मुखपृष्ठ >> बातम्या >> वाचनरंग : साहित्यवार्ता : परिवर्तनवादी चळवळी क्षीण - उद्धव कांबळे
 

पुणे वृत्तान्त



स्पर्धेचे नियम व अटी




वाचनरंग : साहित्यवार्ता : परिवर्तनवादी चळवळी क्षीण - उद्धव कांबळे Bookmark and Share Print E-mail
एकंदरीत सर्व समाजाची दुरावस्था झाली आहे. अलीकडे संसदीय किंवा न्यायपालिका या संस्थांच्या ऱ्हासामुळे समाज विविध समस्यांच्या ओझ्याखाली दबला जात आहे. परिवर्तनवादी चळवळ क्षीण झालेल्या आहेत. समाजाच्या प्रश्नांचे त्यांना भान नाही. हे थांबवायचे असेल तर पुरोगामी शक्तींनी एकत्रित कृती करण्याची गरज आहे, असे मत कारागृह महानिरीक्षक उद्धव कांबळे यांनी व्यक्त केले.
प्रा. अविनाश डोळस यांनी ‘लोकसत्ता-मराठवाडा वृत्तांत’मध्ये केलेल्या लिखाणाचे ‘सम्यक दृष्टीतून’ हे पुस्तक निर्माण झाले आहे. या पुस्तकाचे विमोचन मौलाना आझाद संशोधन केंद्राच्या सभागृहात माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्धव कांबळे बोलत होते. या समारंभाला प्राचार्य डॉ. ल. बा. रायमाने स्वरूप प्रकाशनचे संचालक आणि साहित्यिक डॉ. वासुदेव मुलाटे हे उपस्थित होते.
गेल्या साठ वर्षांमध्ये विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या उत्पादनांचे साधन असलेल्या शेतजमिनी हडपण्यात आलेल्या आहेत. विकासाचा आधार घेत शेतजमिनीवर घाला घालून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले जात आहे. शहरीकरण, सेझ आणि उद्योगाच्या नावाखाली जमिनी हस्तांतरित केल्या जात आहेत. केवळ नफा कमविण्यासाठी शेतकऱ्यांकडून माफक दराने जमिनी बळकाविल्या जात आहेत. या जमिनीचे स्थावर मालमत्तेत रूपांतर करून गडगंज नफा कमविला जात आहे, असे उद्धव कांबळे म्हणाले. समाजव्यवस्थेमुळे शेतीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. गेल्या पंचवीस वर्षांपासून शेतीला दुर्लक्षित करण्यात आले आहे. याची सत्यता नियोजन आयोगाच्या अहवालात मिळते. संस्थात्मक ऱ्हास, नेतृत्व करणाऱ्यांचे अपयश, सेझ, शेतकरी, धम्म अशा सर्वसमावेशक तत्कालिन मुद्दय़ावर भाष्य करणाऱ्या लेखकाचा हा संग्रह म्हणजे सम्यक दृष्टिकोण आहे. श्री. डोळस यांचे लेखन नेहमीच नवा दृष्टिकोण देत असल्याचे त्यांनी सांगितले. चालू घडामोडींवर दैनिकात येणारे लेख हे तत्कालिन असतात, असा सर्वाचा विचार आहे. मात्र श्री. डोळस यांचे सर्व लेख तत्कालिन नाहीत. नेहमी नवा दृष्टिकोण देणारे हे लेख आहेत, असे श्री. कांबळे म्हणाले.
राजकारण असो की अन्य क्षेत्र सार्वजनिक जीवनात असणारा माणूस हद्दपार होत आहे. समाजात अनेक प्रकारचे अंतर्विरोध आले आहेत. एकीकडे समाज परिवर्तनासाठी लिहिलेले समाजातील सर्व स्तरांत वाचले जायचे. अलीकडे दैनंदिन जीवनात त्याचे कमी प्रमाणात आचरण केले जाते, असे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले म्हणाले.
 प्रा. डोळस यांच्याबद्दल बोलताना डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, सामाजिक दृष्टिकोण असल्याशिवाय नीटपणे विवेचन करता येत नाही. जनसामान्यांत वावरताना काही प्रश्न निर्माण होत असतात. त्याचे उत्तर देण्यासाठी लेखकाकडे सम्यक दृष्टी असावी लागते, असेही डॉ. कोत्तापल्ले म्हणाले.
 ऋतूंचे उत्सव साजरे करायला हवे
स्त्रिया तसेच काही प्रमाणात पुरुषही रुढी-परंपरेचे बळी ठरत असतात. यासाठी धार्मिक उत्सवांचे मूळ शोधले पाहिजे. त्यातील भेदाभेद नष्ट करून स्त्री-पुरुषांनी ‘माणूस’ म्हणून जवळ यायला हवे आणि ऋतूंचे उत्सव साजरे करायला हवे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां विद्या बाळ यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि साधना प्रकाशनने प्रकाशित केलेले प्रा. सुमन ओक लिखित ‘सणांचे कूळ उत्सवांचे मूळ’ या पुस्तकाचे प्रकाशन बाळ यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर, कार्यवाह मिलिंद देशमुख, डॉ. राजेंद्र कांकरिया उपस्थित होते.
बाळ म्हणाल्या, ‘आपण ‘चूप बसा संस्कृती’ ला प्रश्न विचारले पाहिजेत. धार्मिक, व्रतवैकल्यांवर स्वतंत्रपणे विचार करायला हवा. धार्मिक कथांमध्ये क्रौर्य, असूया, लंपटपणा या गोष्टी अधिक आहेत. या सर्व गोष्टींवर विचारमंथन होण्याची आणि त्यानुसार कृती करण्याची गरज आहे.’
डॉ. दाभोलकर म्हणाले, ‘कर्मकांडामुळे बौद्धिक आळस निर्माण होतो. यातून मानसिक दुबळेपण येऊन गुलामगिरीच आवडायला लागते. प्रत्येक संस्कृतीत कर्मकांडे असतात. पण शोषण करणारी, विज्ञानाला नाकारणारी कर्मकांडे नको आहेत.
प्रा. ओक म्हणाल्या, ‘धार्मिक कर्मकांडांमुळे ब्राह्मण-भिक्षुकांच्या पोटापाण्याची सोय करणे, अडाण्यांना फसवणे, स्त्रियांना ताब्यात ठेवणे अशा गोष्टी आजवर केल्या गेल्या. त्यामुळे या रुढी-प्रथांमागचे मूळ शोधण्याचा मी प्रयत्न केला आहे. यातून पुरुषप्रधान चरित्रनायकांना महत्त्व देणे, राक्षसांना क्रूर समजणे अशा गोष्टी कळाल्या. आपल्याकडे स्त्रियांच्या जयंत्या का साजऱ्या केल्या जात नाहीत. याचे उत्तर धार्मिक कर्मकांडात आहे.’
विनोद शिरसाठ यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी आभार मानले.                      
प्रतिक्रिया येथे नोंदवा
तुमची संपर्क माहिती:
प्रतिक्रिया:

!joomlacomment 4.0 Copyright (C) 2009 Compojoom.com . All rights reserved."

 

ताज्या बातम्या



लोकरंग

साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे!
साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ
अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०

साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप  सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे.

दिनदर्शिका

४ सप्टेंबर २०१०. शनिवार, मिती श्रावण वद्य दशमी ८ क. १४ मि.पर्यंत, आद्र्रा नक्षत्र १२ क. ३३ मि.पर्यंत, मिथुन चंद्र २९ क. २१ मि.पर्यंत. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५०.
मेष
- प्रवासाचा योग आहे. वृषभ- परिवारातील प्रश्न सुटतील. मिथुन- उत्साही घटनांचा दिवस. कर्क- विचाराने निर्णय घ्या. सिंह- मोठय़ा व्यक्तींच्या भेटी. कन्या- कला साहित्यात यश. तूळ- नवीन उपक्रमात सफलता. वृश्चिक- बेसावध राहू नका. धनू- सतर्क राहा. मकर- प्रलोभनापासून दूर राहा. कुंभ- निराश होऊ नका. मीन- जागेचा प्रश्न सुटेल.
शुभराशी - मिथुन, तूळ मीन.