मुखपृष्ठ >> लेख >> लोकसत्ता ‘व्हिवा दीवा’
 


स्पर्धेचे नियम व अटी




लोकसत्ता ‘व्हिवा दीवा’ Bookmark and Share Print E-mail
लोकसत्ता ‘व्हिवा दीवा’ स्पर्धेसाठी अटी व शर्ती
१. ‘व्हिवा दीवा’ स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही.
२. ही स्पर्धा फक्त १८ ते २५ वयोगटातील महिलावाचकांसाठी खुली आहे.
३. स्पर्धक तरुणीं  २३ जानेवारी २०१० पासून आपला स्वत:चा इमेल आयडी, टेलीफोन क्रमांक, मोबाईल नंबर, आपली जन्मतारीख, वय, निवासी पत्ता इ. माहिती नमूद करून अर्ज करु शकतात. दि. १ फेब्रुवारी २०१०, दुपारी १२.०० वाजल्यापासून स्पर्धाखुली होत असून दि. ३१ डिसेंबर २०१० रोजी दुपारी १२.०० वाजेपर्यंत सुरू राहील.
४. वेगवेगळ्या पेहरावातील दोन पूर्णाकृती व एक क्लोजअप ५’’ x ७’’ आकारातील मॅटफिनीश रंगीत फोटोग्राफ प्रत्येक स्पर्धक तरुणीस सादर करावे लागतील. त्यासोबत    शंभर शब्दांमध्ये स्वत:विषयी माहिती लिहावी. यामध्ये ‘व्हिवा दीवा’ स्पर्धेमध्ये आपण का योग्य आहोत याबद्दल स्पष्टीकरण असावे. फोटोग्राफ स्वत:च्या मालकीचे असावेत  किंवा स्पर्धकाकडे सदर फोटो या स्पर्धेसाठी पाठविण्याची फोटोग्राफरची लेखी परवानगी असावी.
५. प्रत्येक सप्ताहासाठी एका स्पर्धकाची निवड केली जाईल आणि तिचा फोटो लोकसत्ता ‘व्हिवा’ पुरवणीमध्ये प्रकाशित केला जाईल.
६. एका महिन्यातील चार विजेत्यांपैकी निवड झालेल्या एका सर्वोत्कृष्ट तरुणीचा स्टायलिस्ट आणि मेक-अप आर्टिस्ट यांच्याकडून  ‘मेक-ओव्हर’  केला जाईल. तसेच एका व्यावसायिक फोटोग्राफरकडून यासाठी निवड झालेल्या स्पर्धकाचे पोर्टफोलिओसाठी फोटोग्राफ्स काढले जातील. त्यापैकी एक फोटो व्हिवा’मध्ये झळकेल.
७. परीक्षकांचा निर्णय सर्व स्पर्धकांना अंतिम आणि बंधनकारक राहील. या संबंधी कोणत्याही स्वरूपाचा पत्रव्यवहार दि इंडियन एक्स्प्रेस लि.तर्फे स्वीकारला जाणार नाही.
८. दर महिन्यातील विजेत्या स्पर्धकास मेक-ओव्हर आणि फोटोशूटची तारीख, वेळ आणि स्थळ कळविले जाईल. त्यानुसार स्पर्धकाने दिलेल्या वेळेस उपस्थित राहिले  पाहिजे. जर विजेती स्पर्धक मेक-ओव्हर, फोटोशूटसाठी अनुपस्थित राहिली, सहभागी होण्यास असमर्थ असली किंवा जर तिची सहभागी होण्याची इच्छा नसली तरी  तिला फोटोग्राफर, स्टायलिस्ट आणि मेकओव्हर आर्टिस्ट आदिंच्या खर्चाची भरपाई दि इंडियन एक्स्प्रेस लि. यांच्याकडे करावी लागेल. अशावेळी सदर संस्थेस दुसऱ्या तरुणीस विजेता म्हणून जाहीर करण्याचे स्वातंत्र्य असेल.
९. दि इंडियन एक्स्प्रेस लि. या संस्थेस विजेत्या तरुणीचे फोटोग्राफ्स क्लोजअप  किंवा पूर्णाकृती व त्यावरील कॉमेंट्स प्रकाशित करण्याची परवानगी राहील.
१०. दि इंडियन एक्स्प्रेस लि. या संस्थेच्या कर्मचाऱ्यांना या स्पर्धेत भाग घेता येणार नाही.
११. सदर स्पर्धा कोणत्याही वेळी तहकूब करणे, रद्द करणे किंवा त्यात बदल करणे, भर घालणे किंवा खंडित करणे या बाबतचे अधिकार दि इंडियन एक्स्प्रेस लि. यांनी राखून ठेवले आहेत.
१२. विजेत्या स्पर्धकाचे लोकसत्ता ‘व्हिवा’ पुरवणीमध्ये छायाचित्र प्रकाशित करण्याखेरीज अथवा त्या बदल्यात कोणताही पुरस्कार, रोख रक्कम किंवा अन्य प्रकारे भरपाई   दिली जाणार नाही.
१३. मुंबई न्यायालयास अनन्य अधिकारिता राहील.
  • Mayuri Churi  - My Good Wish For Loksatta
    Loksatta is very good news paper....and i really like the viva diva contest...becoz Loksatta VIVA DIVA contest is giving great Opportunity to all Girls...


    SO THANKS TO LOKSATTA
    AND I HOPE THAT ALL LOKSATTA'S DREAMS & WISH COMES TRUE......

    Thanks,
    Mayuri Churi.
  • SAGAR R.WASKAR  - environment
    all of environment
  • sayli hatle  - youth icon
    We like 2 know about Vishwas Nangre Patil . His view about life & career . Thank you . Loksatta is my favuorite newspaper.........
प्रतिक्रिया येथे नोंदवा
तुमची संपर्क माहिती:
प्रतिक्रिया:

!joomlacomment 4.0 Copyright (C) 2009 Compojoom.com . All rights reserved."

 

ताज्या बातम्या



लोकरंग

‘चिनी ज्यादा’ !

अनिकेत साठे - रविवार, ५ सप्टेंबर २०१०
( sathe.aniket@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चिनी लष्कराच्या मुक्त संचारामुळे भारताची चिंता वाढली असून त्यामागे ‘ड्रॅगन’ची नेमकी काय चाल आहे, असा प्रश्न होतो. त्याचे उत्तर शोधताना हा विषय केवळ गिलगिटपुरताच मर्यादित नाही, तर त्याला विविध स्वरूपाचे कंगोरे असल्याचे लक्षात येते. अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून संरक्षण क्षेत्रात अफाट गुंतवणूक करणारा चीन सध्या जी पावले टाकतो आहे, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाही गर्भित इशारा देण्याचा भाग आहे.

दिनदर्शिका

गुरुवार, ९ सप्टेंबर २०१०. मिती भाद्रपद शुद्ध प्रतिपदा १२ क. ०८ मि.पर्यंत. उत्तरा  नक्षत्र २० क. ५१ मि.पर्यंत. कन्या चंद्र. सूर्योदय- ६।२६ सूर्यास्त- ६।४६
मेष
- शत्रूंवर लक्ष ठेवा, वृषभ - मुलांचे प्रश्न सुटतील, मिथुन - घरात शांतता ठेवा, कर्क - छोटे-मोठे प्रवास होतील, सिंह - अचानक दडपण वाढतील, कन्या - महत्त्वाचे निर्णय घ्याल, तूळ - देवघेवीत चुका करू नका, वृश्चिक - पैसा हाती येईल, धनू - सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, मकर - प्रयत्न कारणी लागतील, कुंभ - अडचणींचा दिवस, मीन - शासकीय कामे होतील.
शुभराशी : वृश्चिक / धनू / मकर