवार, ३० जुलै २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
नरिमन पॉइंटसारख्या परिसरात रात्रीच्या सुमारास सीएसटी किंवा चर्चगेटला जाण्यासाठी टॅक्सी हवी असेल तर अक्षरश: वणवण फिरावे लागते. या परिसरात टॅक्सीची वानवा आहे, असे अजिबात नाही. पण ‘भाई सीएसटी या चर्चगेट चलोगे’, असे वाक्य ऐकताच मुजोर टॅक्सीचालक चक्क तोंड फिरवितात. बोलणे तर दूर पण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची तसदीही ते घेत नाहीत. टॅक्सीचालकांचा मुजोरपणा परिसरातील नोकरदारांची डोकेदुखी ठरली आहे.
नरिमन पॉइंट हा पूर्णत: व्यावसायिक परिसर आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील अनेक कार्यालये रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. त्यामुळे रात्री १२ वाजल्यानंतरही सीएसटी आणि चर्चगेटकडे जाणाऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात असते. हा परिसर जसा व्यावसायिक आहे. त्याचप्रमाणे ओबेरॉय, मरीन प्लाझा, इंटरकॉन्टिनेन्टल, सम्राट अशी पंचतारांकित हॉटेल्ससुद्धा या परिसरात आहेत. त्यामुळे या हॉटेल्सच्या सभोवताली रात्रभर टॅक्सीच्या रांगा लागलेल्या असतात. परंतु तुम्ही जर एखाद्या टॅक्सीचालकाला सीएसटी किंवा चर्चगेटला येणार का म्हणून विचारले तर ते थेट नाही म्हणून सांगत ‘पुढे जा’ असे सुनावतात. एकीकडे शेवटची लोकल सुटण्याची भीती आणि दुसरीकडे टॅक्सी समोर उभी असतानाही तुम्हाला ‘नेणार नाही’ असे उत्तर टॅक्सीचालक देत असल्याने अनेकजणांचे या टॅक्सीचालकांसोबत खटकेही उडतात. जवळच्या अंतरावर जाणारे प्रवासी घेणार नाही? असा अतिरिक्त नियम या परिसरातील टॅक्सीचालकांनी केला आहे. त्यामुळे कमी अंतर असले म्हणून काय झाले आम्हीही पैसेच मोजतो आहोत ना? असे प्रवाशांकडून त्यांना सुनावले जाते. आता ‘मनसे’ हिसक्याचाही या मुजोर टॅक्सीचालकांवर परिणाम होताना दिसत नाही. उलट ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतात किंवा हुज्जत घालतात आणि ‘आरटीओ’कडे तक्रार करण्याचे सांगून, टॅक्सी क्रमांकही लिहून घेण्याचे उद्दामपणे सांगतात. टॅक्सीचालक हे एकप्रकारे सामाजिक सेवाच करतात. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याचा गांभीर्याने विचार केला जात आहे, असे परिवहन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नुकतेच जाहीर केले. मात्र टॅक्सीचालकांच्या या मुजोरपणाची बहुधा विखे-पाटील यांना कल्पना नसावी. ‘वोट बँके’साठी राजकीय नेते टॅक्सीचालकांचा हा मुजोरपणा दुर्लक्षित करून त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देतीलही. पण सर्वसामान्यांना दररोज या मुजोरपणाला सामोरे जावे लागते, त्यांना होणाऱ्या त्रासाचा शासन विचार करणार आहे का?
|
|
लोकरंग
‘चिनी ज्यादा’ !
अनिकेत साठे - रविवार, ५ सप्टेंबर २०१० ( sathe.aniket@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चिनी लष्कराच्या मुक्त संचारामुळे भारताची चिंता वाढली असून त्यामागे ‘ड्रॅगन’ची नेमकी काय चाल आहे, असा प्रश्न होतो. त्याचे उत्तर शोधताना हा विषय केवळ गिलगिटपुरताच मर्यादित नाही, तर त्याला विविध स्वरूपाचे कंगोरे असल्याचे लक्षात येते. अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून संरक्षण क्षेत्रात अफाट गुंतवणूक करणारा चीन सध्या जी पावले टाकतो आहे, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाही गर्भित इशारा देण्याचा भाग आहे. |
दिनदर्शिका
दिनांक ८ सप्टेंबर २०१० बुधवार मिती श्रावण वद्य अमावस्या १६ क. ०० मि. पूर्वा नक्षत्र २३ क. ५० मि. सिंह चंद्र २९ क. ५ मि.पर्यंत. सूर्योदय- ६।२६ सूर्यास्त- ६।४७. दर्श अमावस्या पोळा. मेष - योजना वेग घेतील, वृषभ - घरगुती प्रश्नांवर लक्ष ठेवा, मिथुन - महत्त्वाची कामे होतील, कर्क - जबाबदाऱ्या पूर्ण कराल, सिंह - नवे तंत्र यशस्वी ठरेल, कन्या - विचाराने पावले उचला, तुला - अनेकांचे सहकार्य मिळेल, वृश्चिक - प्रिय व्यक्तींच्या भेटी, धनु - मोठी उलाढाल होईल, मकर - थांबा बघा पुढे चला, कुंभ - वेळ वाया घालवू नका, मीन - मार्ग सापडतील, यश मिळेल. शुभराशी- मिथुन, सिंह, तुला.
|
Punya chya Auto waalyaanchi stithi paan kahi veglee nahi.
Tyanchi marjee aasel taar theek nahi taar saral toond vaakde karun "Nahi" mhana tyaana hi avvadta.
Aani te hi ratri navhe, diwassa paan swaatch paane saangu shaktat.