मुखपृष्ठ >> लेख >> आजपासून गझल फेस्टिव्हल
 


स्पर्धेचे नियम व अटी




आजपासून गझल फेस्टिव्हल Bookmark and Share Print E-mail
प्रतिनिधी, शुक्रवार, ३० जुलै २०१०
‘एफेस्टिव्हल ऑफ गझल्स’ हा कार्यक्रम यंदा ३० व ३१ जुलै रोजी मुंबईतील ऑबेरॉय हॉटेलमध्ये होणार आहे. या गझल फेस्टिव्हलमध्ये प्रेक्षकांकडून जमा होणारा निधी कॅन्सर पीडित रूग्णाच्या मदतीसाठी दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे या फेस्टिव्हलमधून नवीन गझल गायकांना संधी देण्यात येते. या वर्षी हा फेस्टिव्हल हिंदी चित्रपट संगीतात गझल व इतर लोकप्रिय गाण्यांना वेगळी ओळख निर्माण करून देणारे गायक व चित्रपट नायक तलत महमूदजींना समर्पित करण्यात आला आहे.
या फेस्टिव्हलमध्ये पंकज उदास, अनुप जलोटा, राजेंद्र मेहता, हरी हरन, तलत अझीझ, पं. अजय पोहनकर व अभिजीत पोहनकर, सुजाता खान, अहमद व महमद हुसेन, कविता सेठ, मधुश्री, सुहेल रईस खान, खुशबू खानम इ. गायक सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या देणगी प्रवेशिका ऱ्हिदम हाऊस, कालाघोडा येथे उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी २२८४२८३५ या क्रमांकावर संपर्क  साधा.
प्रतिक्रिया येथे नोंदवा
तुमची संपर्क माहिती:
प्रतिक्रिया:

!joomlacomment 4.0 Copyright (C) 2009 Compojoom.com . All rights reserved."

 

ताज्या बातम्या



लोकरंग

‘चिनी ज्यादा’ !

अनिकेत साठे - रविवार, ५ सप्टेंबर २०१०
( sathe.aniket@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चिनी लष्कराच्या मुक्त संचारामुळे भारताची चिंता वाढली असून त्यामागे ‘ड्रॅगन’ची नेमकी काय चाल आहे, असा प्रश्न होतो. त्याचे उत्तर शोधताना हा विषय केवळ गिलगिटपुरताच मर्यादित नाही, तर त्याला विविध स्वरूपाचे कंगोरे असल्याचे लक्षात येते. अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून संरक्षण क्षेत्रात अफाट गुंतवणूक करणारा चीन सध्या जी पावले टाकतो आहे, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाही गर्भित इशारा देण्याचा भाग आहे.

दिनदर्शिका

दिनांक ८ सप्टेंबर २०१० बुधवार मिती श्रावण वद्य अमावस्या १६ क. ०० मि. पूर्वा नक्षत्र २३ क. ५० मि. सिंह चंद्र २९ क. ५ मि.पर्यंत. सूर्योदय- ६।२६ सूर्यास्त- ६।४७. दर्श अमावस्या पोळा.
मेष -
योजना वेग घेतील, वृषभ - घरगुती प्रश्नांवर लक्ष ठेवा, मिथुन - महत्त्वाची कामे होतील, कर्क - जबाबदाऱ्या पूर्ण कराल, सिंह - नवे तंत्र यशस्वी ठरेल, कन्या - विचाराने पावले उचला, तुला - अनेकांचे सहकार्य मिळेल, वृश्चिक - प्रिय व्यक्तींच्या भेटी, धनु - मोठी उलाढाल होईल, मकर - थांबा बघा पुढे चला, कुंभ - वेळ वाया घालवू नका, मीन - मार्ग सापडतील, यश मिळेल.
शुभराशी- मिथुन, सिंह, तुला.