मुखपृष्ठ >> के.जी.टू.पी.जी. >> फ्रेंच इनटू हिंदी व्हाया बॉलीवूड
 


स्पर्धेचे नियम व अटी




फ्रेंच इनटू हिंदी व्हाया बॉलीवूड Bookmark and Share Print E-mail
रेखा देशपांडे - सोमवार, ८ फेब्रुवारी २०१०
प्रेमचंदांच्या कथासंग्रहांचे - ‘मानसरोवर’चे - खंड सूटकेसमध्ये भरले तेव्हा कॅमीला भेट म्हणून काय न्यावं हा प्रष्टद्धr(२२४)न सोपेपणानं सुटला होता. कॅमी ही फ्रेंच तरुणी हिंदी शिकतेय. दोनदा त्यासाठी भारतात येऊन गेलीय. गेल्यावेळी पुस्तकांचं वजन वाढलं म्हणून काही पुस्तकं मागे ठेवून गेली होती. तिची ती पुस्तकं पॅरिसला जाताना न्यायची होतीच. पॅरिसमधली ती आमची होस्ट. तिच्याकरता गंगाधर गाडगीळांच्या ‘फिरक्यां’चा मीच केलेला हिंदी अनुवाद ‘खिंचाइयाँ’ घेतला. हातात पुस्तक येताच तिनं ब्लर्बवरचा गाडगीळांचा परिचय वाचून काढला.
पण हिंदीचं हे फ्रेंच कौतुक इथेच थांबणारं नव्हतं. कॅमी इन्स्टिटय़ूट ऑफ ओरिएण्टल स्टडीजमध्ये हिंदी शिकतेय. तिला हिंदी शिकावंसं वाटलं ते चक्क हिंदी सिनेमे पाहून. रात्री तिनं तिच्या हिंदीच्या वर्गातल्या मित्र-मैत्रिणींना बोलावलं. ‘जंगली’ (१९६१)मधल्या नवोदित सायराबानूसारखी दिसणारी मार्गो, मायकेल आणि  मूळची मोरोक्कोची  रिम ही सगळी हिंदी मुख्यत: सिनेमाच्या माध्यमातून शिकताहेत. एवढय़ात कोणता सिनेमा पाहिला़़? या प्रष्टद्धr(२२४)नावर मायकेल सांगतो, ‘विवाह’. राजश्री प्रॉडक्शन्सचा सूरज बडजात्यानं दिग्दर्शित केलेला ‘विवाह’ त्यांना परीक्षेला आहे. वर्गात अभ्यासाचा भाग म्हणून ते हिंदी सिनेमा बघतात आणि परीक्षेत त्यांना सिनेमातल्या संवादांचा अनुवाद करावा लागतो. ‘कभी खुशी  कभी गम’चाही त्यांनी भाषेसाठी अभ्यास केलाय. ‘कुछ कुछ होता है’ त्यांना खूप आवडलाय. अनुवादासाठी अर्थातच डिक्शनरी वापरतात आणि एकदा तर ‘अमिताभ बच्चन’ या शब्दाचा अर्थ कळेना म्हणून रिमनं डिक्शनरीत आपण ‘अमिताभ बच्चन’चा अर्थ शोधायचा प्रयत्न केल्याचं सांगून धमाल उडवून दिली.
 रिम ही मुलगी म्हणजे उत्साहाचं कारंजं, नव्हे धबधबाच आहे. आल्या आल्याच तिनं ‘मुझे माफ कीजिए’ म्हणत अगदी खाली वाकून नमस्कार केला. माफ कशासाठी तर हिंदी बोलताना चुका होतील म्हणून नाही, सध्या तिला नोकरीचा विचार करता हिंदीचा अभ्यास थांबवून इकॉनॉमिक्सचा अभ्यास करावा लागतोय म्हणून. पण अर्थात म्हणून तिचं हिंदीत बागडणं मुळीच थांबलेलं नाही. व्याकरणासहित हिंदी बोलायचा तिचा सतत प्रयत्न चालू आहेच.‘व्याकरण चुकलं आणि दुसऱ्यानं ते दुरुस्त केलं की तत्काळ ती ते शिकून बोलते. तशी ती फक्त शब्दांनी बोलत नाही. सगळ्या शरीरानंच अखंड बोलते. ‘देहबोली’ - ‘बॉडीलँग्वेज’ - या शब्दाला खऱ्या अर्थानं सार्थ करते. ‘तू मेरी अधूरी प्यास प्यास’ आणि ‘बोले चूडिम्याँ’ गाताना तिला अभिनयही करावा लागतो.
सध्या रिम हिंदीच्या वर्गात येत नसल्यामुळे तिची अनुपस्थिती पार जाणवते असं मायकेल म्हणतो. मायकेलचं शब्दांचं आकलन विलक्षण आहे. कुणी ‘रिअ‍ॅक्शन’ म्हटलं की तो लगेच ‘प्रतिक्रिया’ अशी आठवण करून देतो. मायकेल स्वत: हिंदी शिकण्याव्यतिरिक्त शिबू तरलगट्टी यांच्याकडे सतार शिकतो आहे. मुळात तो गिटार वाजवायचा , पण आता सतारीवर आणि हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतावर लक्ष केंद्रित करतो आहे. एव्हाना भूपाली, यमन आणि बागेश्री राग शिकला आहे. शिबू तरलगट्टी हे मल्लिकार्जुन मन्सूर यांचे शिष्य. याप्रकारे मायकेल‘ मल्लिकार्जुन मन्सूर यांच्या गुरुशिष्य परंपरे’त सामील झालाय. भारतातल्या गुरु-शिष्य परंपरेविषयी तो बोलतो. ‘गुरुकुल’ शब्दाची रिमला मजा वाटते. ती सारखं ‘गुरुकुल’ ‘गुरुकुल’ म्हणत राहते. पं. रविशंकर, उस्ताद विलायतखान, उस्ताद अमजद अली खान आणि उस्ताद झाकिर हुसैनचं वादन मायकेल सतत ऐकत असतो. भारतात काश्मीर आणि राजस्थानात येऊन गेलाय. त्याला पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवाची, मुंबईतल्या सेंट झेवियर्समधल्या ‘मल्हार’ची माहिती दिली. त्यासाठी त्याला आता मुंबई-पुण्यात यायचंय.
राजस्थान आणि काश्मीरच्या लोकसंगीताचा अभ्यास त्याला करायचा आहे. भारतातल्या प्रांता-प्रांतात लोकसंगीताचे विविध प्रवाह आहेत हे त्याला सांगितलं. वर्गातल्या अभ्यासाच्या निमित्तानं सध्या तरी ही मुलं गेल्या वीस वर्षांतलेच चित्रपट पाहताहेत. ‘भारतीय शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीतासाठी १९५० आणि ६०च्या दशकातले चित्रपट आवर्जून पहा म्हणून त्याला(वडिलकीचा) सल्ला दिल्याशिवाय राहवलं नाही. मग अर्थातच ‘बसंत बहार’, ‘बैजू बावरा’, नौशाद, एस. डी. बर्मन, सलिल चौधरी, शंकर जयकिशन अशा सगळ्या इतिहासाचा अभ्यास कर म्हणूनही सल्ला दिला. ‘तू आणखी काय करतेस?’ असं मार्गोला विचारलं तर ती म्हणाली, ‘ दुसरं काही नाही. कारण हिंदी शिकणं हा ‘फुल टाइम जॉब’ आहे.’  हजारो मैलांवरची वेगळ्या संस्कृतीतली  तरुण मुलं हिंदी भाषेवर, हिंदी सिनेमावर, हिंदुस्तानी संगीतावर प्रेम करताहेत, त्यासाठी आठवडय़ातले पाच वार आठ-आठ- बारा-बारा तास अभ्यास करताहेत, नव्हे ध्यास घेताहेत ही जाणीवच फार सुंदर आहे. आणि हिंदी सिनेमा ही त्यांची क्रमिक पुस्तकं झाली आहेत ही जाणीव तर रोमहर्षक.
दुसऱ्या दिवशी अ‍ॅलन आणि ख्रिस्तिन थिओलिए या प्रकाशक दांपत्याकडे त्यांनी प्रकाशिात केलेले कृष्ण बलदेवसिंहांच्या नाटकांचे फ्रेंच अनुवाद , - मुळ हिंदी सहित - पाहिले, प्रेमचंद, जैनेंद्रकुमार जैन, मन्नू भंडारी इत्यादी हिंदी साहित्यकारांची अँथॉलॉजी पाहिली, - त्यात किशोर शांताबाई काळे आणि माधव कोंडविलकरांवरही एकएक निबंध आहेत- आणि आपणच फ्रेंच शिकलो नाही याची खंत वाटली.
प्रतिक्रिया येथे नोंदवा
तुमची संपर्क माहिती:
प्रतिक्रिया:

!joomlacomment 4.0 Copyright (C) 2009 Compojoom.com . All rights reserved."

 

ताज्या बातम्या



लोकरंग

प्राप्तिकराची कूळकथा

मिलिंद संगोराम - रविवार, २५ जुलै २०१०
१८६० मध्ये भारतीयांवर पहिल्यांदा प्राप्तिकर लादला गेला. भारतीय प्राप्तिकराला दीडशे वर्षे झाल्यानिमित्त काल भारतीय प्राप्तिकर विभागातर्फे ‘इन्कम टॅक्स डे’ साजरा केला गेला. भारतीय प्राप्तिकराच्या आरंभकाळाचा इतिहास खूपच रंजक आहे. प्राप्तिकर, परवाना कर व तंबाखू कर अशा तीन नवीन करांची घोषणा तेव्हा जेम्स विल्सन या पहिल्या इंग्रज ‘फायनान्स मेंबर’ ने १८६० मध्ये केली होती.

दिनदर्शिका

शुक्रवार ३० जुलै २०१०, भारतीय सौर ८ श्रावण १९३२. मिती आषाढ वद्य चतुर्थी १६ क. ३० मि. पूर्वाभाद्रपदा नक्षत्रे २० क. ५० मि. कुंभचंद्र १४ क. ७ मि. सूर्योदय : ६/१६. सूर्यास्त : ७/१४.
मेष
- संधी अचूक टिपा, वृषभ - राजकारणात चमकाल, मिथुन - योग्य दिशा मिळेल, कर्क - नुकसान संभवते, सिंह - पत्नीचा सल्ला घ्या, कन्या - चलबिचल होईल, तूळ - अभ्यासात लक्ष ठेवा, वृश्चिक - मिळतेजुळते घ्या, धनू - निर्धाराने पुढे चला, मकर - व्यासपीठावर चमकाल, कुंभ - मनोधैर्य उंचावेल, मीन - खोटे काही करू नका.
शुभराशी- वृषभ, मकर, कुंभ.