|
|
|
बाबूजींच्या स्मृतिदिनानिमित्त ‘गीतरामायण’
|
|
|
|
|
प्रतिनिधी, शुक्रवार, ३० जुलै २०१०
‘बाबूजींचे संगीत आणि ग. दि. माडगूळकर यांच्या लेखणीतून साकारलेले शब्द यामुळे गीतरामायणाने इतिहास घडविला. त्या काळात गाजलेले हे गीतरामायण आजच्या रसिकांनाही ऐकायला मिळावे म्हणूनच बाबूजींच्या पुण्यतिथीनिमित्ताने २००५ सालापासून आपण ‘गीतरामायण’ सादर करीत आहोत’, असे सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक श्रीधर फडके यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना सांगितले.
शुक्रवार, ३० जुलै रोजी सुधीर फडके यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त उत्सव मीडिया या संस्थेतर्फे शिवाजी मंदिर येथे रात्री ८ वाजता श्रीधर फडके ‘गीतरामायण’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. स्वयेश्री रामप्रभू ऐकती, कुश-लव रामायण गाती, स्वयंवर झाले सीतेचे, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, माता न तू वैरिणी, सेतू बांधा रे सागरी अशी मराठी जनमानसात तुफान लोकप्रिय ठरलेली गीतरामायणातील १४ गाणी सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात उत्सव मीडियाचे योगेश शिपोस्कर म्हणाले की, संगीतविषयक कार्यक्रमांचे आयोजन गेल्या काही वर्षांपासून करीत असल्यामुळे श्रीधर फडके यांनी ‘गीतरामायण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्याविषयी विचारणा केली होती. त्यानुसार आता शुक्रवारी हा कार्यक्रम सादर होणार आहे. बाबूजींच्या स्मृतीदिन गुरूवारी होता. त्यानिमित्त दरवर्षी आपण गीतरामायण सादर करतो. त्यांनी आणि गदिमांनी अजरामर केलेली गाणी लोकांच्या स्मरणात कायम राहावीत हाच या कार्यक्रमामागचा उद्देश आहे. त्यासाठी मोठा वाद्यवृंद न वापरता हार्मोनियम, कोरस, तालवाद्य, तबला एवढय़ाचाच वापर आम्ही करतो, अशी माहितीही श्रीधर फडके यांनी दिली.
|
|
लोकरंग
‘चिनी ज्यादा’ !
अनिकेत साठे - रविवार, ५ सप्टेंबर २०१० ( sathe.aniket@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चिनी लष्कराच्या मुक्त संचारामुळे भारताची चिंता वाढली असून त्यामागे ‘ड्रॅगन’ची नेमकी काय चाल आहे, असा प्रश्न होतो. त्याचे उत्तर शोधताना हा विषय केवळ गिलगिटपुरताच मर्यादित नाही, तर त्याला विविध स्वरूपाचे कंगोरे असल्याचे लक्षात येते. अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून संरक्षण क्षेत्रात अफाट गुंतवणूक करणारा चीन सध्या जी पावले टाकतो आहे, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाही गर्भित इशारा देण्याचा भाग आहे. |
दिनदर्शिका
गुरुवार, ९ सप्टेंबर २०१०. मिती भाद्रपद शुद्ध प्रतिपदा १२ क. ०८ मि.पर्यंत. उत्तरा नक्षत्र २० क. ५१ मि.पर्यंत. कन्या चंद्र. सूर्योदय- ६।२६ सूर्यास्त- ६।४६ मेष - शत्रूंवर लक्ष ठेवा, वृषभ - मुलांचे प्रश्न सुटतील, मिथुन - घरात शांतता ठेवा, कर्क - छोटे-मोठे प्रवास होतील, सिंह - अचानक दडपण वाढतील, कन्या - महत्त्वाचे निर्णय घ्याल, तूळ - देवघेवीत चुका करू नका, वृश्चिक - पैसा हाती येईल, धनू - सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, मकर - प्रयत्न कारणी लागतील, कुंभ - अडचणींचा दिवस, मीन - शासकीय कामे होतील. शुभराशी : वृश्चिक / धनू / मकर
|