|
|
|
वृत्तांत कॅम्पेन : रिक्षा-टॅक्सी चालकांना ओळखपत्रे देण्याची योजना कागदावरच
|
|
|
|
|
प्रतिनिधी - शुक्रवार, २१ मे २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मुजोर रिक्षा-टॅक्सी चालकांच्या बेबंदशाहीला आळा घालण्यासाठी त्यांना ओळखपत्रे देण्याचे निर्देश परिवहन आयुक्त कार्यालयाने गेल्या मार्च महिन्यात जारी केले आहेत. याबाबतची अधिसूचना जारी होऊन तब्बल दीड महिना उलटला, तरी अजूनही याबाबतची योजना कागदावरच आहे.
आरटीओ कार्यालयांतर्फे रिक्षा-टॅक्सी चालकांना देण्यात येणारी ओळखपत्रे सहा बाय सहा आकाराची असतील. आरटीओंकडून साक्षांकित करण्यात येणाऱ्या या ओळखपत्रांवर त्यांचे संपूर्ण नाव, पत्ता, छायाचित्र आणि ड्रायव्हिंग लायसन्सविषयीची इत्थंभूत माहिती असेल. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास भाडे नाकारणाऱ्या, बेशिस्त वर्तन करणाऱ्या किंवा फसवणूक करणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांविरुद्ध दाद मागणे प्रवाशांना सोपे जाईल. तसेच अंमलबजावणी एजन्सींना त्यांच्याविरुद्ध धडकपणे कारवाई करता येईल, असे आरटीओतील सूत्रांचे म्हणणे आहे. ओळखपत्र देण्याच्या या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याची सूचना मुंबईसह राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (आरटीए) आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (आरटीओ) परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली होती. त्याला रिक्षा-टॅक्सी युनियनकडूनही विरोध झालेला नाही. तरीसुद्धा ही अधिसूचना जारी होऊन दीड महिना उलटल्यानंतरही मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून (एमएमआरटीए) याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. शासनाने टॅक्सी परवान्यांच्या हस्तांतरणास दिलेली मुभा आणि देशातील वाढत्या दहशतवादी कारवायांच्या पाश्र्वभूमीवर रिक्षा-टॅक्सी चालकांना ओळखपत्रे देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे मार्च महिन्यात जारी अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. मुजोर रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मुसक्या आवळणे, हा या अधिसूचनेमागील सुप्त हेतू असल्याचे परिवहन आयुक्त कार्यालयातील सूत्रांचे म्हणणे आहे. महिला, अपंग व अज्ञान रिक्षा-टॅक्सी परवानाधारक वगळता अन्य परवानाधारकांना किमान आठ तास रिक्षा-टॅक्सी चालविण्याची सक्ती करावी आणि परवानाधारकांखेरीज अन्य रिक्षा-टॅक्सी चालविणाऱ्या एक अथवा दोन चालकांच्या नावांची नोंद आरटीओ कार्यालयांकडे करण्यात यावी, असेही निर्देश परिवहन आयुक्त कार्यालयाने दिले आहेत. मात्र हेसुद्धा निर्णय अद्याप कागदावरच आहेत. मुंबईत सुमारे ५३ हजार टॅक्सी आणि तब्बल एक लाखांहून अधिक रिक्षा असून दररोज लाखो प्रवासी त्या माध्यमातून प्रवास करतात. मात्र त्यांच्या विरोधातील जवळचे भाडे नाकारणे, गैरवर्तन करणे, मीटर जलद करून जास्त भाडे आकारणे यासारख्या तक्रारी वाढल्याने आरटीओ कार्यालयांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे रिक्षा-टॅक्सी चालकांच्या बेबंदशाहीला आळा घालणे, क्रमप्राप्त बनले आहे.
|
|
लोकरंग
‘चिनी ज्यादा’ !
अनिकेत साठे - रविवार, ५ सप्टेंबर २०१० ( sathe.aniket@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चिनी लष्कराच्या मुक्त संचारामुळे भारताची चिंता वाढली असून त्यामागे ‘ड्रॅगन’ची नेमकी काय चाल आहे, असा प्रश्न होतो. त्याचे उत्तर शोधताना हा विषय केवळ गिलगिटपुरताच मर्यादित नाही, तर त्याला विविध स्वरूपाचे कंगोरे असल्याचे लक्षात येते. अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून संरक्षण क्षेत्रात अफाट गुंतवणूक करणारा चीन सध्या जी पावले टाकतो आहे, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाही गर्भित इशारा देण्याचा भाग आहे. |
दिनदर्शिका
दिनांक ८ सप्टेंबर २०१० बुधवार मिती श्रावण वद्य अमावस्या १६ क. ०० मि. पूर्वा नक्षत्र २३ क. ५० मि. सिंह चंद्र २९ क. ५ मि.पर्यंत. सूर्योदय- ६।२६ सूर्यास्त- ६।४७. दर्श अमावस्या पोळा. मेष - योजना वेग घेतील, वृषभ - घरगुती प्रश्नांवर लक्ष ठेवा, मिथुन - महत्त्वाची कामे होतील, कर्क - जबाबदाऱ्या पूर्ण कराल, सिंह - नवे तंत्र यशस्वी ठरेल, कन्या - विचाराने पावले उचला, तुला - अनेकांचे सहकार्य मिळेल, वृश्चिक - प्रिय व्यक्तींच्या भेटी, धनु - मोठी उलाढाल होईल, मकर - थांबा बघा पुढे चला, कुंभ - वेळ वाया घालवू नका, मीन - मार्ग सापडतील, यश मिळेल. शुभराशी- मिथुन, सिंह, तुला.
|