मुखपृष्ठ
 


स्पर्धेचे नियम व अटी




  • जर्मन बेकरी बॉम्बस्फोट; सूत्रधाराला पुण्यात अटक
  • जर्मन बेकरी बॉम्बस्फोट; सूत्रधाराला पुण्यात अटक* अन्य एक नाशिकमध्ये गजाआड
    * जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ात उदगीरमध्ये शिजला कट
    * रियाज-इक्बाल भटकळच्या इशाऱ्यावरून घडविला स्फोट
    मुंबई, ८ सप्टेंबर  प्रतिनिधी
    पुणे येथील जर्मन बेकरीमध्ये सात महिन्यांपूर्वी घडविलेल्या बॉम्बस्फोटामागील मुख्य सूत्रधार मिर्जा हिमायत ऊर्फ युसुफ बेग (२९) याला अखेर राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने पुणे येथूनच अटक केली. ‘लष्कर-ए-तोयबा’चा महाराष्ट्रातील प्रमुख असलेल्या बेगने इंडियन मुजाहिदीनचे म्होरके ...

  • ‘बेस्ट’ भाडेवाढ लागू; किमान तिकीट चार रुपये!
  • ‘बेस्ट’ भाडेवाढ लागू; किमान तिकीट चार रुपये!मुंबई, ८ सप्टेंबर / प्रतिनिधी
    विरोधकांचा विरोध डावलून ‘बेस्ट’ समितीच्या बैठकीमध्ये अलिकडेच मंजूर करण्यात आलेल्या बस भाडेवाढीच्या प्रस्तावावर आज मुंबई महापालिका सभागृहात शिक्कामोर्तब करण्यात आले. तत्पूर्वी पालिका सभागृहात रंगलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या कलगीतुऱ्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला आणि अखेर सत्ताधारी पक्षाने हा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे आज मध्यरात्रीपासूनच मुंबईकरांना भाडेवाढीला सामोरे जावे ...

  • अकरावी प्रवेश धोरणावर ‘लोकसत्ता’तर्फे आज परिसंवाद
  • अकरावी प्रवेश धोरणावर ‘लोकसत्ता’तर्फे आज परिसंवादमुंबई, ८ सप्टेंबर/प्रतिनिधी
    गेली काही वर्षे अकरावी प्रवेशाचा घोळ हा जणू नियमच झाला आहे. दहावीतून अकरावीतील स्थित्यंतर हे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि पर्यायाने संपूर्ण समाजाच्याच चिंतेचा विषय बनले आहे. दुर्दैवाने या निमित्ताने निष्कारण राज्याचे एसएससी बोर्ड आणि अन्य केंद्रीय बोर्ड अशी विभागणी ‘आपले आणि परके’ या धर्तीवर झाली आहे.परंतु या गोंधळातून काही उपाय निघण्याऐवजी हा प्रश्न अधिकाधिक गुंतागुंतीचा होत चालला आहे.

  • जादा चटईक्षेत्रासाठी आता शुल्कआकारणी शक्य
  • जादा चटईक्षेत्रासाठी आता शुल्कआकारणी शक्यमुंबई, ८ सप्टेंबर / खास प्रतिनिधी
    जादा चटईक्षेत्रासाठी शुल्क आकारणी (प्रिमीयम) करणे बेकायदेशीर असल्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिल्याच्या पाश्र्वभूमीवर  शुल्क आकारणीकरिता कायदेशीर त्रूटी दूर करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना कायद्यात बदल करून त्यात जादा चटईक्षेत्र निर्देशांकासाठी शुल्क आकारणी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

या सदरातील आणखी बातम्या...
या सदरातील आणखी बातम्या...
या सदरातील आणखी बातम्या...
या सदरातील आणखी बातम्या...
या सदरातील आणखी बातम्या...

ताज्या बातम्या



लोकरंग

‘चिनी ज्यादा’ !

अनिकेत साठे - रविवार, ५ सप्टेंबर २०१०
( sathe.aniket@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चिनी लष्कराच्या मुक्त संचारामुळे भारताची चिंता वाढली असून त्यामागे ‘ड्रॅगन’ची नेमकी काय चाल आहे, असा प्रश्न होतो. त्याचे उत्तर शोधताना हा विषय केवळ गिलगिटपुरताच मर्यादित नाही, तर त्याला विविध स्वरूपाचे कंगोरे असल्याचे लक्षात येते. अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून संरक्षण क्षेत्रात अफाट गुंतवणूक करणारा चीन सध्या जी पावले टाकतो आहे, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाही गर्भित इशारा देण्याचा भाग आहे.

दिनदर्शिका

गुरुवार, ९ सप्टेंबर २०१०. मिती भाद्रपद शुद्ध प्रतिपदा १२ क. ०८ मि.पर्यंत. उत्तरा  नक्षत्र २० क. ५१ मि.पर्यंत. कन्या चंद्र. सूर्योदय- ६।२६ सूर्यास्त- ६।४६
मेष
- शत्रूंवर लक्ष ठेवा, वृषभ - मुलांचे प्रश्न सुटतील, मिथुन - घरात शांतता ठेवा, कर्क - छोटे-मोठे प्रवास होतील, सिंह - अचानक दडपण वाढतील, कन्या - महत्त्वाचे निर्णय घ्याल, तूळ - देवघेवीत चुका करू नका, वृश्चिक - पैसा हाती येईल, धनू - सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, मकर - प्रयत्न कारणी लागतील, कुंभ - अडचणींचा दिवस, मीन - शासकीय कामे होतील.
शुभराशी : वृश्चिक / धनू / मकर